द्रव्याचे संघटन स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान

1. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा.
अ. स्थायूच्या कणांमध्ये आंतररेण्वीय बल …………… असते.
i) कमीत कमी
ii) मध्यम
iii) जास्तीत जास्त
iv) अनिश्चित
उत्तर :
स्थायूच्या कणांमध्ये आंतररेण्वीय बल जास्तीत जास्त असते.
आ. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला ………… म्हणतात.
i) आकार्यता
ii) असंपीड्यता
iii) प्रवाहिता
iv) स्थितिस्थापकता
उत्तर :
स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला स्थितिस्थापकता म्हणतात.
इ. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना ………… हा निकष लावला जातो.
i) द्रव्याच्या अवस्था
ii) द्रव्याच्या प्रावस्था
iii) द्रव्याचे रासायनिक संघटन
iv) यांपैकी सर्व
द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष लावला जातो.
ई. दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला …………… म्हणतात.
i) मिश्रण
ii) संयुग
iii) मूलद्रव्य
iv) धातुसदृश
उत्तर :
दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण म्हणतात.
उ. दूध हे द्रव्याच्या ………….. ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.
i) द्रावण
ii) समांगी मिश्रण
iii) विषमांगी
iv) निलंबन
उत्तर :
दूध हे द्रव्याच्या विषमांगी ह्या प्रकाराचे उदाहरण आहे.
ऊ. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साध्यर्म्य आहे, कारण तीनही …………… आहेत.
i) द्रवपदार्थ
ii) संयुगे
iii) अधातू
iv) मूलद्रव्ये
उत्तर :
पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साध्यर्म्य आहे, कारण तीनही द्रवपदार्थ आहेत.
ए. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डाय ऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात …………… रासायनिक बंध असतात.
i) 1
ii) 2
iii) 3
iv) 4
उत्तर :
कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते, की कार्बन डाय ऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांच्यात 2 रासायनिक बंध असतात.
2. गटात न बसणारे पद ओळखून स्पष्टीकरण द्या.
अ. सोने, चांदी, तांबे, पितळ
उत्तर :
पितळ
स्पष्टीकरण : पितळ हे मिश्रण असून इतर सर्व मूलद्रव्ये आहेत.
आ. हायड्रोजन, हायड्रोजन पेराॅक्साइड, कार्बन डायऑक्साइड, पाण्याची वाफ
उत्तर :
हायड्रोजन
स्पष्टीकरण : हायड्रोजन हे मूलद्रव्य असून इतर सर्व संयुगे आहेत.
इ. दूध, लिंबूरस, कार्बन, पोलाद
उत्तर :
कार्बन
स्पष्टीकरण : कार्बन हे मूलद्रव्य असून इतर सर्व मिश्रणे आहेत.
ई. पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल
उत्तर :
पेट्रोल
स्पष्टीकरण : पेट्रोल हे सेंद्रिय संयुग असून इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत.
उ. साखर, मीठ, खाण्याचा सोडा, मोरचूद
उत्तर :
साखर
स्पष्टीकरण : साखर हे सेंद्रिय संयुग असून इतर सर्व असेंद्रिय संयुगे आहेत.
ऊ. हायड्रोजन, सोडिअम, पोटॅशिअम, कार्बन
उत्तर :
कार्बन
स्पष्टीकरण : कार्बनची संयुजा 4 असून इतर सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे.
3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. वनस्पती सूर्यप्रकाशात क्लोरोफिलच्या मदतीने कार्बन डायऑक्साइड व पाणी यांच्यापासून ग्लूकोज तयार करतात व ऑक्सिजन बाहेर टाकतात. या प्रक्रियेतील चार संयुगे कोणती ते ओळखून त्यांचे प्रकार लिहा.
