पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय

पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय

पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग – 1

1. काय करावे बरे ?

अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीचा थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे ?

उत्तर :

ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे. दक्षिण गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालावधीत हिवाळा तर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालावधीत उन्हाळा असते.

म्हणून अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला 23 सप्टेंबर ते 22 मार्च दरम्यान न्यावे.

2. जरा डोके चालवा.

अ) पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ?

उत्तर :

पृथ्वीच्या एका परिभ्रमणात 365 पूर्ण परिवलने + एक चतुर्थांश परिवलन होते. म्हणजे एका परिभ्रमणात पृथ्वी 365 इतकी परिवलने करते.

आ) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा.

मुंबई (महाराष्ट्र) , कोलकता (पश्चिम बंगाल), भोपाळ (मध्यप्रदेश), नागपूर (महाराष्ट्र)

उत्तर :

i) कोलकता (पश्चिम बंगाल)

ii) भोपाळ (मध्य प्रदेश)

iii) नागपूर (महाराष्ट्र)

iv) मुंबई (महाराष्ट्र)

3. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

अ) पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास ………………. म्हणतात.

उत्तर :

पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात.

आ) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास ……………… म्हणतात.

उत्तर :

पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात.

इ) पृथ्वीच्या परिवलनामुळे ……………….. व ………………. होते.

उत्तर :

पृथ्वीच्या परिवलनामुळे दिनरात्र होते.

4. कशाला म्हणतात ?

अ) पौर्णिमा

उत्तर :

ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.

आ) अमावास्या

उत्तर :

ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील भाग अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.

इ) चांद्रमास

उत्तर :

एका अमावास्येपासून पुढील अमावास्येचा काळ याला चंद्रमास म्हणतात.

ई) तिथी

उत्तर :

अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.

5. प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) विषुववृत्त म्हणजे काय ?

उत्तर :

उत्तर व दक्षिण ध्रुव यांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात.

आ) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते ?

उत्तर :

विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध होय.

Leave a Comment