ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय इयत्ता दहावी

ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय इयत्ता दहावी इतिहास

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१) लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या …………………. या चित्राला समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

अ) नेपोलियन

ब) मोनालिसा

क) हॅन्स स्लोअन

ड) दुसरा जॉर्ज

उत्तर :

लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राला समावेश लुव्र संग्रहालयात आहे.

२) कोलकाता येथील ……………… हे भारतातील पहिले संग्रहालय होय.

अ) गव्हर्मेंट म्युझियम

ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

ड) भारतीय संग्रहालय

उत्तर :

कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.

१) महाराज सयाजीराव विद्यापीठ – दिल्ली

२) बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी

३) अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी – अलिगढ

४) जिवाजी विद्यापीठ – ग्वालियर

उत्तर :

चुकीची जोडी : महाराज सायजीराव विद्यापीठ – दिल्ली

दुरुस्त जोडी : महाराज सायजीराज विद्यापीठ – वडोदरा

२. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१) अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात.

उत्तर :

i) ग्रंथालये प्राचीन ग्रंथांचे जतन आणि संवर्धन करतात; तर जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत, त्यांचे जतन अभिलेखागारांत केले जाते.

ii) ग्रंथांच्या जतनाबरोबरच त्यांचे संशोधन करणे, ऐतिहासिक सत्याचा शोध लावणे ही कामेही ग्रंथालयांकडून केली जातात.

iii) इतिहासाची ही सर्व साधने हा आपला ऐतिहासिक ठेवा असून तो लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते.

iv) या ऐतिहासिक घटना, व्यक्तींची चरित्रे व इतिहासाच्या शोधांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, म्हणून अभिलेखागारे व संग्रहालये नियतकालिके आणि अन्य प्रकाशने प्रसिद्ध करतात.

२) विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

उत्तर :

i) इतिहासाची साधने मिळवणे, सूची तयार करणे, साधनांचे जतन करणे, ती प्रदर्शित करणे अशी विविध कामे काळजीपूर्वक करावी लागतात.

ii) प्रत्येक कामाचे कौशल्य वेगवेगळे असते. प्रत्येक कामाची कृती वेगवेगळी असते. पूर्वतयारीही वेगवेगळी करावी लागते.

iii) या सर्व कृती करताना कोणती सावधानता बाळगली पाहिजे, हे माहीत असले पाहिजे.

iv) प्रशिक्षणाखेरीज या बाबी कळू शकत नाहीत; म्हणून विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.

३. टीपा लिहा.

१) स्थल कोश

उत्तर :

i) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.

ii) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद ‘स्थानपोथी’ या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.

iii) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी ‘प्राचीन भारतीय स्थल कोशाची’ रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी-फारशी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.

iv) स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

२) विश्वकोश

उत्तर :

i) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली ‘महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा’ ची स्थापना केली.

ii) मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता.

iii) या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० खंड प्रसिद्ध झाले आहेत.

iv) मराठी विश्वकोश हा सर्वविषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत.

३) संज्ञा कोश

उत्तर :

i) कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की, त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासाची वसाहतवाद व साम्राज्यवाद उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात.

ii) वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना ‘संज्ञा कोश’ असे म्हणतात.

iii) संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते.

iv) म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांने ज्ञान मिळते व त्याचे मनोरंजनही होते.

४) सरस्वती महाल ग्रंथालय

उत्तर :

i) सोळाव्या-सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे ‘सरस्वती महाल ग्रंथालय’ बांधले गेले.

ii) व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले.

iii) या ग्रंथालयात सुमारे ४९००० ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाच फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत.

iv) हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने १९१८ मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

४. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे ?

उत्तर :

ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.

i) ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, व त्वरित सांगता येत शकते. वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात नाही.

ii) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विध्वंस होत नाही.

iii) व्यवस्थापक जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.

iv) एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान मिळते.

v) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक बाचकांना उपलब्ध होऊ शकतात.

vi) कल्पक व्यवस्थापक ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढवण्यासाठी ग्रंथाचे प्रदर्शन भरवणे, जाहिरात करणे अशा विविध मार्गांचा अवलंब करून ग्रंथालयाचा विस्तार करतात. यासाठी ग्रंथालय व्यवस्थापन उत्तम असणे महत्त्वाचे असते.

२) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत ?

उत्तर :

अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्त्वाची असतात –

i) महत्त्वाच्या नोंदी असलेली कागदपत्रे, त्यांत कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीयता जपणे.

ii) कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. ही कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे.

iii) जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादींपासून संरक्षण करणे.

iv) अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अमलात आणणे. संगणकीक प्रणालीचा वापर करणे.

v) विभागीय आणि स्थानिक अभिलेखागारे स्थापन करून महत्त्वाच्या बाबी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियतकालिके व अन्य प्रकाशने प्रसिद्ध करणे.

vi) राष्ट्राचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे.

vii) अभिलेखागाराची दैनंदिन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने यंत्रणा निर्माण करणे.

५. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :

Leave a Comment