समोच्च रेषा नकाशा आणि भुरूपे स्वाध्याय
समोच्च रेषा नकाशा आणि भुरूपे स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

प्रश्न. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) समोच्चतादर्शक नकाशाचा वापर कोणाकोणाला होतो ?
उत्तर :
समोच्चता दर्शक नकाशाचा वापर पर्यटक, निर्यारोहक, भटकंती करणारे, संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना होतो.
2) समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते ?
उत्तर :
समोच्च रेषांच्या निरीक्षणावरून पुढील बाबी लक्षात येतात.
i) एखाद्या प्रदेशाची, गावाची, शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची
ii) जमिनीचा उंचसखलपणा
iii) उतार व उताराची दिशा
iv) त्यावरील लप्रवाह इत्यादी.
3) शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग कसा होईल ?
उत्तर :
शेतकऱ्यांना सखोल शेतीसाठी जागेची निवड करण्यासाठी, जलप्रवाहाची दिशा कोणत्या प्रकारची आहे, जलप्रवाह जवळपास उपलब्ध आहे की नाही तसेच मळ्याची शेती करण्यासाठी डोंगर उतारावरील जागा योग्य आहे की नाही. या सर्व गोष्टींविषयी अंदाज बांधण्यासाठी शेतकऱ्यांना समोच्च रेषा नकाशांचा उपयोग होईल.
4) प्रदेशातील भुरूपाचे व उंचीचे वितरण कशाच्या साहाय्याने दाखवता येते ?
उत्तर :
प्रदेशातील भुरूपाचे व उंचीचे वितरण समोच्चता दर्शक नकशाच्या साहाय्याने दाखवता येते.
प्रश्न. 2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार ……………. असतो.
उत्तर :
समोच्च रेषा एकमेकींच्या जवळ असतील, तर तेथील उतार तीव्र असतो.
2) नकाशावर समोच्च रेषा ……………… चे प्रतिनिधित्व करतात.
उत्तर :
नकाशावर समोच्च रेषा समान उंचीच्या ठिकाणांचे प्रतिनिधित्व करतात.
3) ………………. तील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
उत्तर :
समोच्च रेषांतील अंतरावरून उताराची कल्पना करता येते.
4) दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे ………………… तीव्र असतो.
उत्तर :
दोन समोच्च रेषांतील अंतर कमी असते तेथे उतार तीव्र असतो.
प्रश्न. 3. खालील नकाशातील भुरूपे ओळखा.

उत्तर :
नकाशातील भुरूपे – i) शिखर, ii) डोंगराळ/पर्वतीय प्रदेश, iii) नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश इत्यादी.