सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. १. खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागरजलक्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत ✓ खूण करा.

उत्तर :

प्रश्न. २. कारणे लिहा.

अ) बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

उत्तर :

कारण – i) बाल्टिक हा भूवेष्टित समुद्र शीत हवामानाच्या प्रदेशात आहे. या समुद्रास प्रचंड प्रमाणात ध्रुवीय प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो.

ii) येथे बाष्पीभवन फार कमी होते. त्यामुळे बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते.

आ) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

उत्तर :

कारण – i) तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस विषुववृत्तीय सदाहरित वने, समशीतोष्ण वने व नाईल नदीच्या खोऱ्यातील वनांचा भाग येत असल्यामुळे तेथील तापमान कमी आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. म्हणून समुद्राच्या दक्षिण भागात क्षारता कमी आहे.

ii) तर समुद्राच्या उत्तर भागात सहारा वाळवंट असल्यामुळे तेथील तापमान जास्त आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने क्षारांचे प्रमाणही जास्त आहे. म्हणून तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

इ) समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

उत्तर :

कारण – i) समान अक्षवृत्तावर बरेच समुद्र आहेत. काही समुद्राला गोड्या पाण्याच्या नद्या येऊन मिळाल्याने त्या समुद्राची क्षारता कमी असते.

ii) तर काही समुद्राला नद्या येऊन मिळत नाही किंवा उष्णकटिबंधीय प्रदेशात येतात. त्यांची क्षारता जास्त असते. म्हणून समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही.

ई) वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उत्तर :

कारण – i) सागरजलाचे तापमान हे सर्वत्र सारखे नसते. सागरी पृष्ठभागावरील पाणी सूर्याच्या उष्णतेने अधिक तप्त असते.

ii) समुद्रात सुमारे ३० ते ४० मीटर्स खोलीपर्यंत सूर्यकिरणे पोहोचतात.

iii) खोलीनुसार पाण्याचे तापमान घटत जाते. २०० मी. च्या पलीकडे सूर्यकिरणांचा थेट प्रभाव होत नाही. त्यामुळे या खोलीवर पाणी थंड असते. साधारणपणे १०० फॅदम खोलीवर -१२° से. ने तापमान घटलेले असते. खोलीनुसार तापमान घटण्याची क्रिया १८३० मीटरपर्यंतच होते. त्यानंतर मात्र सागरजलाचे तापमान सर्वत्र स्थिर आढळते. अशाप्रकारे वाढत्या खोलीनुसार सागरीजलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते.

उ) भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.

उत्तर :

कारण – i) अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्यांकडून गोड्या पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होते. तसेच बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते.

ii) तर बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या मुबलक प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा करीत असतात.

iii) बंगालच्या उपसागराची क्षारता हजारी २० तर अरबी समुद्राची क्षारता हजारी ३७ ते ३९ असते. म्हणून भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात.

ऊ) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

उत्तर :

कारण – i) मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात पर्जन्यमान कमी असते व नद्यांतून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो.

ii) या पट्ट्यांमध्ये बाळवंटी प्रदेश आहेत. त्यामुळे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते.

प्रश्न. ३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ?

उत्तर :

i) सागरजलाची क्षारता सर्व ठिकाणी सारखी नसते. स्थानपरत्वे त्यात कमी-अधिकपणा दिसून येतो.

ii) कारण सागरजलाच्या क्षारतेवर बाष्पीभावनाचा वेग, पर्जन्यमान, नदीवाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो.

iii) भूवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा, बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्त्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो.

आ) कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा.

उत्तर :

कारण – i) कर्कवृत्त आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो.

ii) त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळ जवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते.

इ) सागरजलाच्या तापमानभिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा.

उत्तर :

सागरजलाच्या तापमानाची भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.

i) अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५° से., मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६°से. टर ध्रुवीय प्रदेशात २° से. पर्यंत असते.

ii) याशिवाय सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादीचा ही परिणाम दिसून येतो.

iii) सागरी प्रवाहाचा सुद्धा सागरजलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे सागरजलाचे पृष्ठीय तापमान वाढते.

ई) खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

उत्तर :

i) सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात.

ii) परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते.

iii) ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४०° से. असते. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४° से. पर्यंतच कमी होते. त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.

iv) विषुववृत्ताजवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो.

उ) क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.

उत्तर :

क्षारतेवर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत.

i) शुद्ध पाण्याचा पुरवठा – विषुववृत्तीय प्रदेशात उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असले तरी वर्षभर पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शुद्ध पाण्याचा रोज भरपूर पुरवठा होतो. याचा परिणाम होऊन सागर जलाच्या पाण्याची क्षारता ही सुमारे ३४% – ३५% पेक्षा कधीही जास्त नसते.

ii)बाष्पीभवनाचा वेग – कर्क आणि मकरवृत्तांच्या दरम्यान वर्षभर आकाश निरभ्र असल्याने व तापमानही भरपूर असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड असतो. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा जवळजवळ नसल्याने या दरम्यान क्षारतेचे प्रमाण जास्त असते.

iii) पाण्याचे मिश्रण – मोठमोठ्या नद्या, हिमनद्या, वितळणारे बर्फ इत्यादींमुळे जर शुद्ध पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात समुद्रास होत असेल तर त्याच्या पाण्याची क्षारता कमी होते. या विरुद्ध जर शुद्ध पाण्याचा पुरवठा कमी असेल आणि जवळपासच्या पाण्याचे मिश्रण सागरी पाण्यात होत नसेल तर क्षारतेचे प्रमाण जास्त असते.

प्रश्न. ४. पुढील गोष्टींवर तापमानाचा काय परिणाम होतो, ते स्पष्ट करा.

अ) सागरी जलाची घनता

उत्तर :

सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात, म्हणजेच तापमान कमी झाले, की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते, तर उष्ण पाण्याची घनता कमी असते. मात्र विशिष्ट खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे असणारे सागरी जलाची घनता देखील सारखीच असते.

आ) सागरी जलाची क्षारता

उत्तर :

तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे पाण्याची क्षारता वाढते. म्हणून उष्ण कटिबंधात तसेच ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असते. त्यामुळे बाष्पीभवन देखील कमी होते. म्हणून क्षारता कमी असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी-कमी होत जाते. म्हणून क्षारता देखील कमी कमी होत जाते.

Leave a Comment