उत्तर :
वरील प्रक्रियेतील चार संयुगे व त्यांचे प्रकार :
| संयुगे | प्रकार |
|---|---|
| 1) कार्बन डायऑक्साइड | असेंद्रिय संयुग |
| 2) पाणी | असेंद्रिय संयुग |
| 3) क्लोरोफिल | जटिल संयुग |
| 4) ग्लुकोज | सेंद्रिय संयुग |
आ. पितळ ह्या संमिश्राच्या एका नमुन्यात पुढील घटक आढळले : तांबे (70%) व जस्त (30%). यामध्ये द्रावक, द्राव्य व द्रावण कोण ते लिहा.
उत्तर :
i) पितळ : द्रावण
कारण : दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात.
ii) तांबे : द्रावक
कारण : द्रावणात जास्त प्रमाणात असलेल्या घटकाला द्रावक म्हणतात.
iii) जस्त : द्राव्य
कारण : द्रावणात कमी प्रमाणात असलेल्या घटकाला द्राव्य म्हणतात.
इ. विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7% या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तर :
मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये :
i) मिश्रणातील घटक पदार्थाचे प्रमाण बदलू शकते.
ii) मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात.
4. प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.
अ. द्रवरूप मूलद्रव्य
उत्तर :
i) ब्रोमीन (Br2)
ii) पारा (Hg)
आ. वायूरूप मूलद्रव्य
उत्तर :
i) ऑक्सिजन (O2)
ii) हायड्रोजन (H2)
इ. स्थायुरूप मूलद्रव्य
उत्तर :
i) अँल्युमिनिअम (Al)
ii) तांबे (Cu)
ई. समांगी मिश्रण
उत्तर :
i) हवा
ii) समुद्राचे पाणी
उ. कलिल
उत्तर :
i) धूर
ii) दूध
ऊ. सेंद्रिय संयुग
उत्तर :
i) युरिआ
ii) साखर
ए. जटिल संयुग
उत्तर :
i) हिमोग्लोबिन
ii) क्लोरोफिल
ऐ. असेंद्रिय संयुग
उत्तर :
i) चुनखडी
ii) मीठ
ओ. धातुसदृश
उत्तर :
i) आर्सेनिक (As)
ii) सिलिकॉन (Si)
औ. संयुजा 1 असलेले मूलद्रव्य
उत्तर :
i) क्लोरीन (Cl)
ii) सोडिअम (Na)
अं. संयुजा 2 असलेले मूलद्रव्य
उत्तर :
i) कॅल्शिअम (Ca)
ii) मॅग्नेशिअम (Mg)
5. पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून त्या त्या संयुगातील घटक मूलद्रव्यांची नावे व संज्ञा लिहा व त्यांच्या संयुजा ओळखा.
KCl, HBr, MgBr2, K2O, NaH, CaCl2, CCl4, HI, H2S, Na2S, FeS, BaCl2
उत्तर :
| रेणुसूत्र | घटक मूलद्रव्ये | संज्ञा | संयुजा |
|---|---|---|---|
| 1) KCl | पोटॅशिअम क्लोरीन | K Cl | 1 1 |
| 2) HBr | हायड्रोजन ब्रोमीन | H Br | 1 1 |
| 3) MgBr2 | मॅग्नेशिअम ब्रोमीन | Mg Br | 2 1 |
| 4) K2O | पोटॅशिअम ऑक्सिजन | K O | 1 2 |
| 5) NaH | सोडिअम हायड्रोजन | Na H | 1 1 |
| 6) CaCl2 | कॅल्शिअम क्लोरीन | Ca Cl | 2 1 |
| 7) CCl4 | कार्बन क्लोरीन | C Cl | 4 1 |
| 8) HI | हायड्रोजन आयोडीन | H I | 1 1 |
| 9) H2S | हायड्रोजन सल्फर | H S | 1 2 |
| 10) Na2S | सोडिअम सल्फर | Na S | 1 2 |
| 11) FeS | आयर्न सल्फर | Fe S | 2 2 |
| 12) BaCl2 | बेरिअम क्लोरीन | Ba Cl | 2 1 |
6. काही द्रव्यांचे रासायनिक संघटन पुढील तक्त्यात दिले आहे. त्यावरून त्या द्रव्यांचा मुख्य प्रकार ठरवा.
| द्रव्याचे नाव | रासायनिक संघटन | द्रव्याचा मुख्य प्रकार |
|---|---|---|
| समुद्राचे पाणी | H2O + NaCl + MgCl2 + ….. | |
| उर्ध्वपातित पाणी | H2O | |
| फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू | H2 | |
| LPG सिलिंडरमधील वायू | C4H10 + C3H8 | |
| खाण्याचा सोडा | NaHCO3 | |
| शुद्ध सोने | Au | |
| ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू | O2 | |
| कास्य | Cu + Sn | |
| हिरा | C | |
| मोरचूद | CuSO4 | |
| चुनखडी | CaCO3 | |
| विरल हायड्रोक्लोरिक आम्ल | HCl + H2O |
उत्तर :
| द्रव्याचे नाव | रासायनिक संघटन | द्रव्याचा मुख्य प्रकार |
|---|---|---|
| समुद्राचे पाणी | H2O + NaCl + MgCl2 + ….. | मिश्रण |
| उर्ध्वपातित पाणी | H2O | संयुग |
| फुग्यात भरलेला हायड्रोजन वायू | H2 | मूलद्रव्य |
| LPG सिलिंडरमधील वायू | C4H10 + C3H8 | मिश्रण |
| खाण्याचा सोडा | NaHCO3 | संयुग |
| शुद्ध सोने | Au | मूलद्रव्य |
| ऑक्सिजनच्या नळकांड्यातील वायू | O2 | मूलद्रव्य |
| कास्य | Cu + Sn | मिश्रण |
| हिरा | C | मूलद्रव्य |
| मोरचूद | CuSO4 | संयुग |
| चुनखडी | CaCO3 | संयुग |
| विरल हायड्रोक्लोरिक आम्ल | HCl + H2O | मिश्रण |
7. शास्त्रीय कारणे लिहा.
अ. हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते.
उत्तर :
i) हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांचे पाणी हे संयुग आहे.
ii) संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात.
त्यामुळे, हायड्रोजन ज्वलनशील आहे, ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु पाणी आग विझवण्यास मदत करते.
आ. कलिलाचे घटक पदार्थ गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत.
उत्तर :
i) कलीलातील सूक्ष्म कणांचा व्यास 10-5 मीटरच्या आसपास असतो.
ii) कलीलातील कणांच्या व्यासापेक्षा सामान्य गालन कागदाची छिद्रे मोठी असतात.
iii) त्यामुळे कलीलाचे कण गालन कागदातून सहजपणे आरपार होतात.
म्हणून कलीलाचे घटक पदार्थ गाळणक्रियेने वेगळे करता येत नाहीत.
इ. लिंबू सरबताला गोड, आंबट, खारट अशा सर्व चवी असतात व ते पेल्यामध्ये ओतता येते.
उत्तर :
i) लिंबू सरबत हे लिंबाचा रस, साखर, मीठ व पाणी यापासून बनलेले मिश्रण आहे.
ii) मिश्रणामध्ये घटक पदार्थाचे गुणधर्म राखले जातात.
iii) त्यामुळे लिंबू सरबताला गोड, आंबट व खारट अशा सर्व चवी असतात.
iv) तसेच लिंबू सरबत द्रव अवस्थेत असल्याने ते पेल्यामध्ये ओतता येते.
ई. स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
उत्तर :
i) स्थायूंमध्ये आंतररेण्वीय बल अतिशय प्रभावी असते.
ii) त्यामुळे स्थायूचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात व ते आपापल्या ठराविक जागी स्पंद पावत राहतात.
यामुळे स्थायुरूप द्रव्याला निश्चित आकार व आकारमान हे गुणधर्म असतात.
8. पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणाऱ्या संयुगांची रेणूसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने शोधून काढा.
अ. C (संयुजा 4) व Cl (संयुजा 1)
उत्तर :

आ. N (संयुजा 3) व H (संयुजा 1)
उत्तर :

इ. C. (संयुजा 4) व O (संयुजा 2)
उत्तर :

ई. Ca (संयुजा 2) व O (संयुजा 2)
उत्तर :
