स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा स्वाध्याय

स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा स्वाध्याय

स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. चौकटी पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 2. वैशिष्ट्ये लिहा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

प्रश्न. 3. हे केव्हा घडेल ते लिहा.

अ) परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील.

उत्तर :

आपल्या मनाची, बुध्दीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल व वाचल्यानंतर तो लक्षात राहील.

आ) माणसाची अंत:स्थ चेतना फुलेल.

उत्तर :

थोडी संकटे असली पाहिजेत, थोडा विरोध असला पाहिजे, म्हणजे माणसातील अंत:स्थ चेतना फुलते.

प्रश्न. 4. परिणाम लिहा.

अ) स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले –

उत्तर :

ग्रंथपालाने स्वामीजींना आडवेतिडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायला, त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे, ते अर्धे-पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून तो ग्रंथपाल म्हणाला, ‘हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे.’

आ) नावड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले –

उत्तर :

स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.

प्रश्न. 5. तुमचे मत लिहा.

अ) ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.

उत्तर :

ग्रंथपालाने म्हटले होते – काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तके न्यायची आणि ती न वाचता परत करायची सवय असते. थोडे चाळायचे आणि वाचल्यासारखे दाखवायचे. ग्रंथपालाचे हे मत वास्तवावर आधारलेले आहे. कारण हा अनुभव काही लोकांच्या बाबतीत आम्हालाही आलेला आहे. पण आणखी एक असे की पुस्तकातल्या केवळ मोजक्याच भागाची आपल्याला वाचनाकरिता गरज असते. पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते. पण तेवढ्यासाठीही पूर्ण पुस्तक न्यावे लागते. म्हणून ग्रंथपालाने व्यक्त केलेले मत अर्धसत्य आहे.

आ) पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न येणाऱ्या नावड्यांबाबत तुमचे मत.

उत्तर :

या पाठात मला असे वाटते की, नावड्यांचे चुकले, सर्वच गोष्टी पैशाने मोजू नयेत. समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात भगवान बुद्धाने सांगितलेली करुणा असावी. अडलेल्यांना हात देणे ही माणुसकी, हा माणसाचा धर्म होय. तो नावाड्यांनी पाळला नाही.

प्रश्न. 6. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.

अ) निर्भयता –

उत्तर :

निर्भयता – स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली.

आ) मनाची एकाग्रता –

उत्तर :

मनाची एकाग्रता – तीन दिवस, तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते.

इ) दृढनिश्चय –

उत्तर :

दृढनिश्चय – आता मी दोन-तीन दिवस इथेच राहणार आहे.

ई) देशप्रेम –

उत्तर :

देशप्रेम – ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा.

उ) वाचनप्रेम –

उत्तर :

वाचनप्रेम – पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत.

प्रश्न. 7. तुमचा अनुभव लिहा.

अ) ‘काम करत असताना एखादे संकट आले, की माणूस जागरूक राहून काम करतो’, याविषयी तुमचा अनुभव.

उत्तर :

परीक्षा दोन महिन्यांवर आली होती. मी नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मला विषमज्वर झाला. चौदा दिवस अभ्यास करू शकलो नाही. पण नंतर मात्र हसतखेळत नव्हे तर मन लावून अभ्यास केला. म्हणून त्या वर्षी मी वर्गात पहिला आलो होतो.

प्रश्न. 8. खालील दोन प्रसंगांतील फरक स्पष्ट करा.

स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार

उत्तर :

उडी मारण्यापूर्वी उडी मारल्यानंतर
नावाडी स्वामीजींना म्हणाले की तुम्ही पैसे दिल्याशिवाय तुम्हाला नावेत बसवून त्या शिलाखंडावर आम्ही सोडणार नाही. नावाड्यांनी माणुसकीचा विचारच सोडून दिला होता. स्वामीजी त्यांना सामान्य माणूस वाटले होते. नावाड्यांनी स्वामीजींवर संकट येऊ नये म्हणून आपल्या नावा काढून त्यांचा पाठलाग सुरू केला. यावेळी त्यांच्यातली माणुसकी जागी झाली होती. स्वामीजी शिलाखंडावर पोचले तेव्हा त्यांना वाटले की हा अद्वितीय माणूस आहे.

खेळूया शब्दांशी

अ) ‘निर्भय’ पासून ‘निर्भयता’ हे भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’, ‘आळू’, ‘पणा’, हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा.

-ता-त्व-आळू -पणा

उत्तर :

-ता-त्व-आळू -पणा
प्रसन्नतास्वत्व झोपाळूभित्रेपणा

आ) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा.

अ) सर्वांनी बेसावध राहून काम करू नये.

उत्तर :

सर्वांनी सावध राहून काम करावे.

