साधी यंत्रे स्वाध्याय

साधी यंत्रे स्वाध्याय

साधी यंत्रे स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

1. आमचे वर्गीकरण करा.

तरफ, कप्पी, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभाची वरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुऱ्हाड, क्रेन, सुरी.

उत्तर :

तरफ – अडकित्ता, कात्री, ओपनर

पाचर – कुऱ्हाड, सुरी, सुई

उतरण – घसरगुंडी, जिना.

गुंतागुंतीचे यंत्र – क्रेन

चाक आणि आस – ध्वजस्तंभाची वरची चक्री

साधी यंत्रे – तरफ, उतरण, कप्पी, पाचर

2. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा.

अ. मध्यभागी ………….. असून एका बाजूला ……………. व दुसऱ्या बाजूला ……………. हा तरफेला पहिला प्रकार आहे.

उत्तर :

मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व दुसऱ्या बाजूला भार हा तरफेला पहिला प्रकार आहे.

आ. मध्यभागी …………… असून एका बाजूला ………….. व दुसऱ्या बाजूला ………….. हा तरफेला दुसरा प्रकार आहे.

उत्तर :

मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तरफेला दुसरा प्रकार आहे.

इ. मध्यभागी …………… असून एका बाजूला ……………. व दुसऱ्या बाजूला …………… हा तरफेला तिसरा प्रकार आहे.

उत्तर :

मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तरफेला तिसरा प्रकार आहे.

3. खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल ? त्यांचे प्रकार लिहा.

उत्तर :

कामे यंत्रयंत्राचा प्रकार
अ. टिनच्या डब्याचे झाकण काढणे.ओपनर उतरण
आ. उंच इमारतीवर विटा पोहोचवणे.चाक व दोरी कप्पी
इ. भाजी चिरणे.विळी/सुरी पाचर
ई. विहिरीतून पाणी काढणे.रहाट व दोरीकप्पी
उ. पापड भाजणे.चिमटा तरफ

4. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

अ. साधी यंत्रे म्हणजे काय ?

उत्तर :

दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे म्हणतात. ज्या यंत्रांची रचना साधी सोपी आहे अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. साधी यंत्रे सहज हाताळता येतात शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता कमी असते.

आ. यंत्र वापरण्याचे फायदे सांगा.

उत्तर :

श्रम कमी व्हावे, कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात. यंत्र वापरामुळे कामे लवकर होतात. तसेच जास्त बलाचा वापर करावा लागत नाही.

इ. गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय ?

उत्तर :

यंत्रामध्ये अनेक भाग असतात. एक काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होत असतात. त्यासाठी यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात म्हणून या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात.

ई. तरफ म्हणजे काय ? तरफेचे प्रकार कशावरून केलेले आहेत.

उत्तर :

शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरतात. अशा यंत्राला तरफ म्हणतात. तरफेचे बल, भार आणि टेकू हे तीन भाग असतात. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानांवर तरफेचे तीन प्रकार पडतात. i) पहिला प्रकार ii) दुसरा प्रकार iii) तिसरा प्रकार

5. असे का ?

अ. प्रवासी बॅगांना चाके असतात.

उत्तर :

कोणतीही वस्तू घरंगळत नेणे कमी श्रमाचे असते. लहान चाके असलेल्या प्रवासी बॅगा ढकलने सोपे जाते. त्यामुळे प्रवासात समान वाहून नेणे सोईचे होते. म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात.

i) चाक हे साधे यंत्र आहे.

ii) प्रवासी बॅगांना चाके लावल्यामुळे ती बॅग उचलण्यापेक्षा ती ओढत नेणे सोयीचे असते.

iii) यामुळे आपले श्रम आणि वेळही वाचतो. त्यामुळे प्रवासी बॅगांना चाके असतात.

आ. यंत्राची निगा राखावी लागते.

उत्तर :

यंत्रे वापरली जात असतांना त्यांचे भाग एकमेकांवर घासतात. धूळ बसून खराब झालेल्या भागांमध्ये अधिक घर्षण होते. हवामानाच्या परिणामाने काही भाग गंजतात. असे भाग घासले जाऊन त्यांची झीज होते. त्यामुळे यंत्रे निकामी होतात. हे टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे असते.

इ. सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे.

उत्तर :

या यंत्रामध्ये अनेक भाग आहेत. त्यांत अनेक प्रक्रिया होत असतात. या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. म्हणून यांना गुंतागुंतीची यंत्रे म्हणतात. त्यांची रचना क्लिष्ट असते. सायकलचे चाक मध्यभागी एका दांड्यावर बसवलेले असते. त्या दांड्याला आस म्हणतात. आस फिरू लागला की त्यावर बसवलेले चाकही फिरते. सायकलचे पॅडल फिरवले की चाक फिरू लागते. सायकलमध्ये अनेक भाग एकमेकांनी जोडलेले असतात. म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे.

6. खाली दिलेल्या उताऱ्यातील तरफेमध्ये टेकू, भार, बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा.

रवी व सविता बागेमध्ये एका सी-सॉ वर बसतात. दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो. तो माणूस बागेतील कचरा, दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो. नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो. सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो.

उत्तर :

टेकूभारबलतरफेचे प्रकार
सी-सॉ मध्यभागीदुसऱ्या बाजूलाएका बाजूलापहिला प्रकार
कात्री मध्यभागीदुसऱ्या बाजूलाएका बाजूलापहिला प्रकार
कचरागाडी एका बाजूलामध्यभागीदुसऱ्या बाजूलादुसरा प्रकार
लिंबू पिळणी एका बाजूलामध्यभागीदुसऱ्या बाजूलादुसरा प्रकार
चिमटा दुसऱ्या बाजूलाएका बाजूलामध्यभागीतिसरा प्रकार

Leave a Comment