पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय

पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय

पेशीरचना आणि सूक्ष्मजीव स्वाध्याय इयत्ता सातवी सामान्य विज्ञान

प्रश्न. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) पेशी म्हणजे काय ?

उत्तर :

सजीवांचे शरीर ज्या सूक्ष्म घटकांनी बनले आहे. त्याला पेशी म्हणतात.

2) पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत ?

उत्तर :

पेशींमधील प्रामुख्याने केंद्रक, आंतरर्द्रव्यजालिका, गॉल्जीपिंड, लयकारिका, रिक्तिका, तंतुकणिका, लवके, पेशीपटल, पेशीभित्तिका, पेशीरस, मायटोक्रॉड्रिया, रायबोसोम्स ही अंगके आहेत.

3) सूक्ष्मजीव म्हणजे काय ?

उत्तर :

पृथ्वीतलावर असंख्य सजीव आहेत. त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, ते पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. अशा सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात.

4) सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते ?

उत्तर :

सूक्ष्मजीवांचे बुरशी, शैवाल हे बहुपेशीय सूक्ष्मजीव तर जीवाणू व विषाणू हे एकपेशीय सूक्ष्मजीव असे प्रकार आहेत.

प्रश्न. 2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1) ………………….. हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.

उत्तर :

पेशीभित्तिका हे अंगक फक्त वनस्पती पेशीतच असते.

2) सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे ……………….. मध्ये रूपांतर होते.

उत्तर :

सूक्ष्मजीवांमुळे कचऱ्याचे खतां मध्ये रूपांतर होते.

3) पेशीमध्ये ……………….. मुळे प्रकाश संश्लेषण होते.

उत्तर :

पेशीमध्ये हरितलवके मुळे प्रकाश संश्लेषण होते.

4) …………………. अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो.

उत्तर :

सूक्ष्मजीवांच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो.

प्रश्न. 3. आमच्यातील फरक काय आहे.

1) वनस्पती पेशी व प्राणी पेशी

उत्तर :

वनस्पती पेशी प्राणी पेशी
i) वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते.
ii) वनस्पती पेशींमध्ये एकच मोठी रिक्तिका असते.
iii) या पेशींमध्ये हरितद्रव्य असते.
i) प्राणी पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका नसते.
ii) प्राणी पेशींमधील रिक्तिका आकाराने छोट्या असतात.
iii) या पेशीमध्ये हरितद्रव्य नसते.

2) आदिकेंद्रकी पेशी व दृश्यकेंद्रकी पेशी

उत्तर :

आदिकेंद्रकी पेशी दृश्यकेंद्रकी पेशी
i) ज्या सजीवांमध्ये पेशीतील अंगकाभोवती आवरण नसते. अशा पेशींना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
ii) या पेशींमध्ये एकच गुणसूत्र असते.
iii) या पेशी आकाराने लहान असतात.
iv) या पेशींच्या केंद्राभोवती पटल नसते.
v) उदा. जीवाणू, नील-हरित शैवाल
i) ज्या पेशींची अंगके पटल वेष्टित असतात त्यांना दृश्यकेंद्रकी पेशी म्हणतात.
ii) या पेशींमध्ये एकापेक्षा जास्त गुणसुत्रे असतात.
iii) या पेशी आकाराने बऱ्याच मोठ्या असतात.
iv) या पेशींच्या केंद्राभोवती पटल असते.
v) उदा. शैवाल, कवके, प्रोटोझुआ

प्रश्न. 4. वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांच्या आकृत्या काढून त्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

i) वनस्पती पेशी – वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशीभित्तिका असते. त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो. तसेच वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात. या पेशीमध्ये हरितलवके असते.

ii) प्राणी पेशी – प्राणी पेशीमध्ये पेशीपटलाभोवती आवरण नसते. प्राणीपेशींमधील रिक्तिका आकाराने लहान असतात. प्राणी पेशींमध्ये लयकारिका असते. तसेच या पेशींमध्ये हरितद्रव्ये नसते.

