माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान प्रगतीची नवी दिशा स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा.

1. संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर ……………. मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

उत्तर :

संगणकावर काम करताना मेमरी मधील माहिती आपण वाचू शकतो तर इंटरनल मेमरीमध्ये आपण इतर प्रक्रिया करू शकतो.

समर्थन : i) रीड ओन्ली मेमरी (ROM) या संगणकाच्या स्वत:च्या मेमरीमध्ये आपण डाटा फक्त वाचू शकतो.

ii) इंटरनल मेमरीमध्ये आपण या डाटाची प्रक्रिया करू शकतो आणि संपादितही करू शकतो.

2. शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना …………….. चा वापर करता येईल.

उत्तर :

शास्त्रज्ञांच्या शोधाबद्दल चित्रे तसेच व्हिडीओंचे सादरीकरण करताना मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईट चा वापर करता येईल.

समर्थन : i) मामायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईट अनेकप्रकारच्या स्लाइड्स असतात. त्याचा वापर आपण प्रस्तुती (प्रेझेंटेशन) तयार करण्यासाठी करतो.

ii) यात आपण स्लाइडच्या सजावटी चित्रे, व्हिडिओ आणि अँनिमेशनसुद्धा करू शकतो.

3. प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी ……………. वापरतात.

उत्तर :

प्रयोगामध्ये प्राप्त झालेल्या संख्यात्मक माहितीवर प्रक्रिया करून तक्ते तसेच आलेख तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरतात.

समर्थन : i) मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पंकती (Row) आणि स्तंभ (Column) असतात. यामुळे तक्त्याच्या स्वरूपात आपल्याला डाटा भरता येतो.

ii) नंतर ह्याच प्रकारचा डाटा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील पर्याय वापरुन आलेख काढण्यासाठी वापरता येतो.

4. पहिल्या पिढीतील संगणक ………….. मुळे बंद पडत होते.

उत्तर :

पहिल्या पिढीतील संगणक उष्णतेमुळे बंद पडत होते.

समर्थन : i) पहिल्या पिढीतील संगणकात खूप मोठ्या आकाराचे व्हाॅल्वज वापरले जात होते.

ii) त्यांना खूप वीज लागायची आणि त्यामुळे उष्णतानिर्माण व्हायची. त्यामुळे, पहिल्या पिढीतील संगणक बंद पडत होते.

5. संगणकास ……………. दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही.

उत्तर :

संगणकास वीजपुरवठा दिला नसेल तर त्याचे कार्य चालणार नाही.

समर्थन : कोणतेही विजेवर चालणारे उपकरण तेव्हाच काम करते जेव्हा त्याला वीजपुरवठा होतो. म्हणून, विजेचा पुरवठा झाल्याशिवाय संगणकाचे कार्य चालणार नाही.

2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ. विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील माहिती संप्रेषणाची भूमिका व महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर :

i) विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे उपलब्ध असलेल्या माहितीत प्रचंड वाढ झाली आहे.

ii) ही माहिती व्यवस्थितपणे साठवणे अत्यावश्यक आहे कारण ही माहिती आपल्याला विज्ञानाच्या विविध शाखांना, तसेच सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्यासाठी उपलब्ध करून देता येते. यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो.

iii) माहिती साठवणे, माहिती सोप्या तऱ्हेने मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे याबाबी संप्रेषणाच्या साधनांची आणि सेवांनी उपलब्ध करून देता येतात.

आ. संगणकातील कोणकोणत्या ॲल्पीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर तुम्हाला विज्ञानाचा अभ्यास करताना झाला ? कशाप्रकारे ?

उत्तर :

संगणकातील पुढील ॲल्पीकेशन सॉफ्ट्वेअरचा वापर विज्ञानाचा अभ्यास करताना झाला :

i) वर्ड प्रोसेसर (मायक्रोसॉफ्ट वर्ड) : प्रात्यक्षिक कार्याचे तसेच प्रोजेक्टचे लेखन करण्यासाठी.

ii) स्प्रेडशीट (मायक्रोसॉफ्ट एक्सेल) : प्रयोगाचे गणन करणे तसेच आलेख काढण्यासाठी.

iii) प्रेझेंटेशन (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) : आकर्षक, मनोरंजक सादरीकरण तयार करण्यासाठी.

iv) ब्राऊझर्स : वेबसाइटवरील माहिती शोधण्यासाठी.

