मला मोठ्ठं व्हायचंय स्वाध्याय
मला मोठ्ठं व्हायचंय स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. दोन-तीन वाक्यांत प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे ?
उत्तर :
मुलाला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, संशोधन करायचे आहे, शोध लावायचे आहेत. मुलाला अंघोळीला न जाता हे सर्व करायचे आहे.
आ) वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने कोणती तयारी केली ?
उत्तर :
वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने घरात त्याची स्वतंत्र लॅब बनवली. मायक्रोस्कोप, टेस्टट्यूब, काचेची पात्रं, सगळे आणून ठेवले. पुस्तकांचा डोंगर रचला. वैज्ञानिक शोध लावण्यासाठी मुलाने ही तयारी केली.
इ) शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई काय करतील असे मुलाला वाटते ?
उत्तर :
आज ताई व आई शास्त्रज्ञ होऊ पाहणाऱ्या मुलावर चिडतात. पण मुलगा शास्त्रज्ञ झाल्यावर ताई व आई त्याच्या बक्षीस समारंभात मात्र मिरवतील असे मुलाला वाटते.
ई) आई मुलाला कोणता शोध लावायला सांगते ?
उत्तर :
मुलाला कपड्यांच्या बोळ्यातून सुद्धा निळी पॅट मिळाली नाही. आई त्याला पँटचा शोध लावायला सांगते.
प्रश्न. 2. मनाने उत्तरे लिहा.
अ) कोणत्या गोष्टींसाठी आई तुमच्या सारखी मागे लागते ?
उत्तर :
मी मित्रांबरोबर फूटबॉल खेळायला जात असतो. पण त्यांच्याबरोबर बाहेर न जातात मी अभ्यास करावा यासाठी आई सारखी मागे लागते.
आ) तुम्हांला अंतराळात सोडले तर तुम्ही काय काय पाहाल ते लिहा.
उत्तर :
आम्हाला अंतराळात सोडले तर ग्रह, तारे जवळून कसे दिसतात ते आम्ही पाहू. पृथ्वी दुरून कशी दिसते ते आम्ही पाहू. आमचा भारतदेश दुरून कसा दिसतो तो आम्ही पाहू.
इ) तुम्हांला कोणते शोध लावावे असे वाटते ?
उत्तर :
भारताच्या काही भागात पाऊस खूप पडतो तर काही भागात अजिबात पडत नाही. काही वेळेला ढग येतात आणि पाऊस न पाडता निघून जातात. म्हणून आपल्याला हवे तेव्हा ढग बोलावता येईल आणि पाहिजे तेवढाच पाऊस पाडून घेता येईल. हे शोध लावावेत असे मला वाटते.
प्रश्न. 3. अ) वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
अ) आकाशाला गवसणी घालणे.
उत्तर :
आकाशाला गवसणी घालणे – अशक्य गोष्ट शक्य करण्याचा निष्फळ प्रयत्न करणे.
वा.उ. – अंगी अभिनय कला नसताना हिरो बनवण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे आकाशाला गवसणी घालणे होय.
आ) निश्चय दांडगा असणे.
उत्तर :
निश्चय दांडगा असणे – पक्का निर्धार असणे.
वा.उ. – स्वराज्य स्थापनेचा शिवाजी महाराजांचा निश्चय दांडगा होता.
इ) खडकातून पाणी काढणे.
उत्तर :
खडकातून पाणी काढणे – कठीण परिस्थितीवर मात करणे.
वा.उ. – म. फुले यांनी मुलींची शाळा काढून खडकातून पाणी काढले.
ई) मनस्ताप सहन करणे
उत्तर :
मनस्ताप सहन करणे – मनाला होणारे दु:ख सहन करणे.
वा.उ. – मोठी माणसे टोचून बोलली की मनस्ताप सहन करावा लागतो.
आ) पाठात आलेले शब्द खालील दिलेले आहेत. त्यांची माहिती मिळवा व लिहा.
अ) गुरुत्वाकर्षण
उत्तर :
पृथ्वीची पदार्थाना आपणांकडे ओढण्याची शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण होय. गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच वर फेकलेले पदार्थ जमिनीवर पडतात.
आ) टेस्टट्यूब्ज
उत्तर :
टेस्टट्यूब्ज म्हणजे परीक्षा नळी होय. प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी या नळीचा उपयोग केला जातो.