प्रश्न. 5. सूक्ष्मजीवांची उपयुक्तता व हानिकारकता स्पष्ट करा.

उत्तर :

सूक्ष्मजीवांची उपयुक्तता – i) शेण, माती यांमधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात. काही दिवसांत कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते. कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात.

ii) दही, ताक, लोणी, चीज, पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यास सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत.

iii) फळे व धान्य यांपासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे. तसेच अँसेटिक आम्ल, सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, जीवनसत्त्वे व प्रतिजैविके यांच्या निर्मितीमध्ये किण्वन प्रक्रियेचा उपयोग केला जातो. त्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत होते.

iv) रोगप्रतिकार क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात.

v) कातडी कमावणे, घायतापापासून धागे मिळवणे. ह्या प्रक्रियांमध्येहीं सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो.

vi) काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते.

vii) शेतातील पालापाचोळा व कचरा, मानवी मलमूत्र, घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व खतनिर्मिती केली जाते.

सूक्ष्म हानिकारकता – i) स्वत:चे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ (एन्टेरोटाॅक्झिन्स) अन्नात मिसळतात. या पदार्थानी अन्न दूषित होते. दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात.

ii) जलाशयांजवळील अस्वच्छता व सांडपाण्याशी संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या, उघड्यावरील (माश्या बसलेल्या) अन्नात सूक्ष्मजीव असतात. असे दूषित अन्न सेवन केल्यास आमांश, टायफाॅइड, कॉलरा, काविळ, गॅस्टो असे अन्ननलिकेचे रोग होतात.

iii) श्वसनमार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात. श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसनमार्गात जाऊन सर्दी, खोकला, घटसर्प, न्यूमोनिया, क्षय असे रोग होऊ शकतात.

iv) कचऱ्याचे ढीग, गटारे, साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते. डासांच्या माद्यांच्या दशांतून हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग, पीतज्वर, चिकुनगुनीय, झिका ताप इत्यादी रोगांना कारणीभूत सूक्ष्मजीव मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे मानवाला हानी पोहचते.

प्रश्न. 6. कारणे लिहा.

1) महापूर, अतिवृष्टी या काळांत रोगप्रसार होतो.

उत्तर :

कारण – i) महापूर, अतिवृष्टी यांमुळे वाहून आलेले प्राणी, झाडे, केरकचरा कुजतो. या कुजलेल्या कचऱ्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होते.

ii) या सूक्ष्मजीवांमुळे मनुष्याला कॉलरा, ग्रॅस्ट्रो यांसारखे रोग होतात. तसेच महामारी, साथीचे रोग या रोगांचा प्रसार होतो. म्हणून महापूर, अतिवृष्टी या काळात रोग प्रसार होतो.

2) शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.

उत्तर :

कारण – i) शिळ्या अन्नावर काही सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव स्वत:चे पोषण करताना एन्टेरोटाॅक्झिन्ससारखे विषारी पदार्थ या अन्नात मिसळतात.

ii) या पदार्थानी अन्न दूषित होते. या दूषित अन्नाचे सेवन केल्यास आमांश, टायफाॅइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो असे अन्ननलिकेचे रोग होतात. म्हणून शिळे अन्न खाल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते.

3) जमीन मशागतीमध्ये माती खाली वर करतात.

उत्तर :

कारण – i) जमीन मशागतीमध्ये जमिनीचा वरचा थर खाली जातो आणि खालचा थर वर येतो. यामुळे जमीन भुसभुशीत होऊन. तण काढून टाकणे सोपे होते. पूर्वी घेतलेल्या पिकांची धसकटे आणि मुळ्या मोकळ्या होतात. त्या वेचून काढल्यानंतर जमीन सपाट केली जाते. ही जमीन पेरणीयोग्य होते.

ii) माती मोकळी झाल्याने तिच्यातील कीटक आणि जंतू उघडे पडतात. आणि उन्हामुळे मरून जातात. तसेच मातीमध्ये हवा खेळती राहून ती जमिनीत खोलवर जाते. त्यामुळे वनस्पतींचे श्वसन चांगले होऊन मुळे जोमाने वाढतात आणि खोलवर जातात.

iii) पावसाचे किंवा ओलिताचे पाणी वाहून न जाता मोकळ्या झालेल्या जमिनीत मुरते. म्हणून जमीन मशागतीमध्ये माती खालीवर करतात.

4) बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

उत्तर :

कारण – i) ओलसर जागी दमट हवामान असते. अशा दमट हवामानात बुरशीला पोषक वातावरण मिळते.

ii) या पोषक व अनुकूल वातावरणात बुरशीची वाढ झपट्याने होते. म्हणून बुरशी ओलसर जागी चटकन वाढते.

5) घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

उत्तर :

कारण – i) सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते. कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ चांगले टिकतात.

ii) थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात. पालेभाज्या, फळे, शिजवलेले अन्न टिकवण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक आहे.

iii) शीतकपाटांमध्ये 5° से च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. म्हणून घराघरांमध्ये शीतकपाटांचा वापर करतात.

6) पाव तयार करताना फुगतो.

उत्तर :

कारण – i) सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होते. ही रासायनिक क्रिया म्हणजे किण्वन होय.

ii) पाव तयार करतांना त्या पिठात किण्वणाची प्रक्रिया केली जाते.

iii) या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साइड व इतर वायू तयार होतात. हे वायू पदार्थाचे आकारमान वाढवतात. हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. म्हणून पाव तयार करताना फुगतो.

7) दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

उत्तर :

कारण – i) गळिताच्या धान्यातून तेल काढल्यानंतर उरलेली पेंड, धान्याचे भरड, गूळ यांचे मिश्रण आंबवून आंबोण तयार केले जाते.

ii) भिजवून ठेवलेल्या आंबोणमध्ये प्रथिने आणि मेदाचे प्रमाण अधिक असते. त्याचा खुराक म्हणून वापर केल्यामुळे दूध सकस आणि अधिक मिळते.

iii) तसेच हे आंबोण भिजवून ठेवल्यामुळे या अन्नपदार्थाची पौष्टीकता अधिक वाढते. त्यामुळे दुभत्या जनावरांना आंबोण देण्यापूर्वी ती भिजवून ठेवतात.

प्रश्न. 7. साधा व संयुक्त सूक्ष्मदर्शक तुम्ही कशासाठी वापराल ? कसा ते सविस्तर लिहा.

उत्तर :

i) साधा सूक्ष्मदर्शक ज्या गोष्टी सूक्ष्म आहेत त्यासाठी वापरू संयुक्त सूक्ष्मदर्शक आम्ही पेशीनिरीक्षणासाठी वापर करू.

ii) कारण पेशी अत्यंत सूक्ष्म असतात. नुसत्या उघड्या डोळ्यांनी त्या आपल्याला दिसत नाहीत. पेशींच्या आकारमानाचे मोजमाप मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते.

iii) पेशीनिरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो.

संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर पुढील प्रमाणे करता येईल –

i) कांद्याची एक फोड घेऊन त्याच्या खोलगड भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा व तो काच पट्टीवर घ्या. त्यावर पाण्याचा थेंब टाका. (हे करताना पापुद्र्यास घडी पडणार नाही याची काळजी घ्या.)

ii) यावर आयोडिनच्या/इओसिनच्या विरल द्रावणाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या 10 X भिंगाखाली निरीक्षण करा. याप्रमाणे कृती करून वनस्पतींच्या विविध भागांवरील पेशींचे, जसे-पाने, खोडाची साल, मूलाग्रे, इत्यादींचे निरीक्षण करता येईल.

साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर –

i) साध्या सूक्ष्मदर्शकाचा वापर घड्याळ दुरुस्त करण्यासाठी तसेच मौल्यवान खड्यांचे निरीक्षण करण्यासाठी करता येते.

Leave a Comment