10th class marathi medium question paper pdf download
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी मराठी विषयाच्या 2026 बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. मराठी प्रश्नपत्रिकेत गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूलवाचन, व्याकरण, रसग्रहण, निबंधलेखन आणि औपचारिक पत्रलेखन यांसारख्या घटकांचा समावेश असतो. दहावीच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याचा सराव, म्हणी व वाक्प्रचारांचा योग्य उपयोग, तसेच मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखात दिलेल्या मार्गदर्शक सूचना, नमुना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका लेखनाच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या पॅटर्नची सखोल माहिती मिळेल आणि आत्मविश्वासाने परीक्षा देता येईल.
विभाग-1 : गद्य
1. अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
१) आकृती पूर्ण करा.

उत्तर :

क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसेल तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे, हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ ह शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो ? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का ? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पती शोधणे.
2) चौकटी पूर्ण करा :
i) भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग –
उत्तर :
भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग – शब्दांची व्युत्पत्ती शोधणे
ii) नदीसारखी प्रवाही –
उत्तर :
नदीसारखी प्रवाही – भाषा
3) स्वमत :
‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ यं लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
उत्तर :
परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणाला शंकाही येणार नाही.
मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना ! अलीकडे “ती पिवळीवाली द्या,” “तो पांढरा वाला पट्टा दाखवा” अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता ‘पिवळी बॅग’ आणि ‘पिवळीवाली बॅग’ यांत कोणता फरक आहे ? ‘पिवळी बॅग’ या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना ‘पिवळीवाली’ हा नवीन शब्दप्रयोग का करावा ? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत ‘वाला’ ह प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. ‘पिवळी’ हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला ‘वाला’ ह प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थ मध्ये कोणतीही भर पडत नाही.
आ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनूसार कृती करा :
1) कारणे लिहा :
i) झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण ………………
उत्तर :
झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असत.
ii) झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण ………………
उत्तर :
झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी
जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच-सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणतीही गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत.
2) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा.
i) पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात –
उत्तर :
चूक
ii) आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो –
उत्तर :
चूक
iii) आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे –
उत्तर :
बरोबर
iv) आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल –
उत्तर :
बरोबर
3) स्वमत :
आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पत्ते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला ह विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल ? कोन समजून घेईल ? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.
अपठित गद्य
इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1) कृती करा :

उत्तर :

काही दिल्याशिवाय काही मिळत नसतं किंबहुना मिळेल त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती असेल, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल, तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता. तुमच्याबद्दल इतरांना आदर, विश्वास वाटू लागतो. तुम्हांला हवं ते सहकार्य मिळू लागतं. लोक तुमचं ऐकू लागतात. अधिक देण्याच्या/करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हांला ताठ मानेनं वावरता येतं. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो. परिणामी तुम्हांला अधिक यश मिळू लागतं.
कामाची माणसं सर्वांनाच हवी असतात. तुम्ही ‘कामाचे’ आहात काय ? चालढकल करणारी मंडळी फक्त काम नव्हे, आपलं ‘यश’ च पुढे ढकलत असतात. काही वेळा यशाची संधी कायमची गमावून बसतात. उद्या करू म्हणणाऱ्यांचा ‘उद्या’ कधीच उजाडत नसतो.
2) आकृती पूर्ण करा.

