विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

१. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

१) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ……………….. यांची नेमणूक झाली.

अ) डॉ. होमी भाभा

ब) डॉ. होमी सेठना

क) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

ड) डॉ. राजा रामण्णा

उत्तर :

अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.

२) इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला …………….. हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

अ) आर्यभट्ट

ब) इन्सॅट १ बी

क) रोहिणी-७५

ड) ॲपल

उत्तर :

इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

१) पृथ्वी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र

२) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

३) आकाश – जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र

४) नाग – शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र

उत्तर :

चुकीची जोडी : अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

२. अ) दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा.

भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांतील प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा.

उत्तर :

ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा.

१) अवकाश संशोधन

उत्तर :

i) केरळ राज्यातील थंबा येथील ‘थुंबा इक्विटोरियल लॉच सेंटर’ वरून ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिचर्स’ या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले.

ii) १९६७ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणो-७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले.

iii) या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले.

iv) भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.

२) टलेक्स सेवा

उत्तर :

i) देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली.

ii) १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. या सेवेचा उपयोग सर्वत्र क्षेत्रांत सुरू झाला.

iii) या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.

१) पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

उत्तर :

कारण – i) अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नाॅलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती.

ii) भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. म्हणून पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

२) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

उत्तर :

कारण – i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली.

ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

३) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.

उत्तर :

कारण – i) ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली.

ii) या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती.

iii) प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारताकडून अण्वस्त्रांना प्रथम वापर केला जाणार नाही’ अशी ग्वाही दिली.

iv) मात्र कोणत्याही देशाने अशी चाचणी केल्यास अमेरिका विरोधात्मक होता आणि त्यानुसार त्याने भारतावर आर्थिक निर्बंध लादून प्रत्युत्तर दिले.

४. टीपा लिहा.

१) पोखरण अणुचाचणी

उत्तर :

i) शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ मे १९७४ रोजी राज्यस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली.

ii) पोखरण चाचण्या अणुबॉम्ब स्फोटांच्या मालिका होत्या, ज्या भारत सरकारने मे १९९८ मध्ये भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी श्रेणी येथे केल्या.

iii) हे भारताने केलेल्या अणुचाचण्यांचे दुसरे उदाहरण होते. या चाचण्यांचे उद्दिष्ट शांततामय उद्देशांसाठी आणि आत्मनिर्भरतेसाठी परमाणु ऊर्जा वापरणे हा होता.

iv) अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणीत महत्त्वाचा वाटा होता.

२) भास्कर-१ उपग्रह

उत्तर :

i) १९७९ मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींची निरीक्षण दूरसंवेदन तंत्राने साध्य व्हावे, यासाठी इस्रोने तयार केलेला ‘भास्कर-१’ हा दूरसंवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया या देशातून पाठवला.

ii) देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे, हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते.

iii) या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती.

iv) या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनाॅग्राफी) मध्ये झाला.

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा.

१) तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो.

उत्तर :

माझ्या वापरात असणाऱ्या पुढील सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे :

i) मोबाइल

ii) संगणक

iii) रेडिओ

iv) टी. व्ही. सेट.

या माध्यमांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा केलेला असल्याने मला दूरवरच्या व्यक्तीला पाहता येते, बोलता येते, ई-मेल वा फोटो पाठवता येतात. हवामानाचा अंदाज घेता येतो. माझ्या वापरात असणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या याही उपग्रहाद्वारेच आलेल्या असतात.

२) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधले जाते.

उत्तर :

१९८३ नंतर संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) या संस्थेने अध्यक्ष म्हणून डॉ. कलाम यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली –

i) ‘पृथ्वी’ आणि ‘अग्नी’ या क्षेपणास्त्रांच्या (मिसाईल्सच्या) यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या.

ii) इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

iii) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली. असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे संबोधले जाते.

३) संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते ?

उत्तर :

संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाइट वर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते. प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणकीकृत अनआरक्षित तिकीट प्रणाली केंद्रावरून खरेदी करू शकतात. तसेच रेल्वेस्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकीट वेंडिग मशीनद्वारे तिकीट प्राप्त केले जाऊ शकते.

४) कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.

उत्तर :

१९९८ साली सुरू झालेल्या कोकण रेल्वेची पुढील वैशिष्ट्ये आहेत :

i) या रेल्वेचा मार्ग ७६० किलोमीटर लांबीचा आणि चार राज्यांना जोडणारा आहे.

ii) या मार्गावर एकूण १२ बोगदे असून त्यातील करबुडे येथील ६.५ किलोमीटर लांबीचा सर्वांत मोठा बोगदा आहे.

iii) या मार्गावर १७९ मोठे व १८१९ छोटे पूल असून शरावती नदीवरील बांधलेला २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत लांब आहे.

iv) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा सर्वांत उंच पूल आहे.

v) दरडी कोसळणाऱ्या मार्गावर वेळीच धोका टाळण्यासाठी इंजिनामध्येच सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

Leave a Comment