प्रदूषण स्वाध्याय

प्रदूषण स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. खाली काही वाक्ये दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगा.

अ. दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते.

उत्तर :

हवा प्रदूषण

आ. पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो.

उत्तर :

जल प्रदूषण

इ. बरेचदा बगीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो.

उत्तर :

हवा प्रदूषण

ई. काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही.

उत्तर :

मृदा प्रदूषण

उ. जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात.

उत्तर :

हवा प्रदूषण

2. परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्या वाक्यात आलेत ते नोंदवा.

निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता आठवीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो, शाळेत जाण्यासाठी त्याला एक तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेल अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेंव्हा गावात फिरला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले, अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती, काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला.

उत्तर :

प्रदूषणाचे विविध प्रकार दर्शवणारी वाक्ये पुढीलप्रमाणे :

i) शाळेत जाताना त्याला वाटेल अनेक चार चाकी, दोन चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. – हवा प्रदूषण

ii) काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. – हवा प्रदूषण

iii) निलेश जेंव्हा गावात फिरला तेंव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले. – मृदा प्रदूषण

iv) अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती. – हवा प्रदूषण

v) काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. – जल प्रदूषण

vi) काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला. – जल प्रदूषण

3. ‘अ’ व ‘ब’ स्तंभाची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.

‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणीअ. मतिमंदत्व
2. मिथेन वायूब. अर्धाग वायू
3. शिसेमिश्रित पाणीक. फुफ्फुयांवर सूज येणे
4. सल्फर डायऑक्साइडड. त्वचेचा कॅन्सर
5. नायट्रोजन डायऑक्साइडइ. डोळे चुरचुरणे

उत्तर :

‘अ’ स्तंभ‘ब’ स्तंभ
1. कोबाल्टमिश्रित पाणीब. अर्धाग वायू
2. मिथेन वायूड. त्वचेचा कॅन्सर
3. शिसेमिश्रित पाणीअ. मतिमंदत्व
4. सल्फर डायऑक्साइडइ. डोळे चुरचुरणे
5. नायट्रोजन डायऑक्साइडक. फुफ्फुयांवर सूज येणे

4. चूक की बरोबर ठरवा.

अ. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही.

उत्तर :

चूक

आ. विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते.

उत्तर :

चूक

5. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

अ. प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय ?

उत्तर :

नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.

परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर) घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात.

आ. आम्लपर्जन्य म्हणजे काय ?

उत्तर :

i ) कोळसा, लाकूड, खनिज तेल सांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात.

ii) ही ऑक्साइडे पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.

iii) ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्ल पर्जन्य म्हणतात.

इ. हरितगृह परिणाम म्हणजे काय ?

उत्तर :

पृथ्वीभोवतालच्या वातावरणात कार्बन डायऑक्साइड अगदी कमी प्रमाणात आहे. 

हा वायू सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहते. हाच हरितगृह परिणाम होय. 

मागील अनेक वर्षापासून CO2 चे प्रमाण वाढत चालले आहे. अर्थात पृथ्वीच्या तापमानवर याचा परिणाम होत आहे. 

CO2 सारखा ऊर्जा शोषणाचा गुणधर्म असणारे अन्य वायू उदा. नायट्रेड ऑक्साइड, मिथेन व CFC हे सुद्धा पृथ्वीच्या तापमानावर परिणाम करीत आहेत. यातून जागतिक तापमान वाढ होत आहे. ह्या सर्व परिणामास हरितगृह परिणाम म्हणतात. 

ई. दृश्य प्रदूषके व अदृश्य प्रदूषके कोणती ?

उत्तर :

दृश्य प्रदूषके – जे प्रदूषणकारी पदार्थ डोळ्यांना सहज दिसतात त्यांना दृश्य प्रदूषके म्हणतात.

उदा. – i) जैव वैद्यकीय कचरा ii) धन कचरा iii) खते व कीटकनाशकांचा वापर iv) सांडपाणी  v) औद्योगिक क्षेत्रातील कचरा. 

अदृश्य प्रदूषके – जे प्रदूषणकारी पदार्थ पाण्यात अथवा हवेत संपूर्णपणे मिसळून गेल्यामुळे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना अदृश्य प्रदूषके म्हणतात.

उदा. – i) ध्वनी प्रदूषण ii) किरणोत्सारी पदार्थातून निघणारी किरणे iii) वेगवेगळ्या प्रकारचे तरंग. 

