तारकांच्या दुनियेत स्वाध्याय
तारकांच्या दुनियेत स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान
प्रश्न. 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
(मध्यमंडळ, क्षितिज, बारा, नऊ, भासमान, वैषुविक, आयनिक)
1) दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्या रेषेला ………………. म्हणतात.
उत्तर :
दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते. त्या रेषेला क्षितिज म्हणतात.
2) राशींची संकल्पना मांडताना …………………. वृत्त विचारात घेतले आहे.
उत्तर :
राशींची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे.
3) ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत …………………. नक्षत्रे येतात.
उत्तर :
ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात.
4) सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे …………………. भ्रमण आहे.
उत्तर :
सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे.
प्रश्न. 2. आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल ? का ?
उत्तर :
आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल. कारण तारे दररोज चार मिनिटे लवकर मावळतात. ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चंद्र व सूर्य पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात. सूर्य दिवसाला सुमारे एक अंश तर चंद्र दिवसाला बारा ते तेरा अंश ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडे सरकलेला दिसतो. पृथ्वी सूर्याभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्याने असे होते.
प्रश्न. 3. ‘नक्षत्र लागणे’ म्हणजे काय ? पावसाळ्यात ‘मृग नक्षत्र लागले’, म्हणतात याचा अर्थ काय ?
उत्तर :
नक्षत्र लागणे म्हणजे या काळात पृथ्वीवरून पहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठरावीक नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल.
प्रत्येक नक्षत्र आपल्या वाहनांवर बसून येतं. या नक्षत्र काळात पडणारा पाऊस हा त्यांच्या वाहनाप्रमाणे पडतो असं सांगितलं जात.
मृगाचे वाहन आहे कोल्हा. कोल्हा हा प्राणी फार चतुर गोड बोलून एखाद्याला कसे फसवायचे हे कोल्हयाकडून शिकावं. जून महिन्यात पावसाचं तसंच असतं. काही भागात धो-धो पडेल तर काही ठिकाणी मात्र ओढ लावून जातो.
मृग नक्षत्र हे मृगजळासारखे असते.
प्रश्न. 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) तारकासमूह म्हणजे काय ?
उत्तर :
खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात.
2) आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
आकाश निरीक्षण करण्यापूर्वी पुढील काळजी घ्यावी.
i) आकाश निरीक्षणाची जागा शहरापासून दूर व शक्यतो अमावस्येची रात्र असावी.
ii) आकाश निरीक्षणासाठी द्विनेत्री दुर्बिणीचा वापर करावा.
iii) उत्तर दिशेकडील ध्रुवतारा शोधून आकाश निरीक्षण सोपे होते.
iv) पश्चिमेकडील तारे लवकर मावळणारे असल्याने सुरुवातीस पश्चिमेकडील ताऱ्यांपासून निरीक्षणास सुरुवात करावी.
v) आकाश नकाशावर भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते.
vi) नकाशाच्या खालच्या भागावर उत्तर तर वर दक्षिण दिशा दाखवलेली असते. कारण नकाशा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो. ज्या दिशेला आपण तोंड करून उभे आहोत, ती दिशा नकाशावर खालच्या बाजूला करावी.
3) ‘ग्रह – तारे – नक्षत्र’ यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो, असे म्हणणे योग्य आहे का ? का ?
उत्तर :
ग्रह-तारे-नक्षत्र यांचा मानवी जीवनावर काहीही प्रभाव नाही कारण यांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही हे सिद्ध झाले आहे. विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले. एकविसाव्या शतकात तो मंगळ पादाक्रांत करेल. आजच्या वैज्ञानिक युगात अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फोल ठरलेल्या कल्पनांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वत:च्या वेळेचा, शक्तीचा आणि धनाचा निष्कारण अपव्यय करणे. त्यामुळे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या सर्वाकडे पाहणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न. 5. आकृती 20.1 अनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवनप्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा.
उत्तर :
तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते. तेजोमेघ हे प्रामुख्याने धूळ व हायड्रोजन वायूंचे बनलेले ढग असतात.
गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते. व आकुंचनाने तो ढग दाट व गोलाकार होतो. यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने तापमानामध्येही प्रचंड वाढ होते व तेथे ऊर्जानिर्मिती होऊ लागते. अशा हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला ‘तारा’ असे म्हणतात. पुढे तापमानात वाढ होणे. आकुंचन, प्रसरण या क्रियांमुळे ताऱ्यांचे स्वरूप बदलत जाते. या प्रक्रियेसाठी फार मोठा कालावधी लागतो. हाव ताऱ्यांचा जीवनप्रवास असून ताऱ्यांमध्ये विविध प्रकार याच स्वरूपांमुळे ओळखले जातात.
ताऱ्यांचे स्वरूप –