अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी

अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. १. अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.

अ. अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत ?

भुरूपांवर

गतीवर ✓

दिशेवर

आ. मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो ?

दाब

ताण ✓

पर्वत

इ. खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते ?

ताण ✓

दाब

अपक्षय

ई. खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता ?

सातपुडा

हिमालय ✓

पश्चिम घाट

उ. विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे ?

पर्वतनिर्माणकारी

खंडनिर्माणकारी ✓

क्षितिजसमांतर

प्रश्न. २. भौगोलिक कारणे लिहा.

अ. हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

उत्तर :

i) प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने पुढे-मागे होते, तर दुय्यम लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेने वरखाली होत जाते.

ii) भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सार्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात.

iii) त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

आ. मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

उत्तर :

i) मेघालय पठार हे मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले तर दख्खन पठार हे शीघ्र भू-हालचालींमुळे निर्माण झाले.

ii) भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग वर उचलला जातो तर ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पासतात.

iii) वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत म्हणतात. मेघालय पठार हे गट पर्वताचे उदाहरण आहे.

iv) ज्वालामुखीमुळे ज्वालामुखी पठारे तयार होतात. दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पर्वताचे उदाहरण आहे.

इ. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांतर आढळतात.

उत्तर :

i) भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो.

ii) त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो.

म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

ई. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उत्तर :

i) बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता. परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.

ii) या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे.

iii) या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाच्या संचयनामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उ. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

उत्तर :

i) सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.

ii) ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

iii) भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात, तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

प्रश्न. ३. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा.

अ. किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – भूकंप, ज्वालामुखी

आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली

इ. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – ज्वालामुखी

ई. प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली

प्रश्न. ४. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.

अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.

आ. भूपट्ट अचानक हलतात.

इ. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

ई. कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

उ. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

उत्तर :

आ. भूपट्ट अचानक हलतात.

इ. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

ई. कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

उ. साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.

प्रश्न. ५. फरक स्पष्ट करा.

अ. गट पर्वत व वली पर्वत

उत्तर :

गट पर्वतवली पर्वत
i) अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात.i) अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्यानिर्माण होतात.
ii) दोन समांतर विभागांमधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते.ii) वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते.
iii) उदा. युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठारiii) हिमालय, अरवली, रॉकी पर्वत

आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी

उत्तर :

प्राथमिक भूकंप लहरीदुय्यम भूकंप लहरी
i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात.i) प्राथमिक भूकंप लहरींनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात, त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात.
ii) प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात.ii) दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात.
iii) दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात.iii) प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात.

इ. भूकंप व ज्वालामुखी

भूकंपज्वालामुखी
i) भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप होय.i) पृथ्वीच्या पर्यावरणात तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्याची क्रिया म्हणजेच ज्वालामुखी होय.
ii) भूकंपामुळे काही प्रदेश उंच होतात तर काही प्रदेश खचतात.ii) ज्वालामुखीच्या उद्रेकातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
iii) भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही.iii) ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो.

प्रश्न. ६. थोडक्यात उत्तरे लिहा.

अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत –

i) भूपट्ट सरकणे – दृढ शिलावरण हे स्वतंत्र अशा अनेक भूपट्टापासून बनले आहेत. भूपट्ट दुर्बलावरण या स्तरावर तरंगत आहे. हे भूपट्ट तरंगत असताना एकमेकांना घसटत एकमेकांपासून दूर सरकतात. त्यामुळे भूकंप होतो.

ii) भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो.

iii) भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जपणे – भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींच्या भूपृष्ठावर परिणाम होत असतो. भूहालचालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना तडे जातात किंवा भेग पडतात. त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते आणि खडक दुभंगतात व त्याचे स्थानांतर होते. खडक खाली सरकतात किंवा वर उचलले जातात.

iv) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो.

v) ज्वालामुखीचा उद्रेक – सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळतात. म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही, भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?

उत्तर :

i) मंद भू-हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते.

ii) म्हणजेच जगातील प्रमुख वली पर्वत मंद भू-हालचालींच्या पर्वतनिर्माणकारी हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.

इ. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे.

उत्तर :

i) भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते.

ii) भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.

iii) या लहरींच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते.

त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती/घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.

ई. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते ?

उत्तर :

अ) भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम :

i) भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात.

ii) भूमिपात होऊन दरडी कोसळतात.

iii) भूजलाचे मार्ग बदलतात.

iv) सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात.

ब) भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम :

i) भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते.

ii) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.

iii) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.

उ. भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप लहरींचे प्रमुख तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१) प्राथमिक लहरी : i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात.

ii) या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात.

iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करतांना त्याच्या दिशेत बदल होतो.

iv) प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढे-मागे हलतात.

२) दुय्यम लहरी : i) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते.

ii) या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.

iii) या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.

iv) या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात.

v) या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

३) भूपृष्ठ लहरी : i) प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते.

ii) या लहरी भुकवचात पृथ्वीच्या परीघाच्या दिशेत प्रवास करतात.

iii) त्या अतिशय विनाशकारी असतात.

ऊ. ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.

उत्तर :

i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय.

ii) ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.

iii) ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूपानुसार खालील दोन प्रकार/वर्गीकरण केले जाते.

१) केंद्रीय ज्वालामुखी : i) ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.

ii) बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकुच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात.

iii) जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.

२) भेगीय ज्वालामुखी : i) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीस ज्वालामुखी म्हणतात.

ii) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.

iii) भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.

३) जागृत ज्वालामुखी : वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असं ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा. जपानच्या फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.

४) सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी : काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा. इटलीतील, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.

५) मृत ज्वालामुखी : ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा. टांझानियातील किलीमांजारो.

प्रश्न. ७. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा.

उत्तर :

प्रश्न. ८. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.

अ. माउंट किलीमांजारो

आ. मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र

इ. माउंट फुजी

ई. क्रॅकाटोआ

उ. माउंट व्हेसुव्हियस

उत्तर :

Leave a Comment