आपले घर व पर्यावरण स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

१. अ) पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल ? योग्य ठिकाणी ‘✓’ करा. त्यामागचे कारण लिहा.

उत्तर :

कारण – i) पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे, थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेणामातीने सारवलेले, गवताच्या छपरांचे, बहुमजली कच्चे घर योग्य ठरत नाही तर सिमेंट, विटा, कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते.
ii) पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही, तर तुलनेने लहान आकाराचे, बहुमजली व पक्के घर योग्य ठरते.
आ) बहुमजली घर बांधताना मुख्यत: कोणते साहित्य वापरतात ? योग्य पर्याय निवडा.
अ) वाळू/कोळसा/सिमेंट/विटा.
ब) सिमेंट/विटा/कापूस/लोखंड.
क) लोखंड/सिमेंट/वाळू/विटा.
उत्तर :
क) लोखंड/सिमेंट/वाळू/विटा.
२. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल ?
अ) आराम
आ) रचना
इ) हवामान
उत्तर :
घरे बांधताना वरील बाबींना मी पुढीलप्रमाणे प्राधान्यक्रम देईन : अ) हवामान ब) आराम क) रचना
३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत, त्यांची यादी करा.
उत्तर :
i) सौरचूल
ii) घरातील मोठ्या खिडक्या
iii) ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ.
iv) घरासमोरील अंगणातील फुलझाडे
आ) घरातील कोणती उपकरणे आपण सौरऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो ?
उत्तर :
i) गीझर
ii) पंखा
iii) घड्याळ
iv) कुकर
v) दिवे, इत्यादी
४. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते ?
उत्तर :
बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व जल प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते.