माझी मराठी स्वाध्याय

माझी मराठी स्वाध्याय

माझी मराठी स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. खालील आकृत्या पूर्ण करा.

उत्तर :

उत्तर :

इ)

उत्तर :

ई)

उत्तर :

प्रश्न. 2. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

अ) विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.

उत्तर :

लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली.

आ) माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते.

उत्तर :

दूर देशी ऐकू येते, माझ्या मराठीची ओवी.

प्रश्न. 3. खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई,

तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई.

उत्तर :

माझी मराठी भाषा ही माझी आई आहे. आपल्या मूळ भावना आपण केवळ मातृभाषेतूनच व्यक्त करत असतो. थोडीशी वेदना झाली की आपण ‘अग आईग’ असं म्हणत असतो. ‘ओ माय मदर्स’ कधीच म्हणत नाही. याचाच अर्थ केवळ मराठीच आपल्या भावनांना अर्थ देते. आईचे ऋण जसे कधीच फेडता येत नाही तसेच मातृभाषा मराठीचे ऋणही कधीच फोडता येणार नाही. तिच्या ऋणात राहण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

प्रश्न. 4. खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.

1) ऋण

उत्तर :

आईचे ऋण फेडता येत नाही.

2) थोरवी

उत्तर :

मराठीची थोरवी सर्व संतानी गायिली आहे.

3) उतराई

उत्तर :

आईच्या ऋणातून कोणीही उतराई हौस शकत नाही.

4) भाषा

उत्तर :

मराठी भाषा ही माझी आई आहे.

चर्चा करूया

जागतिक मराठी राजभाषा दिनाचे तुमच्या शाळेत आयोजन करायचे आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन कराल, त्याची यादी तयार करा.

उत्तर :

i) ग्रंथदिंडी – संताच्या ग्रंथांना पालखीत बसवून मिरवणूक काढू.

ii) कार्यक्रमाचे अध्यक्ष, उद्घाटक, संचालक इ. व्यक्ती निश्चित करून त्यांची संमती घेऊन नावे निश्चित करू.

iii) मान्यवरांची भाषणे झाल्यावर मॅट्रिकच्या परीक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचा सत्कार करू.

iv) मराठीचा अभिमान जागृत होईल अशा मराठी कवितांच्या गायनाचे आयोजन करू.

v) मराठी नाटकाचा प्रयोग सादर करू.

खेळूया शब्दांशी

कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.

1) आई

उत्तर :

आई – उतराई

2) भिजली

उत्तर :

भिजली – सजली

3) थोरवी

उत्तर :

थोरवी – ओवी

कल्पक होऊया

खाली दिलेल्या भेटकार्डावर तुमच्या आवडत्या मित्र/मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश तयार करा.

उत्तर :

खालील तक्त्यात तुमच्या आवडत्या सणांची नावे लिहून त्या निमित्ताने तुमच्या मित्र/मैत्रिणीसाठी शुभेच्छा संदेश तयार करा व लिहा.

सण संदेश
गुढीपाडवास्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे !

उत्तर :

सण संदेश
गुढीपाडवास्वागत नववर्षाचे, आशा-आकांक्षांचे, सुखसमृद्धीचे, पडता दारी पाऊल गुढीचे !
गणेशोत्सवस्वागत श्री प्रथमेशा, राष्ट्रहित बुद्धी द्या सकलांना, नमन तव श्री चरणांना
दसरादसरा विजयादशमी, खलवृत्तीला शमी, शौर्य रक्ष या मातृभूमी !
दिवाळी आली आली दीपावली, अज्ञान तिमिरा दूर करी, सुखसमृद्धी घरोघरी.

Leave a Comment