उत्तर :

विभाग – 2 : पद्य
2. अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :
1) आकृतिबंध पूर्ण करा :

उत्तर :

श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेणें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची॥१॥
वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेऊं नये। येकायेकीं॥२॥
जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं॥३॥
तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं॥४॥
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्या विण करूं नये। कार्य कांही॥५॥
सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं नये। कांही केल्या॥६॥
कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वातघात॥७॥
व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊ नये।
आपलें वोझें घालूं नये। कोणीयेकासि॥८॥
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा॥९॥
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची॥१०॥
2) आकृती पूर्ण करा :

उत्तर :

3) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करूं नये। कार्य कांही॥
उत्तर :
‘उत्तम लक्षण’ यं कवितेमध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस ह माणसाचा शत्रू आहे, असे ठासून प्रतिपादिले आहे.
‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही व त्यामुळे बरीच कामे खोळंबून राहतात.
‘आळसे कार्यभाग नासतो !’ या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्त्व सांगितले आहे.
माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात, त्यात ‘आळस’ ह एक विकार आहे. दैनंदिन कामांमध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही. म्हणून आळसात सुख मानू नये, समाधान मानू नये, असे समर्थ रामदास सांगतात.
4) काव्यसौंदर्य :
खालील काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा :
‘सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।’
उत्तर :
‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यांपैकी एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले जाते.
मनुष्य ह समजाप्रिय प्राणी आहे. माणसांमध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीने वर्तन कसे असावे, हे सांगताना संत रामदास म्हणतात – सभेमध्ये वावरताना, आपले मत मांडताना कधीही लाजू नये. स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे; परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. निरर्थक असे वक्तव्य करू नये. बाष्कळपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण यं ओवीतून मांडले आहे.
आ) खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा :
| ‘भरतवाक्य’ किंवा | ‘आश्वासक चित्र’ | |
|---|---|---|
| i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवीयित्री – | ||
| ii) प्रस्तुत कवितेचा विषय – | ||
| iii) प्रस्तुत कविता आडवण्याची वा न आवडण्याची कारणे – |
उत्तर :
| ‘भरतवाक्य’ किंवा | ‘आश्वासक चित्र’ | |
|---|---|---|
| i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवीयित्री – | मोरोपंत | नीरजा |
| ii) प्रस्तुत कवितेचा विषय – | सज्जन माणसाचे महत्त्व | स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटणे |
| iii) प्रस्तुत कविता आडवण्याची वा न आवडण्याची कारणे – | ‘आश्वासक चित्र’ ही कविता मला आवडते, कारण कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे अतिशय हळुवार व आशादायक चित्र साध्या-सोप्या भाषेत रेखाटले आहे. पुरुष घरकामात व मुलांच्या संगोपनात सहभागी होताना आणि स्त्री मुक्तपणे स्वतःच्या स्वप्नांचा विचार करताना दाखवून, कविता कोणालाही दोष न देता समानतेचा आश्वासक संदेश देते, म्हणून ती मनाला भावते. | ‘भरतवाक्य’ ही कविता मला आवडते, कारण कवी मोरोपंतांनी चंदन, गंगा, सूर्य यांसारख्या समर्पक दृष्टान्तांच्या साहाय्याने सज्जन माणसाचे परोपकारी व निरपेक्ष स्वभाव अत्यंत प्रभावीपणे उलगडून दाखवले आहे. आर्या वृत्तातील नादमधुर व सोप्या भाषेतील ही रचना सज्जनांच्या गुणांचे अनुकरण करण्याची प्रेरणा देते, म्हणून ही कविता मनाला भिडते. |
इ) खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा :
‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडवीत
तुझा संघर्ष असा की
कठ्यांच्या सांगिनी व्हाव्यात’.
उत्तर :
1) आशयसौंदर्य :
प्रस्तुत ओळींमधून कवीने/कवयित्रीने व्यक्तीच्या शब्दांचे आणि संघर्षाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. “तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत” या ओळीतून त्या व्यक्तीच्या शब्दांची ताकद इतकी मोठी आहे की, मोठमोठी महाकाव्येही तिच्यापुढे तुच्छ वाटावीत, इतके सामर्थ्य तिच्या वाणीत आहे, असे सुचवले आहे. तसेच “तुझा संघर्ष असा की कठ्यांच्या सांगिनी व्हाव्यात” या ओळीतून तिचा संघर्ष इतका प्रेरणादायी व महान आहे की, पुढील पिढ्यांसाठी तो एक गोष्ट (कथा) बनून सांगितला जावा, इतके त्याला ऐतिहासिक व प्रेरक मूल्य प्राप्त व्हावे, असा विचार व्यक्त होतो.
2) काव्यसौंदर्य (भाषिक वैशिष्ट्ये) :
कवीने अत्यंत मोजक्या व समर्पक शब्दांत गहन विचार मांडला आहे. ‘महाकाव्ये पायाजवळ गळून पडणे’ आणि ‘संघर्षाच्या कहाण्या होणे’ या प्रतिमा अत्यंत प्रभावी व कल्पक आहेत. साध्या-सोप्या भाषेतून व्यक्तीच्या सामर्थ्याचा गौरव करणारी ही रचना वाचकाच्या मनावर खोलवर परिणाम करते.
3) प्रस्तुत ओळी आवडण्याचे कारण :
या ओळी मला आवडतात, कारण त्यांतून संघर्षमय जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या शब्दांतील व कृतीतील सामर्थ्याचा प्रभावी गौरव केला आहे. तिचे शब्द व संघर्ष हे इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरतात, हा विचार अंतर्मुख करणारा व स्फूर्तिदायक आहे.
विभाग – 3 : स्थूलवाचन
3. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
1) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.
उत्तर :
गिरिजाबाईंनी बालकांसाठीही लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी, तसेच खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. सर्वसाधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात असा समज असतो, पण गिरिजाबाईंनी या समजाला छेद देत वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन त्यांनी लेखन केले. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली – नाटिकांमधला प्रसंग जणू समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते, त्यामुळे प्रेक्षक त्या पाहताना खिळून बसतात. एकंदरीत, गिरिजा कीर यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
2) ‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेल प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे ‘वीरांगना’ पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
उत्तर :
‘वीरांगना’ या पाठात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलातील सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या स्तुत्य सामाजिक कार्याचा परिचय दिला आहे. रेखाजींनी आपल्या नोकरीकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता एक सामाजिक कार्य म्हणून पाहिले, आणि विविध कारणांनी घराला दुरावलेल्या, भरकटलेल्या, चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित केले. अवघ्या दीड वर्षांत त्यांनी ४३४ मुलांची सुटका केली.
अशा मुलांना समजावणे सोपे नसते, कारण या वयात मुलांच्या भावना सैरभैर झालेल्या असतात. मात्र रेखाजींनी कठोरतेऐवजी प्रेमाचा मार्ग स्वीकारला – त्यांनी मुलांशी मैत्री केली, आईसारखी ममता दाखवली, त्यांना प्रेमाने समजावून सांगितले, कायद्याची भीती घातली आणि पुढील आयुष्यातील भीषण परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांच्या या कुशल व ममतापूर्ण प्रयत्नांमुळे अनेक मुले गैरप्रवृत्तीला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला तयार झाली आणि सुरक्षितपणे स्वगृही परतली.
यावरून हे स्पष्ट होते की, भरकटलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या व सन्मार्गाच्या प्रवाहात आणण्याचे रेखाजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवण्याचेच कार्य असून, ते निश्चितच प्रशंसनीय आहे.
3) व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहा.
उत्तर :
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे ‘व्युत्पत्ती कोश’!
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :
(१) शब्दाचे मूळ रूप दाखवणे : मराठी भाषेतील – प्रमाण व बोली – शब्दांचे मूळ रूप कसे होते, हे व्युत्पत्ती कोशातून समजते. उदा. मराठीतील ‘आग’ हा शब्द संस्कृतमधील ‘अग्नि’ या शब्दापासून आला आहे.
(२) उच्चारातील बदल व फरक दाखवणे : विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दाच्या उच्चारात कालांतराने बदल होत असतो. हा उच्चारातील बदल व फरक व्युत्पत्ती कोशातून दाखवला जातो. उदा. संस्कृतमधील ‘दीपावली’ या शब्दाचे मराठीत ‘दिवाळी’ असे सुटसुटीत रूप बनले.
(३) बदलांचे कारण स्पष्ट करणे : भाषेत इतिहासाच्या दृष्टीने भिन्न भिन्न काळांत जे शब्दबदल होतात, त्या बदलांमागील कारणे (उदा. शब्द सुलभ करण्याची प्रवृत्ती किंवा भाषांचा परस्पर संपर्क) व्युत्पत्ती कोश स्पष्ट करतो.
(४) अर्थातील बदल स्पष्ट करणे : काळानुसार शब्दांच्या अर्थात होणारे बदल आणि नवे रूढ होणारे अर्थ यांचीही नोंद व्युत्पत्ती कोशात असते. उदा. ‘शहाणा’ या शब्दाचा मूळ अर्थ हुशार/बुद्धिमान असा असला, तरी सध्या ‘अतिशहाणा’ हाही अर्थ रूढ झाला आहे.
अशा प्रकारे, भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे.
विभाग – 4 भाषाभ्यास
4. अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती :
1) समास :
योग्य जोड्या लावा :
| सामासिक शब्द | सामासाचे नाव |
|---|---|
| i) नीलकमल | द्विगू समास |
| ii) नवरात्र | कर्मधारय समास |
| वैकल्पिक द्वंद्व समास |
उत्तर :
| सामासिक शब्द | सामासाचे नाव |
|---|---|
| i) नीलकमल | कर्मधारय समास |
| ii) नवरात्र | द्विगू समास |
2) शब्दसिद्धी :
दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा :
(कारागिरी, हुरहुर, लाललाल, अतिरेक)
| प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
|---|---|---|
| कारागिरी | अतिरेक | हुरहुर, लाललाल |
3) वाक्प्रचार :
खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
i) सटकी मारणे
उत्तर :
अर्थ : भरधाव वेगाने पळून जाणे/ निसटून जाणे.
वाक्य : पोलिसांना पाहताच चोर तिथून सटकी मारून पळून गेला.
ii) कान देऊन ऐकणे
उत्तर :
अर्थ : लक्षपूर्वक ऐकणे
वाक्य : शिक्षक जे काही शिकवत होते, ते विद्यार्थ्यांनी कान देऊन ऐकले.
iii) पित्त खवळणे
उत्तर :
अर्थ : अतिशय संतापणे, खूप चिडणे
वाक्य : मुलाने पुन्हा पुन्हा खोटे बोललेले पाहून वडिलांचे पित्त खवळले.
iv) अचंबित होणे
उत्तर :
अर्थ : आश्चर्यचकित होणे
वाक्य : गिर्यारोहकाने एकट्याने एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे ऐकून सर्वजण अचंबित झाले.
आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
1) शब्दसंपत्ती :
1) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
i) घर –
उत्तर :
घर – सदन
ii) नदी –
उत्तर :
नदी – सरीता
2) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
i) रात्र x
उत्तर :
रात्र x दिवस
ii) हजर x
उत्तर :
हजर x गैरहजर
3) खालील शब्दांचे वचन बदला :
i) पुस्तक –
उत्तर :
पुस्तक – पुस्तके
ii) झाडे –
उत्तर :
झाडे – झाड
4) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इमानदार – [ इमान व दार हे शब्द वगळून ]
उत्तर :
मान, नर
2) लेखननियमांनुसार लेखन :
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार अचूक शब्द ओळखा :
(कोणतेही चार शब्द सोडवणे)
i) सहानूभूती/सहानुभूती/सहानुभुती/सहानुभूति
उत्तर :
सहानुभूती
ii) अभिव्यक्ती/अभीव्यक्ती/अभिव्यक्ति/अभीव्यक्ति
उत्तर :
अभिव्यक्ती
iii) क्रियाशिल/क्रीयाशील/क्रियाशील/क्रीयाशिल
उत्तर :
क्रियाशील
iv) कितर्न/किर्तन/कीर्तन/कीतर्न
उतर :
किर्तन
v) शिरोधार्य/शीरोधार्य/शीरोर्धाय/शिरोर्धाय
उत्तर :
शिरोधार्य
vi) आर्शिवाद/आर्शीवाद/आशिर्वाद/आशीर्वाद
उत्तर :
आशीर्वाद
3) खालील विरामचिन्हे ओळखा :
| विरामचिन्हे | नाव |
|---|---|
| i) ? | |
| ii) ! |
उत्तर :
| विरामचिन्हे | नाव |
|---|---|
| i) ? | प्रश्नचिन्ह |
| ii) ! | उद्गारवाचक चिन्ह |
4) पारिभाषिक शब्द :
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा :
i) Bio-data
उत्तर :
स्व-परिचय पत्र
ii) Mobile
उत्तर :
भ्रमणध्वनी
विभाग – 5 : उपयोजित लेखन
5. अ) खालील कृती सोडवा :
1) पत्रलेखन :
खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा :

उत्तर :
ता. 20 डिसेंबर 2025
प्रति,
मा. व्यवस्थापक,
ज्ञानसागर पुस्तकालय,
104, प्रगतीनगर,
नाशिक.
विषय : वर्धापनदिनानिमित्त पुस्तकांच्या सवलतीबाबत
महोदय,
आपल्या ज्ञानसागर पुस्तकालयाच्या वर्धापनदिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर 25% विशेष सवलत जाहीर केल्याचे समजले. ही सवलत दिनांक 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत उपलब्ध आहे, याची नोंद घेतली आहे.
मला काही मराठी साहित्यिक कादंबऱ्या व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ पुस्तके खरेदी करवयाची असून त्यासाठी आपल्या पुस्तकालयात सध्या कोणकोणती पुस्तके उपलब्ध आहेत, याची यादी मला ई-मेलद्वारे पाठवावी, ही विनंती. तसेच सवलतीचा लाभ घेण्यासाठी काही विशेष अटी असल्यास त्याही कळवाव्यात.
आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
आपला विश्वासू
(विद्यार्थ्याचे नाव)
पत्ता : राहुल नगर, सरकारी हॉस्पिटल जवळ, नाशिक
मोबाईल क्र. : 123457899
Email : abcd@email.com

पत्र क्र. 1 : शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र
प्रति,
व्यवस्थापक,
ज्ञानदीप बुक डेपो,
लातूर.
विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी.
महोदय,
सप्रेम नमस्कार.
मी भग्येश शिंदे, आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेच्या ग्रंथालयात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची संदर्भ पुस्तके, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, विज्ञान, साहित्य तसेच चरित्रग्रंथांची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध होत नाहीत.
आपल्या पुस्तक विक्री केंद्रात विविध विषयांची दर्जेदार पुस्तके उपलब्ध असल्याचे आम्हाला समजले आहे. तरी कृपया आवश्यक पुस्तकांची यादी संलग्न मानून ती पुस्तके शक्य तितक्या लवकर सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत. तसेच शाळेसाठी विशेष सवलत असल्यास ती द्यावी, ही विनंती.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेसह.
आपला विश्वासू,
भग्येश शिंदे
विद्यार्थी प्रतिनिधी
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, लातूर.
पत्र क्र. 2 : पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना राबवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र
प्रति,
व्यवस्थापक,
ज्ञानदीप बुक डेपो,
लातूर.
विषय : पुस्तक खरेदीवरील विशेष सवलत योजनेबद्दल अभिनंदन.
महोदय,
सप्रेम नमस्कार.
मी भग्येश शिंदे, आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आपल्या पुस्तक विक्री केंद्रात विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना सुरू केल्याचे समजले. या उपक्रमाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
आजच्या काळात पुस्तकांच्या वाढत्या किमतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके खरेदी करणे कठीण जाते. अशा वेळी आपण सुरू केलेली सवलत योजना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी दर्जेदार पुस्तके खरेदी करून वाचनाची सवय जोपासतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
आपला हा उपक्रम भविष्यातही अशाच उत्साहाने सुरू राहावा, ही सदिच्छा व्यक्त करतो.
आपला विश्वासू,
भग्येश शिंदे
विद्यार्थी प्रतिनिधी
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय, लातूर.
किंवा
2) विभाग – 1 : गद्य (इ) [ प्र. क्र. 1 (इ) ] महडील अपठित गद्य उताऱ्याचा एक-तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा :
1) जाहिरातलेखन :