इ. संगणकाचे कार्य कशा पद्धतीने चालते ?

उत्तर :

1. संगणकाचे कार्य खालील पद्धतीने चालते.

i) डाटा इनपुट

ii) डाटाची प्रक्रिया

iii) आऊटपुट मिळवणे

iv) डाटाचा साठा

2. प्रथम संगणकाला डाटा आणि सूचना दिल्या जातात यालाच इनपुट म्हणतात.

3. त्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार डाटावरती प्रक्रिया केली जाते याला प्रोसेसिंग म्हणतात.

4. एकदा डाटावर प्रक्रिया झाली, की संगणक शेवटचा निकाल देतो त्याला आऊटपुट म्हणतात.

5. संगणकामध्ये भरला जाणारा डाटा आणि संगणकाद्वारे लागलेला निकाल संगणकाच्या मेमरीमध्ये साठवला जातो.

ई. संगणकातील विविध सॉफ्ट्वेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे.

उत्तर :

i) ऑपरेटिंग सिस्टिमवर जेव्हा सेक्युरिटी अपडेट येतात, तेव्हा ते इंस्टॉल केले गेले पाहिजेत.

ii) इंस्टॉल केलेली ॲल्पीकेशन नेहमीच अद्ययावत असली पाहिजेत.

iii) अद्ययावत ॲटी-व्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल केले पाहिजे.

iv) पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर टाळला पाहिजे.

v) सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना नेहमी एन्ड युजर लायसन्स ॲग्रिमेंट (EULA) वाचले पाहिजे.

उ. माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत ? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो ?

उत्तर :

माहिती संप्रेषणाची विविध साधने व विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर पुढीलप्रमाणे :

i) मोबाइल फोन : आवाज (Voice), संदेश (Message), फोटो आणि व्हिडिओ इत्यादी पाठवून माहितीचे हस्तांतरण करता येते.

ii) संगणक/लॅपटॉप : इंटरनेटवर संग्रहित केलेल्या माहितीचा वापर आणि त्याच माहितीवर प्रक्रिया करता येते.

iii) डिजिटल टिव्ही : ॲनलॉग टिव्हीप्रमाणेच असतो; मात्र यामध्ये मल्टीमीडिया शिकण्याचे अनुभव देण्याची क्षमता आहे. यामध्ये माहितीचे आदान-प्रदान होते.

3. गतीचे नियम पाठातील पृष्ठ क्र. 4 वर दिलेल्या सारणीतील माहितीच्या आधारे अमर, अकबर व अँन्थनी यांच्या गतीचा अंतर-काल आलेख Spreadsheet चा वापर करून काढा. तो काढताना तुम्ही कोणती काळजी घ्याल.

उत्तर :

आलेख काढताना घ्यावयाची काळजी :

i) (X, Y) = (काल, अंतर)

ii) सारणीमध्ये घड्याळी वेळ दिली आहे. त्याऐवजी तासामध्ये 0, 0.5, 1, 1.5, 2, 2.5 3 याप्रमाणे कालावधी घ्यावा.

iii) वर्कशीटमध्ये माहिती भरून झाल्यानंतर आलेख काढावयाचा सर्व मजकूर शीर्षकासह निवडा.

iv) इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. इन्सर्ट चार्ट वर क्लिक करा.

v) Line हा चार्ट प्रकार व Line with Markers नमुना निवडा.

4. संगणकाच्या विविध पिढ्यांमधील फरक स्पष्ट करा. त्यासाठी विज्ञान कसे कारणीभूत आहे.