इ) लॅब
उत्तर :
लॅब म्हणजे प्रयोगशाळा होय. प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले असते. जसे मायक्रोस्कोप, टेस्टट्यूब्ज काचेची पात्रं यांसारखी सर्व साहित्य प्रयोगशाळेत उपलब्ध असतात.
ई) विद्युतशक्ती
उत्तर :
विद्युतशक्ती म्हणजे वीज.
उ) अणू
उत्तर :
अणू म्हणजे सर्व द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म संरचना होय. रासायनिक मूलद्रव्याच्या लहानांत लहान कणास अणू असे म्हणतात. पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांचा (अणू) बनलेला असतो. ही संकल्पना भारतीय शास्त्रज्ञ कणाद याने मांडली. अणू तीन प्रकारच्या कणांचे बनलेले असतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूटॉन.
ऊ) परमाणू
उत्तर :
पदार्थाचा अविभाज्य असा सूक्ष्म अंश म्हणजे परमाणू होय.
इ) प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध साहित्य असते, त्याची यादी करा.
उत्तर :
प्रयोग करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये जे साहित्य लागते. त्याची यादी.
i) काचेची पात्रे
ii) स्फिरिट
iii) परीक्षा नळी
iv) स्टँन्ड
v) छोटी जाळी
vi) थर्मामीटर
vii) मोजपट्टी
viii) प्रिझम
ix) चुंबक
x) गोलक
ई) तुम्ही आतापर्यंत पाठांचे विविध नमुने अभ्यासले आहेत, त्यांपैकी खाली काही नमुने दिले आहेत. त्यांमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती पात्रे बोलत असतात हे खालील तक्त्यात लिहा.
नाट्यछटा | संवाद | नाट्यप्रवेश | आत्मवृत्त | कथा |
---|---|---|---|---|
उत्तर :
नाट्यछटा | संवाद | नाट्यप्रवेश | आत्मवृत्त | कथा |
---|---|---|---|---|
एक | एक-अनेक | एक-अनेक | एक | एक-अनेक |
उ) या नाट्यछटेत किती पात्रांचा उल्लेख आहे ? ती पात्रे काय बोलली आहेत ते लिहा.
उत्तर :
या नाट्यछटेत दोन पात्रांचा उल्लेख आहे.
i) आई – निळी पँट शोधली, तर हाच मोठा शोध लावलास. आईवर खूप उपकार होतील !
ii) ताई – शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय ?
आपण समजून घेऊया
शब्दांच्या शेवटी ‘इकार’ किंवा ‘उकार’ येतील असे दहा शब्द लिहा.
उत्तर :
i) भिंती
ii) नीती
iii) स्थिती
iv) जेवली
v) झोपली
vi) संस्कृती
vii) मुलांची
viii) शाळेची
ix) पारखली
x) परिस्थिती
खालील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषणे घाला.
(इतका, जेवढा, तुमचा, तिचा, जसा, तेवढे)
1. बाबांनी विचारले, ” …………. वेळ कुठे होतास ?”
उत्तर :
बाबांनी विचारले, “इतका वेळ कुठे होतास ?”
2. ………….. चेहरा उन्हाने लालेलाल झाला.
उत्तर :
तिचा चेहरा उन्हाने लालेलाल झाला.
3. मला वाटते, ” ……………. कचरा जास्त ………….. प्रदूषण जास्त.”
उत्तर :
मला वाटते, “जेवढे कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त.”
4. …………… मुलगा खूप हुशार आहे.
उत्तर :
तुमचा मुलगा खूप हुशार आहे.
5. …………. अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला.
उत्तर :
जसा अंगरखा तशीच टोपी घालून तो मंचावर आला.
खालील नामांना दोन-दोन विशेषणे लिहा.
उदा., हिमालय-उंच, बर्फाच्छादित
1. भाजी – …………….., …………..
उत्तर :
भाजी – ताजी, हिरवी
2. घर – …………….., …………..
उत्तर :
घर – टुमदार, स्वच्छ
3. विद्यार्थी – …………….., …………..
उत्तर :
विद्यार्थी – सालस, हुशार
4. बाहुली – …………….., …………..
उत्तर :
बाहुली – आकर्षक, सुंदर
5. लोक – …………….., …………..
उत्तर :
लोक – सज्जन, प्रामाणिक