मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र

१. शासनावर कोणते निर्बंध असतात, याचा खालील चौकटीत तक्ता तयार करा.
- …………………………
- …………………………
- …………………………
- …………………………
उत्तर :
- शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, लिंग, वंश, भाषा यांवर आधारित भेदभाव करू नये.
- कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये.
- कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये.
- शासनाने धार्मिक कर लादू नये.
२. खालील विधाने वाचा व होय/नाही असे उत्तर लिहा.
१) वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात……..
उत्तर :
वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला, पुरुष या सर्वांसाठी जागा असतात होय
२) एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री-पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते ………………
उत्तर :
एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री-पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते नाही
३) शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात …………….
उत्तर :
शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात होय
४) राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे ……………..
उत्तर :
राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू, स्मारके यांचे संरक्षण करावे होय
३. का ते सांगा.
१) ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे.
उत्तर :
i) ऐतिहासिक वास्तू , इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आपली सांस्कृतिक वैभव आहे.
ii) संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे, असे मार्गदर्शन तत्त्वातही नमूद केलेले आहे. या तत्त्वाच्या आधारे वास्तुसंरक्षण कायदाही संसदेने संमत केला आहे म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे.
२) वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.
उत्तर :
वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलले असते; म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. या भावनेने तसेच वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून पेन्शन योजना राबवली जाते.
३) ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
उत्तर :
दारिद्र्यामुळे ६ ते १४ वयोगटातील अनेक मुले-मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत, पालक त्यांना कामावर पाठवतात. यामुळे निरक्षरता वाढते. या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
४. योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा.
१) राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
२) राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
३) आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे/कोरणे.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे.
४) सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण समान कामासाठी समान वेतन मिळावे ही मार्गदर्शन तत्त्व आणि स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व आपण मान्य केले आहे. ते अमान्य करणे म्हणजे पुरुषश्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल. म्हणून समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे.
५) सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
५. लिहिते होऊया.
१) संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती ?
उत्तर :
i) शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये.
ii) स्त्री व पुरुषांना समान करण्यासाठी समान वेतन द्यावे.
iii) लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
iv) पर्यावरणाचे रक्षण करावे.
v) राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे.
vi) समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
vii) वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे.
viii) भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा.
२) भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल ?
उत्तर :
संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे. शासन नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही तरीही संविधानाने अल्पसंख्याक लोकसमूहाला, आदिवारीला व दुर्बल घटकांसाठी विशेष अधिकार दिलेले आहेत. नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये, अशी परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेली आहे.
३) मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे हा म्हटले जाते ?
उत्तर :
i) मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते.
ii) मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते. मार्गदर्शक तत्त्यांना ते नसते. परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्त्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते.
iii) मार्गदर्शक तत्त्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत. परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही; म्हणून मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले जाते.
६. पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशाप्रकारे करू शकतात, हे उदाहरणांसह लिहा.
उत्तर :
माझ्या मते नागरिक पुढीलप्रमाणे पर्यावरणाचे जतन व संरक्षण करू शकतात –
i) वृक्षारोपण व वृक्षसंरक्षण करणे.
ii) वृक्षतोड थांबवणे.
iii) धुर ओकणाऱ्या गाड्या, कारखान्यांच्या चिमण्या, फटाके वाजवणे याला सामूहिक प्रयत्न करून आळा घालणे.
iv) गटाराचे पाणी नदी-नाल्यात जाणार नाही, असा प्रयत्न करणे.
v) प्लॅस्टिकचा वापर बंद करून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे.
vi) स्वच्छता अभियानसारखे उपक्रम वारंवार राबवून परिसर ठेवणे.