आ) गाडी वेगाने चालवू नये.

उत्तर :

गाडी हळू चालवावी.

इ) शिळे अन्न खाऊ नये.

उत्तर :

ताजे अन्न खावे.

ई) कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये.

उत्तर :

सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.

उ) जॉन अप्रामाणिक मुलगा नाही.

उत्तर :

जॉन प्रामाणिक मुलगा आहे.

इ) खालील चौकटींत ‘बे’ हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा.

उदा., बेसावध

उत्तर :

आपण समजून घेऊया

खालील तक्ता पूर्ण करा.

संधीसंधिविग्रह
अधोमुख ………… + …………
दुर्दैव ………… + …………
मनोबल ………… + …………
दुष्कीर्ती ………… + …………
बहिष्कृत ………… + …………

उत्तर :

संधीसंधिविग्रह
अधोमुख अध: + मुख
दुर्दैव दु: + दैव
मनोबल मन: + बल
दुष्कीर्ती दु: + कीर्ती
बहिष्कृत बहि: + कृत

खालील तक्ता पूर्ण करा.

संधिविग्रहसंधी
मन: + वृत्ती
नि: + विवाद
मन: + धैर्य
तेज: + पुंज
आयु: + वेद

उत्तर :

संधिविग्रहसंधी
मन: + वृत्ती मनोवृत्ती
नि: + विवाद निर्विवाद
मन: + धैर्य मनोधैर्य
तेज: + पुंज तेज:पुंज
आयु: + वेद आयुर्वेद

वाचा

उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

पुस्तकाकडे केवळ कागदांवर छापलेला मजकूर इतक्या मर्यादित अर्थाने पाहता येणार नाही. पुस्तकांनाही जीव असतो. त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्त्व असतं. पुस्तकं आपल्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात. गरज असते ती आपण त्यांच्याशी बोलण्याची; संवाद साधण्याची ! एकदा का पुस्तकांशी मैत्री जुळली, नातं निर्माण झालं, की मग पुस्तकांकडून फक्त घेत राहायचं. परमेश्वरानं आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे; पण या एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव आपल्याला केवळ पुस्तकंच देऊ शकतात. शिवकथा वाचायला लागलो, की त्यांच्या शब्दाशब्दांतून इतिहास जिवंत होतो. जंगलाबाबतचं वर्णन वाचताना घनदाट अरण्य, सृष्टीची मनोहारी रूपं पाहत पशुपक्षी, प्राण्यांशी संवाद साधतो, विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांच्या विश्वास आपण हरवून जातो, तर चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य आपल्याला अंतर्मुख बनवते. पुस्तक हे आयुष्याला संपन्न आणि श्रीमंत करणारं ज्ञानभांडार आहे. त्यातून मनोरंजन तर होतंच आणि जाणिवाही प्रगल्भ होतात. शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्त्वे अन्नातून, तर मन आणि बुद्धी यांच्या भरणपोषणासाठी आवश्यक सत्त्वे केवळ पुस्तकेच देतात म्हणूनच पुस्तक प्रकाशवाटा दाखवणारा मित्र असतो. त्याच्याशी नातं जोडायलाच हवं.

1) पुस्तकांची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

i) एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव देणे.

ii) आयुष्याला संपन्न व श्रीमंत करणारे ज्ञानभांडार.

iii) मनोरंजनाबरोबरच जाणिवा प्रगल्भ होणे.

iv) प्रकाशवाटा दाखवणारा मित्र. ही पुस्तकांची वैशिष्ट्ये होय.

2) पुस्तकांना लेखकाने कोणती उपमा दिली आहे ?

उत्तर :

प्रकाशवाटा दाखवणारा मित्र ही पुस्तकांना लेखकाने दिलेली उपमा आहे.

3) ‘थोरामोठ्यांची चरित्रे’ आणि ‘विनोदी कथा’ वाचताना तुमच्या मनावर कोणता परिणाम होतो, असे लेखकाला वाटते.

उत्तर :

थोरामोठ्यांची चरित्रे आपल्याला अंतर्मुख बनवतात. विनोदी कथांमुळे आपण भन्नाट व गमतीदार लोकांच्या विश्वात हरवून जातो, हा परिणाम होतो असे लेखकाला वाटते.

4) पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

i) एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगण्याचा अनुभव घेता येणे.

ii) आपण अंतर्मुख होणे.

iii) आपले मनोरंजन होणे.

iv) जाणिवा प्रगल्भ बनणे.

v) ज्ञान मिळणे.

vi) मन आणि बुद्धी यांच्या पोषणासाठी आवश्यक सत्त्वे मिळणे.

vii) प्रकाशवाटा दिसणे. हे पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे आहेत.

Leave a Comment