खालील मुद्द्यांच्या आधारे ‘फळांच्या दुकानाची’ आकर्षक जाहिरात तयार करा.
उत्तर :

2) बातमीलेखन :
खालील विषयावर बातमी तयार करा :
‘ज्ञानदीप विद्यालय’, वाई येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा करण्यात आला.
उत्तर :
ज्ञानदीप विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
वाई, दि. ५ सप्टेंबर (प्रतिनिधी) :
येथील ज्ञानदीप विद्यालयात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे, गीते, नृत्य, नाटिका व मनोगते सादर केली. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून अध्यापनाचा अनुभव घेतला. मुख्याध्यापकांनी शिक्षकांचे समाजातील महत्त्व विशद केले व विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
वार्ताहर
3) कथालेखन :
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
शालेय सहलीचे नियोजन – विद्यार्थ्यांमध्ये उत्साह – प्रत्सक्ष सहलीचा दिसव उगवणे – सहलीला सुरुवात – गाडीचा डोंगर-दऱ्यांतून प्रवास – अचानक पाऊस – चालकाचे प्रसंगावधान – विद्यार्थ्यांचे सहकार्य – वैशिष्ट्यपूर्ण, अविस्मरणीय प्रसंग – एकीचे दर्शन.
उत्तर :
एकीचे बळ
आमच्या शाळेने महाबळेश्वर येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते. सहलीची घोषणा होताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वजण सहलीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रत्यक्ष सहलीचा दिवस उजाडला. सकाळी लवकर सर्व विद्यार्थी शाळेत जमले. शिक्षकांनी आवश्यक सूचना दिल्यानंतर बस आनंदाच्या वातावरणात निघाली.
गाडी डोंगर-दऱ्यांतून वळणावळणाच्या रस्त्याने पुढे जात होती. हिरवीगार झाडे, धबधबे आणि निसर्गसौंदर्य पाहून विद्यार्थी आनंदित झाले होते. गाणी, विनोद आणि खेळ यांमुळे प्रवास अधिक रंगतदार झाला.
अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ता निसरडा झाल्याने बस घसरू लागली. चालकाने प्रसंगावधान राखत बस सावधपणे रस्त्याच्या कडेला उभी केली. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या. काही विद्यार्थ्यांनी लहान मुलांना धीर दिला, तर काहींनी शिक्षकांना आवश्यक मदत केली. पाऊस कमी झाल्यानंतर सर्वांच्या सहकार्याने बस सुरक्षितपणे पुढे निघाली.
या प्रसंगामुळे सर्वांना एकीचे आणि शिस्तीचे महत्त्व समजले. सहल आनंदात पूर्ण झाली; पण संकटाच्या वेळी दाखवलेले धैर्य, चालकाचे प्रसंगावधान आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य हा अनुभव सर्वांच्या कायम स्मरणात राहिला.
तात्पर्य : एकीमध्येच खरे बळ असते; संकटाच्या वेळी शांतता, धैर्य आणि सहकार्य यांमुळेच यश मिळते.
इ) लेखनकौशल्य :
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा :
1) प्रसंगलेखन

