महासागरांचे महत्त्व स्वाध्याय

महासागरांचे महत्त्व स्वाध्याय

महासागरांचे महत्त्व स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

अ) गटात न बसणारा घटक ओळखा. (नकाशा संग्रहाचा वापर करावा.)

1) शंख, मासे, खेकडा, जहाज

उत्तर :

जहाज

2) अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र

उत्तर :

मृत समुद्र

3) श्रीलंका, भारत, नॉर्वे, पेरू

उत्तर :

पेरू

4) दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर

उत्तर :

बंगालचा उपसागर

5) नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मॅगनीज

उत्तर :

नैसर्गिक वायू

ब) प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो ?

उत्तर :

महासागरातून मानव पुढील गोष्टी मिळवतो.

i) मीठ, मासे, शंख, शिंपले, मोती व पोवळे यांसारख्या मौल्यवान वस्तू.

ii) तसेच लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ त्याशिवाय खनिज तेल व नैसर्गिक वायू महासागरातून मिळते.

2) जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते ?

उत्तर :

i) जलमार्गाचे केलेली वाहतूक ही शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते. यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते.

ii) तसेच जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते.

iii) जलमार्गाने वाहतूक करणे हा सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय आहे.

3) समुद्रसान्निध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो व का ?

उत्तर :

i) समुद्रसान्निध्य असलेल्या प्रदेशातील तापमान जास्त असते. म्हणून तेथील हवामान उष्ण आहे.

ii) समुद्र जवळ असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हवा दमट राहते.

iii) तसेच दिवसभरातील कमान व किमान तापमानात जास्त फरक नसतो म्हणून हवामान सम आहे.

vi) खंडांतर्गत प्रदेशात बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे या प्रदेशातील दिवसभरातील कमाल व किमान तापमानात जास्त फरक पडतो त्यामुळे खंडांतर्गत प्रदेशातील हवामान विषय असते.

4) पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडांलगत आहे ?

उत्तर :

पॅसिफिक महासागराचा किनारा आशिया व ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांलगत आहे.

Leave a Comment