आपले भावनिक जग स्वाध्याय

आपले भावनिक जग स्वाध्याय

आपले भावनिक जग स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) माणूस विचारक्षम असतो, तसाच तो ………….. असतो.

उत्तर :

माणूस विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशीलही असतो.

आ) आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे …………….. गुण आहेत, त्यांचा प्रथम विचार करावा.

उत्तर :

आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत, त्यांचा प्रथम विचार करावा.

2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) व्यक्तिमत्त्व संतुलित कसे बनते ?

उत्तर :

भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व संतुलित बनते.

आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ?

उत्तर :

राग या भावनेमुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.

इ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ?

उत्तर :

आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

3. पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) भावनिक समायोजन म्हणजे काय ?

उत्तर :

भावना विचारीपणाने आवरता येणे, भावनांवर संयम ठेवता येणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, याला भावनिक समायोजन असे म्हणतात.

आ) रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ?

उत्तर :

राग वारंवार येत असेल किंवा अनावर होत असेल, तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होतात.

i) आपण रागीट व हट्टी होतो.

ii) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.

iii) रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो.

iv) आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, निरुत्साह अशा काही परिणामांना सामोरे जावे लागते. रागाचे इत्यादी दुष्परिणाम होतात.

इ) आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला का असावी ?

उत्तर :

i) प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि क्षमताही वेगवेगळ्या असतात. आपल्याला आपल्या क्षमता जशा हळूहळू समजायला लागतात, तसे आपल्याला काय येत नाही हेही समजू लागते.

ii) एखाद्या विषयात, कलेत, खेळात आपण अधिक तरबेज असतो, तर दुसऱ्या एखाद्या बाबतीत तेवढी गती नसते.

iii) आपल्या क्षमतांबरोबर आपल्यातील उणिवाही माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे प्रयत्न करून उणिवांवर मात करता येते. म्हणून आपल्यातील उणिवांची जाणीव आपल्याला हवी.

4. तुम्हांला काय वाटते ते लिहा.

अ) तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत.

उत्तर :

आमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाही. त्यावेळी शिक्षक आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे आम्हांला वाटते व त्यावेळी आम्हांला राग येतो.

आ) घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हांलाही विचारतात.

उत्तर :

घरातील निर्णय घेताना आईबाबा आम्हांला विचारतात त्यावेळी आईबाबा आमच्या आवडीनिवडीचा विचार करतात या गोष्टीचा आम्हांला फार आनंद होतो.

इ) मित्राला मोठे बक्षीस मिळाले.

उत्तर :

मित्राला मोठे बक्षीस मिळाले. त्यावेळी मला खूप आनंद झाला. हा आपला मित्र आहे. याचा मला अभिमान वाटतो.

ई) वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात.

उत्तर :

आपले कौतुक इतरांनी करणे हे सर्वानाच आवडते. तसेच वर्गातील मुले माझे कौतुक करतात. याचा मला अभिमान वाटतो.

उ) रोहनने वर्गात तुमचा अपमान केला.

उत्तर :

रोहनने वर्गात माझा अपमान केला. या गोष्टीची मला फार चिड आली. मला खूप राग आला.

5. तुम्ही या प्रसंगी काय कराल ?

अ) रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला.

उत्तर :

रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला याबद्दल तिचे अभिनंदन करू.

आ) कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही.

उत्तर :

आम्ही तिची समजूत काढू व तिला डबा खाण्यास प्रवृत्त करू.

इ) वीणा शाळेत एकटी वावरते.

उत्तर :

आम्ही तिच्याशी मैत्री करू.

ई) मकरंद म्हणतो, ‘माझा स्वभावच हट्टी आहे.’

उत्तर :

त्याला त्याच्या स्वभावात परिवर्तन करण्यास भाग पाडू.

Leave a Comment