सलाम नमस्ते स्वाध्याय
सलाम नमस्ते स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.
अ) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत.
उत्तर :
परोपकारी वृत्ती
आ) ‘माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.’
उत्तर :
वात्सल्य
इ) “मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.”
उत्तर :
दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव
ई) “मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदारी इच्छा होती.”
उत्तर :
कृतज्ञता बुद्धी
उ) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.
उत्तर :
करुणा
प्रश्न. 2. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
प्रश्न. 3. शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते ?
उत्तर :
आवश्यक असेल तेवढीच मदत स्वीकारावी. अधिकची मदत घेऊ नये. म्हणजेच स्वावलंबीपणानं व स्वाभिमनानं जगावं.
प्रश्न. 4. लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर :
तबस्सुमचे आईचे छत्र हरवले आहे. लेखिकेला तिच्याबद्दल करुणा वाटते. शेख महंमदनं झुबिदाच्या ऑपरेशनच्या खर्चातून उरलेले तीन हजार रुपये झुबिदाच्या सांगण्याप्रमाणे लेखिकेला परत केले. तिने ते परत घेतले नाहीत. शेखला ते पाकीट देऊन ती म्हणाली, “हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे. इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईपेक्षाही चार पावलं पुढं जाऊ दे.” अशी लेखिकेची तबस्तुमविषयीची भावना होती.
खेळूया शब्दांशी
खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.
1) ऑफिस –
उत्तर :
कचेरी
2) चेक –
उत्तर :
धनादेश
3) हॉस्पिटल –
उत्तर :
दवाखाना, इस्पितळ
4) ॲडव्हान्स –
उत्तर :
आगावू किंवा अग्रिम रक्कम
5) ऑपरेशन –
उत्तर :
शस्त्रक्रिया
6) कॅन्सर –
उत्तर :
कर्करोग
विचार कर. सांगा.
या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा.
उत्तर :
या पाठातील शेख महंमद, झुबेदा व लेखिका या तीन व्यक्तिरेखा मला आवडल्या.
शेख महंमद – शेख महंमद गरीब असतो पण तशाही परिस्थितीत आपल्या विधवा बहिणीला आधार देण्याचे मोठे मन त्याच्याजवळ आहे. शिवाय तो स्वाभिमानी आहे. ऑपरेशनसाठी येणाऱ्या खर्चाकरिता तो दागिने विकतो, कर्ज काढतो पण कुणाच्याही पुढे हात पसरत नाही. म्हणून ही व्यक्तिरेखा मला आवडली.
झुबेदा – झुबेदा तर अलौकिकच आहे. आपण ऑपरेशन होऊनही वाचत नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती शेखला म्हणाली, “आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू. ते दुसऱ्या कुणाच्या उपयोगाला येतील, आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत.” तिची अशी ही दुसऱ्यांविषयीची कळकळ थेट हृदयाला जाऊन भिडते. म्हणून ही व्यक्तिरेखा मला आवडली.
लेखिका – लेखिका समाजावर निःस्वार्थ प्रेम करणारी आहे. जे खरोखरच गरजू आहेत त्यांना ती निःस्वार्थ वृत्तीने मदत करते. झुबेदानं परत केलेले पैसे ती तबस्सूमला देऊन टाकते आणि सांगते, “आपली भूमी श्रीमंत आहे. तिच्या पोटात सोन्या-हिऱ्याच्या खाणी आहेत. म्हणून नव्हे तर झुबेदासारख्या लोकांमुळंच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे.” या चिंतनशील विचारामुळे ही व्यक्तिरेखा मला आवडली.
या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर :
माणसाचे जीवन इतरांसाठी झिजायला हवे.
माहिती मिळवूया
गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा.
उत्तर :
गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था –
i) शिवामृत सर्वसेवा व विकास संस्था – सोलापूर
ii) महावीर हार्ट फाऊंडेशन
iii) दावालीबेन मेहता ट्रस्ट – मुंबई
iv) एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट – मुंबई
v) एन. आर. बलदोटा फाऊंडेशन – पुणे
vi) फिरोज गोदरेज फाऊंडेशन – मुंबई
vii) इन्डोजर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी – न्यू दिल्ली
viii) लता मंगेशकर हॉस्पिटल – नागपूर
खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.
उत्तर :
i) हा मोर आहे. तो आकाशात मेघांची आतुरतेने वाट पाहत आहे. मेघांनी पृथ्वीवर पाऊस पाडावा व लोकांना सुखी करावे ही त्याची भावना आहे.
ii) हा खेळाडू मुलगा आहे. त्याच्या हातात फूटबॉल आहे.फूटबॉल स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याच्या डोळ्यात तरळत आहे.
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा.
अ) ……………. काय सुंदर आहे ताजमहाल !
उत्तर :
अहा ! काय सुंदर आहे ताजमहाल !
आ) ……………. किती जोराच ठेच लागली !
उत्तर :
बापरे किती जोराच ठेच लागली !
इ) ……………. किती उंच आहे ही इमारत !
उत्तर :
अबब किती उंच आहे ही इमारत !
वाचा
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उताऱ्यास योग्य शीर्षक द्या.
उत्तर :
वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, ” आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे, तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत, सोबत भावत असेल, तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व फुलवण्यात साहाय्यक ठरतात.
घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्न विचारण्याला स्वांतत्र्य दिलं जातं, त्या घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्त्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. याउलट काही मुलं फार आक्रमक असतात. ‘मी म्हणेन तेच खरं’ अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रुक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणानं वावरू शकत नाहीत.
तुम्हांला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं आहे, हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं, की अरसिक, बेजबाबदार बनवायचं; स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं, की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं; दिलखुलास जगायचं की रडतखडत, घाबरत घाबरत जगायचं, तुम्हीच ठरवा, स्वतःला कसं घडवायचं.
शीर्षक – व्यक्तिमत्त्वाची जडणघडण