माझ्या आज्यानं पंज्यानं स्वाध्याय
माझ्या आज्यानं पंज्यानं स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी
प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अ) कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चऱ्हाटं वळल्यामुळे कोणती कामे करता आली ?
उत्तर :
कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी विणल्या. त्यामुळे शेताची राखण नेमाने करता आली. त्याचप्रमाणे त्यांनी चऱ्हाटे विणली. त्यामुळे शेतातली मोट पाट भरून वाहू लागली. कवीच्या आजोबा-पणजोबांनी गोफणी व चऱ्हाट विणल्यामुळे शेतीची ही कामे करता आली.
आ) कवीच्या आजोबा-पणजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला ?
उत्तर :
कवीच्या आजोबा-पणजोबांनी बाज विणली. शेतातून काम करून दमून आल्यावर तो त्या बाजेवर पाठ टेकवतो. त्याने त्या बाजेचा उपयोग कष्टानंतर विश्रांतीसाठी केला.
प्रश्न. 2. शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा.
अ) येसणी –
उत्तर :
येसणी – न ऐकणाऱ्या बैलांच्या नाकात येसणी टाकून त्यांच्याद्वारे पेरणी करण्याकरिता.
आ) गोफणी –
उत्तर :
गोफणी – रानाची राखण करण्याकरिता.
इ) चऱ्हाट –
उत्तर :
चऱ्हाट – पाण्याची मोट चालवण्याकरिता
ई) बाजा –
उत्तर :
बाजा – दमून आल्यावर पाठ टेकवण्याकरिता.
उ) काण्या –
उत्तर :
काण्या – गुरांना दावण्या बांधण्याकरिता.
ऊ) दावणी –
उत्तर :
दावणी – म्हशीला बांधण्याकरिता.
खेळूया शब्दांशी
अ) शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा.
उत्तर :
i) येसणी – पेरणी
ii) गोफणी – रखणी
iii) चऱ्हाट – मोट
iv) बाजा – राज्या
v) काण्या – दावण्या
आ) आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाणभाषेत लिहा.
उत्तर :
शोध घेऊया
अ) तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा-पणजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वत: तयार केलेल्या वस्तूंची यादी करा.
उत्तर :
i) छत्री
ii) काठी
iii) लाकडी बैल
iv) देवघरातील देवपाट
आ) आंतरजालाच्या साहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या.
उत्तर :
i) टॅक्टर – आजकाल शेती नांगरण्यासाठी टॅक्टर वापर केला जातो.
ii) मळणी यंत्र – मळणी यंत्राद्वारे मळणी केली जाते.
iii) कापणी यंत्र – कापणी यंत्राद्वारे धान्याची कापणी केल्या जाते. त्यामुळे श्रमाची बचत होते.
भाषेचे नमुने
1. वऱ्हाडी बोली
मनाने उत्तरे लिहा.
अ) ‘असलं त काय अति करा अम नसलं त काय माती करा ?’ या म्हणीचा अर्थ काय असेल याचा विचार करा व लिहा.
उत्तर :
आपल्याजवळील वस्तूची बचत करून ती योग्य प्रमाणात न वापरता तिची नुसती उधळपट्टी करणे आणि ती संपल्यावर रडत बसणे असा या म्हणीचा अर्थ आहे.
आ) कुकाचं डाबलं, अळकित्ता ही वऱ्हाडी बोलीतील वस्तूंची नावे आहेत. तुमच्या परिसरात या वस्तूंना कोणती नावे आहेत ते लिहा.
उत्तर :
कुकाचं डाबलं – कुंकवाचा करंडा
अळकित्ता – अडकित्ता
2. मराठवाडी बोली
मनाने उत्तरे लिहा.
तुमच्यावर तुमच्या लहान भावडांना किंवा एखाद्या छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ आली आहे का ? तुमचा अनुभव लिहा.
उत्तर :
एकदा एका छोट्या बाळाला सांभाळण्याची वेळ माझ्यावर आली. तो माझ्याजवळ खूप छान राहिला, खेळला. मग त्याला डुलकी आली. मी त्याला झोपवायला गेले. पण तो एकाएकी रडून उठला. त्याला भूक लागली असेल असे वाटून दुधाची बाटली त्याच्या तोंडाजवळ नेली. पण तो दूध घेईना, रडणे थांबविना. खेळणी दिली. पण त्याने खेळणी घेतलीच नाहीत. सारखा रडत होता. तोच एक डास मला उडताना दिसला. हा डास त्याला चावला असेल असे वाटून मी त्याचे झबले काढले. पाठ थोडी खाजवली, पिरसली. तो शांत झाला आणि पूर्ववत त्याला डुलकी आल्याने शांतपणे झोपला.