पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय
पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय इयता पाचवी परिसर अभ्यास भाग 2
1. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते ?
उत्तर :
एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते.
आ) एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले ?
उत्तर :
एकपेशीय सजीव प्रथम पाण्यामध्ये निर्माण झाले.
2. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले ?
उत्तर :
i) सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.
ii) त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले.
iii) या विभाजनातून सूर्य व त्याच्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
आ) प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
i) प्राणी श्वासोच्छवास करतात.
ii) प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात.
iii) काही प्राणी अपत्याला जन्म देतात; तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात.
3. पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांभोवती गोल करा.
उत्तर :
4. पुढील घटना कालानुक्रमे लिहा.
अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.
आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले.
ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.
उत्तर :
ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.
आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.
अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.
इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले.