मौर्यकालीन भारत स्वाध्याय

मौर्यकालीन भारत स्वाध्याय

मौर्यकालीन भारत स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या ?

उत्तर :

सिकंदराने नेमलेल्या सत्रपांमध्ये सिकंदरच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या.

2) बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकीने श्रीलंकेस कोणास पाठवले ?

उत्तर :

बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले होते.

3) मौर्य काळात कोणते व्यवसाय होते ?

उत्तर :

मौर्य काळात शेतीबरोबरच इतर उद्योग म्हणजे हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातूकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

4) सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत ?

उत्तर :

सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत.

2. सांगा पाहू.

1) सत्रप

उत्तर :

ग्रीक अधिकारी

2) सुदर्शन

उत्तर :

गुजरात राज्यातील जुनागढजवळ बांधलेले धरण.

3) ‘देवानं पियो पियदसी’

उत्तर :

सम्राट अशोकाने लेखांमध्ये स्वतःचा उल्लेख असा केला.

4) अष्टपद

उत्तर :

बुद्धिबळाचे नाव

3. आठवा आणि लिहा.

1) चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती

उत्तर :

i) चंद्रगुप्त मौर्याने इ.स. पू. 325 च्या सुमारास मगधवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली.

ii) त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली.

iii) तसेच सेल्सुकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्यात सामील झाले.

2) सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती

उत्तर :

i) सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.

ii) वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.

4. जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) सम्राट अलेक्झांडर
2) मेगॅस्थिनिस
2) सम्राट अशोक
अ) सेक्सुलस निकेटरचा राजदूत
ब) ग्रीकचा सम्राट
क) रोमचा सम्राट
ड) मगधचा सम्राट

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) सम्राट अलेक्झांडर
2) मेगॅस्थिनिस
2) सम्राट अशोक
ब) ग्रीकचा सम्राट
अ) सेक्सुलस निकेटरचा राजदूत
ड) मगधचा सम्राट

5. तुम्हांला काय वाटते ?

1) सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले.

उत्तर :

i) सिकंदर सिंधू नदी ओलांडून तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला.

ii) तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या.

iii) त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे सिकंदरला अखेर माघार घेणे भाग पडले.

2) ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत.

उत्तर :

i) ग्रीक राजांच्या नाण्यांवर एका बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे ग्रीक देवतेचे चित्र असे.

ii) त्या नाण्यावर त्या राजाचे नाव असे. म्हणून ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत.

3) सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

उत्तर :

कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

6. तुमच्या शब्दांत वर्णन करा.

1) सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे.

उत्तर :

सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखासाठी व कल्याणासाठी अनेक कामे केली.

i) माणसांना तसेच पशुंना मोफत औषध-पाणी मिळावे म्हणून दवाखाने काढले.

ii) अनेक रस्ते बांधले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सावलीसाठी झाडे लावली.

iii) वाटसरुंची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्या.

iv) पाण्याच्या सोयीसाठी विहिरी खोदल्या.

2) मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने.

उत्तर :

i) मौर्यकाळात नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव, समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य व गायनाचे कार्यक्रम केले जाई.

ii) कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती होत असत.

iii) सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारखे खेळ आवडीने खेळले जात.

7. आज युआन श्र्वांगसारखे परदेशी प्रवासी तुम्हांला भेटले तर तुम्ही काय कराल ?

उत्तर :

युआन श्र्वांगसारखे परदेशी प्रवासी आम्हांला भेटले तर आपल्या पालकांच्या मदतीने त्यांची राहण्याची व खाण्यापिण्याची सोय करू. ते ज्या परदेशातून आले. तेथील माहिती विचारू. त्यांच्याजवळ असलेल्या माहितीचे टिपण तयार करू.

Leave a Comment