6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण यांची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.

उत्तर :

हवा प्रदूषण – i) कारखान्यातून निघणारा SO2 ii) वाहनाचा धूर

जल प्रदूषण – i) जैविक जल प्रदूषके – शैवाळ ii) सेंद्रिय जल प्रदूषके – किटकनाशक 

मृदा प्रदूषण – i) घन कचरा – घरातून निघणारा ii) जैव वैद्यकीय कचरा – दवाखान्यातून निघणारा

आ. वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते ? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा.

उत्तर :

इंधनाच्या अर्धवट ज्वलनाने वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. या धुरामध्ये सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाॅक्साईड, हायड्रोजन सल्फाइड यांसारखे विषारी वायू असतात. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या या विषारी वायूमुळे हवा प्रदूषण होते.

कमीत कमी प्रदूषणकारी वाहने :

i) विजेवर (बॅटरीवर) चालणारी वाहने

ii) सी. एन. जी. वर चालणारी वाहने

iii) सौर उर्जेवर चालणारी वाहने

इ. जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा.

उत्तर :

जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे :

i) पाण्यात जलपर्णी, शैवाल यासारख्या वनस्पतींची वाढ होऊन जल प्रदूषण होते.

ii) कुजणारे पदार्थ मिसळून पाणी प्रदूषण होते.

iii) नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे गाळ निर्माण होऊन पाणी प्रदूषण होते.

iv) जमिनीची धूप झाल्याने अनेक सूक्ष्मजीव, जैविक, अजैविक घटक पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होते.

v) जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत येऊन पाणी प्रदूषण होते.

ई. हवा प्रदूषण वर कोणतेही चार प्रतिबंधात्मक उपाय सुचवा.

उत्तर :

हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 

i) वाहन व कारखान्यामधून निघणारा धूर – वाहने व कारखाने यांच्यावर नियंत्रण असावे. वारंवार तपासणी व्हावी. 

ii) कीडनाशके – याचा वापर कमी करावा. CFC निर्मितीवर बंधन आणावे. 

iii) आग, कचरा, जाळणे – शक्यतो कोणताही कचरा उघड्यावर जाळू नये. 

iv) सडणे कुजणे यापासून निघणारे वायू – वास येणारे, सडणारे, कुजणारे पदार्थ ताबडतोड नष्ट करावेत. 

उ. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा./परिणाम सांगा.

उत्तर :

वातावरणात कार्बन डाय ऑक्साइड असतो. हा वायू सूर्याची पृथ्वीपृष्ठभागावरून उत्सर्जित झालेली उष्णता शोषून घेतो. त्यामुळे उष्णता पुन्हा परत न जाता वातावरणातच साठते. या परिणामालाच हरितगृह परिणाम म्हणतात. 

वातावरणातील CO2 च्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात साठवून ठेवलेली ऊर्जा सुद्धा वाढत जाते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. तर CO2 चे प्रमाण  नियंत्रित करता आले तर जागतिक तापमान सुद्धा नियंत्रित करता येईल. अर्थात हरितगृह परिणामाचा सरळ संबंध जागतिक तापमानांशी आहे. हे तापमान असेच वाढत राहिले तर त्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळू लागेल व परिणामी समुद्रपातळी वाढेल. 

ऊ. हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण व पाणी प्रदूषण यावर प्रत्येकी दोन-दोन घोष वाक्ये तयार करा.

उत्तर :

घोष वाक्ये – 

हवा प्रदूषण –

i) झाडे लावा, झाडे जगवा – शुद्ध हवा मिळवा. 

ii) कचरा जाळणे टाळा – शुद्ध हवा मिळवा. 

पाणी प्रदूषण –

i) पाणी वाचवा, जीवन जगवा – पाणी फेकू नका, पाणी वाचवा. 

मृदा प्रदूषण –

i) रासायनिक खते टाळा सकस – अन्न मिळवा. 

ii) ओल्या कचऱ्यापासून खत तयार करा – मृदा प्रदूषण टाळा. 

7. खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा.

सांडपाणी, धूळ, परागकण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, किटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा.

उत्तर :

मानवनिर्मित प्रदूषकेनिसर्गनिर्मित प्रदूषके
सांडपाणीधूळ
रासायनिक खतेपरागकण
वाहनांचा धूरशैवाल
किटकनाशकेपशुपक्ष्यांची विष्ठा

1 thought on “प्रदूषण स्वाध्याय”

Leave a Comment