चला वृत्ते वापरूयात स्वाध्याय

चला वृत्ते वापरूयात स्वाध्याय

चला वृत्ते वापरूयात स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल

अ) अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.

1) 66°30′ उत्तर अक्षवृत्त म्हणजेच

आर्क्टिक वृत्त ✓

विषुववृत्त

अंटार्क्टिक वृत्त

2) कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागांत विभागते ?

कर्कवृत्त

मकरवृत्त

विषुववृत्त ✓

3) आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे ?

66°30′

90°

23°30′ ✓

4) o° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात?

दक्षिण महासागर

अटलांटिक महासागर ✓

आफ्रिका खंड

5) कोणत्या अक्षवृत्तांपर्यंत सूर्यकिरणे लंबरुप पडतात ?

कर्कवृत्त आणि मकरवृत्त ✓

आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्त

उत्तर आणि दक्षिण वृत्त

6) दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते ?

90° दक्षिण अक्षवृत्त ✓

90° उत्तर अक्षवृत्त

0° अक्षवृत्त

ब) खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा.

1) एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते.

2) एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात.

3) फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादींद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.

4) 0° पूर्व रेखावृत्त व 180° पूर्व रेखावृत्त

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : 0° रेखावृत्त व 180° रेखावृत्त

5) एखाद्या मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार, उगमाकडील स्थानाच्या अक्षांशपासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : एखादा मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार, उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो.

6) 8°4′ उत्तर अक्षवृत्त ते 37°66′ उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती आहे.

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

दुरुस्त विधान : 8°4′ उत्तर अक्षवृत्त ते 37°66′ उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे.

क) नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा. त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा.

उत्तर :

1) मुंबई : 19° उत्तर अक्षांश व 73° पूर्व रेखांश
2) गुवाहाटी : 26° उत्तर अक्षांश व 91° पूर्व रेखांश
3) श्रीनगर : 34° उत्तर अक्षांश व 75° पूर्व रेखांश
4) भोपाळ : 23° उत्तर अक्षांश व 77° पूर्व रेखांश
5) चेन्नई : 13° उत्तर अक्षांश व 80° पूर्व रेखांश
6) ओटावा : 45° उत्तर अक्षांश व 76° पश्चिम रेखांश
7) टोकियो : 36° उत्तर अक्षांश व 140° पूर्व रेखांश
8) जोहान्सबर्ग : 26° दक्षिण अक्षांश व 28° पूर्व रेखांश
9) न्यूयॉर्क : 41° उत्तर अक्षांश व 74° पश्चिम रेखांश
10) लंडन : 52° उत्तर अक्षांश व 0°8′ पश्चिम रेखांश

ड) पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या साहाय्याने लिहा.

उत्तर :

1) महाराष्ट्र (राज्य) – 16°03′ उत्तर अक्षांश ते 22° उत्तर अक्षांश आणि 72° पूर्व रेखांश ते 81° पूर्व रेखांश.

2) चिली (देश) – 16° दक्षिण अक्षांश ते 56° दक्षिण अक्षांश आणि 70°40′ पश्चिम रेखांश ते 70° पश्चिम रेखांश.

3) ऑस्ट्रेलिया (खंड) – 10°41′ दक्षिण अक्षांश ते 43°38′ दक्षिण अक्षांश आणि 113°09′ पूर्व रेखांश ते 153°38′ पूर्व रेखांश.

4) श्रीलंका (बेट) – 6°48′ उत्तर अक्षांश ते 9°50′ उत्तर अक्षांश आणि 79°40′ पूर्व रेखांश ते 81°45′ पूर्व रेखांश.

5) रशियातील ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग (सुरुवात-सेंट पीटसबर्ग, शेवट-व्हलॅडिव्होस्टॉक) – 59° उत्तर अक्षांश ते 43° उत्तर अक्षांश आणि 30° पूर्व रेखांश ते 132° पूर्व रेखांश.

इ) पुढील आकृतीत महत्त्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा. (कोनमापकाचा वापर करा.)

उत्तर :

ई) पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा.

उत्तर :

Leave a Comment