उत्तर :

आजच्या पिढीतील संगणक हा पाचव्या पिढीतील असून संगणकाच्या पाच पिढ्यांमध्ये झालेले बदल पुढीलप्रमाणे :

i) तंत्रज्ञानामधील विकास : तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वेगवेगळ्या पिढीतील संगणकांची उत्क्रांती झाली. सुरुवातीला संगणकामध्ये व्हॉल्वज वापरले जायचे. ज्यामुळे खूप उष्णता निर्माण व्हायची आणि संगणक बंद पडायचे. त्यानंतर व्हॉल्वजची जागा ट्रांझिस्टर्स आणि पुढे इंटिग्रेटेड सर्किट्सनी घेतली. त्यानंतर संगणकात मायक्रोप्रोसेसरचा वापर सुरू झाला.

ii) विजेचा वापर आणि उष्णतेची निर्मिती : पहिल्या पिढीतील संगणकांना खूप वीज लागायची आणि उष्णताही खूप निर्माण व्हायची. जसजशी तंत्रज्ञानात प्रगती होत गेली तसा पुढील पिढ्यातील संगणकात विजेचा वापर कमी होत गेला आणि त्यामुळे निर्माण होणारी उष्णताही कमी झाली.

iii) आकार, कार्यक्षमता आणि विश्वसनियता : तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणकाचा आकार लहान झाला आणि त्याची कार्यक्षमता आणि विश्वसनीयता यांमध्ये वाढ झाली.

iv) इनपुट/आऊटपुट पद्धती : इनपुट/आऊटपुट पद्धतींमध्ये झालेली प्रगती खालील तक्त्यात दाखवली आहे.

संगणकाच्या पिढ्याइनपुट पद्धतआउटपुट पद्धत
पहिली आणि दुसरी पिढीपंचकार्ड्स, पेपर टेप्सप्रिंटर
तिसरी पिढीकी-बोर्डमॉनिटर, प्रिंटर
चौथी आणि पाचवी पिढीकी-बोर्ड, माऊस, स्कॅनरमॉनिटर, प्रिंटर

v) संगणक क्षेत्रात वरील नमूद केलेल्या विकासासाठी विज्ञानाचे योगदान : विज्ञानातील प्रगतीमुळे तंत्रज्ञानाची प्रगती शक्य झाली. पूर्वीचे खूप जड आणि कमी कार्यक्षमता असणारी संगणकाची साधने आता अधिक कार्यक्षम, अधिक गतिमान आणि आकाराने लहान झाली आहेत.

5. तुमच्याजवळ असणारी माहिती इतरांना देण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या माहिती संप्रेषण साधनांची मदत घ्याल.

उत्तर :

आपल्याजवळची माहिती इतरांना देण्यासाठी पुढील माहिती संप्रेषण साधनांची मदत घेऊ.

i) संगणक व नेटवर्किंग : या साधनांच्या मदतीने ब्लॉग, फोरम, चॅटिंग, ई-मेल स्वरूपात माहितीची देवघेव.

ii) दूरध्वनी व मोबाइल : या साधनांच्या मदतीने संभाषणात्मक तसेच मजकूर व्हिडिओ स्वरूपात माहितीची देवघेव.

iii) दूरदर्शन : या साधनाच्या माध्यमातून चर्चा, वादविवाद यांमध्ये सहभागी होऊन माहितीची देवघेव इतरांना करू.

6. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ्यपुस्तकातील किमान तीन घटकांवर Powerpoint Presentations तयार करा. ते करताना कोणते टप्पे वापरले त्यानुसार ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून Power Point Presentation तयार करतांना –

i) सर्वप्रथम ज्या घटकावर Power Point Presentation बनवावयाचे आहे त्यासंबंधी सर्व मजकूर, चित्रे गोळा केली. 

ii) File tab, New Slide, Blank Slide Insert, Design tab इत्यादी संबंधी माहिती करून घेतली. 

iii) Animation tab च्या साहाय्याने Slide ला ॲनिमेशन दिले. 

iv) Slide Show करून खात्री करून घेतली.

7. संगणकाचा वापर करत असताना तुम्हांला कोणकोणत्या तांत्रिक अडचणी आल्या ? त्या सोडविण्यासाठी तुम्ही काय केले ?

उत्तर :

संगणकाचा वापर करीत असताना पुढीलप्रमाणे तांत्रिक अडचणी आल्या :

i) अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भरत असलेली माहिती नष्ट झाली.

उपाय : संगणकात माहिती भरत असताना वरचेवर सेव्ह केली. यू. पी. एस. साधन जोडून घेतल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला तरी काही काळ माहिती सेव्ह करणे शक्य झाले.

ii) फोटो अपलोड करीत असताना नेटवर्क समस्येमुळे फोटो अपलोड होत नव्हता.

उपाय : फोटोची साइज व फॉरमॅट बदलून फोटो अपलोड केला.

Leave a Comment