वरील समारंभास प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघातील विजेत्या संघातील खेळाडू या नात्याने तुम्ही उपस्थित होतात, अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
उत्तर :
२४ डिसेंबर हा दिवस माझ्यासाठी कायमचा अविस्मरणीय ठरला. आमच्या शाळेच्या कबड्डी संघाने आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभाला विजेत्या संघातील खेळाडू म्हणून उपस्थित राहण्याचा मला मान मिळाला.
समारंभ दुपारी ४.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाला. व्यासपीठ सुंदर फुलांनी सजविले होते. प्रमुख पाहुण्या श्रीमती रेखा विचारे आणि समारंभाच्या अध्यक्षा श्रीमती विदुला पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मेहनत, शिस्त आणि सांघिक भावनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी खेळामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही प्रगती करावी, असा संदेश देण्यात आला.
त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू झाला. आमच्या संघाचे नाव प्रथम क्रमांकासाठी जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आम्हाला चषक, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तो आनंदाचा क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि अविस्मरणीय होता. आमच्या क्रीडा शिक्षकांचे आणि सहकाऱ्यांचे आम्ही मनापासून आभार मानले.
राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरला.
2) आत्मकथन :
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकाचे आत्मकथन लिहा.

उत्तर :
नमस्कार मित्रांनो! मी भ्रमणध्वनी, म्हणजेच तुमचा मोबाईल. आज मी माझे मनोगत तुमच्यासमोर मांडत आहे.
माझी निर्मिती माणसाचे जीवन अधिक सोपे, जलद आणि सुलभ करण्यासाठी झाली. सुरुवातीला मी केवळ संवाद साधण्याचे साधन होतो; परंतु आज मी शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन, ऑनलाइन व्यवहार, माहितीचे आदान-प्रदान आणि आपत्कालीन सेवांसाठीही उपयुक्त ठरलो आहे. त्यामुळे माझे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे.
विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेतात, शेतकरी हवामानाची माहिती मिळवतात, व्यापारी व्यवहार करतात आणि कुटुंबातील दूरवर राहणारे सदस्य एकमेकांशी क्षणार्धात संपर्क साधतात. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. माझ्यामुळे अनेकांचे काम सोपे झाले आहे, याचा मला अभिमान वाटतो.
परंतु माझा अतिवापर होताना पाहून मला खंतही वाटते. अनेक जण माझ्या आहारी जाऊन अभ्यास, खेळ, कुटुंब आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काहीजण खोटी माहिती पसरवतात किंवा माझा गैरवापर करतात. अशा वेळी मला खूप वाईट वाटते.
म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे – माझा वापर गरजेपुरता आणि योग्य कारणासाठी करा. वेळेचे भान ठेवा, प्रत्यक्ष संवादाला महत्त्व द्या आणि माझा सुयोग्य वापर करून स्वतःचे व समाजाचे जीवन अधिक समृद्ध करा. तेव्हाच माझ्या निर्मितीचा खरा उद्देश सफल होईल.
3) वैचारिक :
‘झाडे लावा-झाडे जगवा’, या विषयावर तुमचे विचार लिहा.
उत्तर :
आजच्या आधुनिक युगात वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल ही गंभीर समस्या बनली आहे. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे ‘झाडे लावा – झाडे जगवा’ हा संदेश.
झाडे आपल्याला प्राणवायू देतात, कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि वातावरण शुद्ध ठेवतात. पाऊस पाडण्यासाठी, भूजल पातळी टिकवण्यासाठी, मृदाक्षरण रोखण्यासाठी तसेच पक्षी व प्राण्यांना निवारा देण्यासाठी झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. झाडांमुळे पृथ्वीचे सौंदर्य वाढते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यामुळे तापमान वाढ, दुष्काळ, पूर आणि नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत आहे. म्हणून केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे संगोपन करून ती जगवणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याची नियमित काळजी घेतली पाहिजे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि शासन यांनीही वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने जनजागृती करावी.
‘एक झाड – शंभर उपकार’ हे लक्षात ठेवून प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला, तर भावी पिढीला स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावर