उत्क्रांती स्वाध्याय

उत्क्रांती स्वाध्याय

उत्क्रांती स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2

1. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

अ) उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा ………………. या शास्त्रज्ञाने मांडली.

(चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी)

उत्तर :

उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली.

आ) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे ……………. प्राणी होय.

(जलचर, उभयचर, सस्तन)

उत्तर :

पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय.

2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

उत्तर :

पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात.

आ) आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली ?

उत्तर :

आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली.

3. पुढील विधानांची कारणे लिहा.

अ) डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

उत्तर :

i) बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेता आल्यामुळे किंवा

ii) अचानकपणे आलेल्या मोठ्या नैसर्गिक संकटामुळे किंवा

iii) पर्यावरणात आकस्मिक बदल झाल्यामुळे डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

आ) मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.

उत्तर :

i) एखाद्या विशिष्ट प्राणिजातीमधील प्राण्यांच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात.

ii) कालांतराने हे बदल त्या प्राणिजातीचे आनुवांशिक रूप धारण करतात म्हणून

4. दिलेल्या संकल्पनाचित्रातील रिकाम्या जागा भरा.

उत्तर :

Leave a Comment