मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय

मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय

मानवी स्नायू व पचनसंस्था स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान

प्रश्न. 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

1) पचनाची क्रिया ………………. पासून सुरू होते.

(जठर / मुख)

उत्तर :

पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते.

2) पापण्यांमध्ये ………………… प्रकारचे स्नायू असतात.

(ऐच्छिक / अनैच्छिक)

उत्तर :

पापण्यांमध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू असतात.

3) स्नायूसंस्थेचे ………………… हे कार्य नाही.

(रक्तपेशी बनवणे / हालचाल करणे)

उत्तर :

स्नायूसंस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही.

4) ह्रदयाचे स्नायू हे …………………. असतात.

(सामान्य स्नायू / ह्रद स्नायू)

उत्तर :

ह्रदयाचे स्नायू हे ह्रद स्नायू असतात.

5) बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ………………. चे कार्य आहे.

(जठर / ग्रासनलिका)

उत्तर :

बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिका चे कार्य आहे.

प्रश्न. 2. सांगा, माझी जोडी कोणाशी ?

‘अ’ गट ‘ब’ गट
1) ह्रद् स्नायू
2) स्नायूंमुळेच होतात
3) पेप्सिन
4) पेटके येणे
5) अस्थिस्नायू
अ) नेहमीच जोडीने कार्य करतात.
आ) आम्ही कधीच थकत नाही.
इ) स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन
ई) जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली
उ) जाठररसातील विकार

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) ह्रद् स्नायू
2) स्नायूंमुळेच होतात
3) पेप्सिन
4) पेटके येणे
5) अस्थिस्नायू
आ) आम्ही कधीच थकत नाही.
ई) जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली
उ) जाठररसातील विकार
इ) स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन
अ) नेहमीच जोडीने कार्य करतात.

प्रश्न. 3. खोटे कोण बोलतोस ?

अवयवविधान
1) जीभ* माझ्यातील रूचिकलिका फक्त गोड चव ओळखतात.
उत्तर – जीभ खोटे बोलतेय
2) यकृत * मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.
उत्तर : यकृत खरे बोलते आहे.
3) मोठे आतडे * माझी लांबी 7.5 मीटर आहे.
उत्तर : मोठे आतडे खोटे बोलत आहे.
4) अँपेंडिक्स * पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊच शकत नाही.
उत्तर : अँपेंडिक्स खोटे बोलत आहे.
5) फुफ्फुस * उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो.
उत्तर : फुफ्फुस खरे बोलत आहे.

प्रश्न. 4. कारणे लिहा.

1) जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.

उत्तर :

कारण – i) जठरातून आलेल्या आम्लयुक्त अन्नाचे प्रथम अल्कलीयुक्त अन्नात रूपांतर करावे लागते.

ii) यकृत शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवते.

iii) हा पित्तरस पित्ताशयात साठवला जातो. ज्या ज्या वेळी अन्न लहान आतड्यात प्रवेश करते, त्या त्या वेळी पित्ताशयातून नलिकेमार्फत पित्त त्यात सोडले जाते. या पित्तामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते.

2) ह्रदयाच्या स्नायूंच्या अनैच्छिक स्नायू म्हणतात.

उत्तर :

कारण – i) श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात. पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंचा अनैच्छिक स्नायू म्हणतात.

ii) ह्रदयाचे स्नायू ह्रदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते.

iii) ह्रदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला ह्रदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. म्हणून ह्रदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात.

3) मादक पदार्थाचे सेवन करू नये.

उत्तर :

कारण – i) मादक पदार्थाचे सेवन केल्यामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचन संस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात.

ii) तसेच या सेवनाने उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात.

iii) मादक पदार्थामधील तंबाखूचे सेवन केल्याने त्याचे कण दात, हिरड्या, तोंडाची आतील त्वचा यांना चिकटून बसतात व हळूहळू इजा पोहोचून तो खराब करण्याचे काम करतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात. घसा तसेच आतड्याचा दाह होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू ओढवतो. म्हणून मादक पदार्थाचे सेवन करू नये.

4) तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत.

उत्तर :

कारण – i) पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीचे लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालींपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडतात.

ii) बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो.

iii) मजबूत व कार्यप्रवण स्नायूंमुळे आपले काम व्यवस्थित व सुरळीत होईल त्यासाठी शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) स्नायू मुख्यत: किती प्रकारचे असतात व कोणकोणते ?

उत्तर :

स्नायू मुख्यत: तीन प्रकारचे असतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.

i) अस्थी स्नायू – अस्थी स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदा. हातांचे, पायांचे स्नायू यांची हालचाल ऐच्छिक असते. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात.

ii) ह्रदयाचे स्नायू – हे स्नायू ह्रदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते. ह्रदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला ह्रदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते.

iii) मृदू स्नायू – शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. उदा. जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू. यांची हालचाल अनैच्छिक असते. हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या नकळत होत असतात.

2) आम्लपित्त का होते ? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ?

उत्तर :

आम्लपित्त एच. पायलोरी जीवाणूच्या संक्रमणाने होते. तसेच तणाव, तिखट व मसालेदार आहारामुळे आम्लपित्त होते.

आम्लपित्ताचा शरीरावर परिणाम – आम्लपित्तामुळे छातीमध्ये जळजळ होते. छातीपासून पाठीमध्ये दुखते. घाम येतो, श्वास फुलतो, जीव घाबरतो, जीव मळमळते व उलटी होते.

3) दातांचे प्रमुख प्रकार कोणते ? त्यांचे कार्य काय आहे ?

उत्तर :

दातांचे पटाशीचे दात, सूळे दात, दाढा, उपदाढा असे प्रमुख प्रकार आहे.

दातांचे कार्य –

i) पटाशीच्या दातांचा अन्न तोडण्यासाठी उपयोग होतो.

ii) सुळे दातांना उपयोग सोलण्यासाठी होतो.

iii) उपदाढा व दाढांचा उपयोग अन्नपदार्थ चर्वण करण्यासाठी होतो.

iv) पुढच्या दातांनी अन्न तोडले जाते व मागच्या दातांनी ते अन्न बारीक केले जाते.

प्रश्न. 6. पचनसंस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

अन्नपचनाची प्रक्रिया –

i) तोंड/मुख – तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांची चावले जाते. त्याचे बारीक तुकडे होतात. बारीक केलेल्या अन्नाचे विकराच्या साहाय्याने साध्या पदार्थामध्ये रूपांतर केले जाते.

ii) ग्रसनी/घसा – अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.

iii) यकृत – यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. ग्लुकोजचा साठा करणे हे यकृताचे मुख्य कार्य होय. यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतडयात पोहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. स्निग्धपदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.

iv) लहान आतडे – लहान आतड्यामुळे अन्नाचे पचन व शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

v) मोठे आतडे – मोठे आतडे फक्त पाण्याचे शोषण करते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘अँपेडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुद्द्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.

vi) लाळग्रंथी – कानशिलांजवळ आणि घशाजवळ जिभे खाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते. तेथून ती नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यात लाळ मिसळली जाते.

vii) ग्रासिका – ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते.

viii) स्वादुपिंड – स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. त्यात अनेक विकरे असतात.

ix) जठर – अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जाठरग्रंथीमधून जाठररस स्त्रवतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. जठरात मुख्यत: प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते.

Leave a Comment