बंडूची इजार स्वाध्याय
बंडूची इजार स्वाध्याय इयत्ता पाचवी मराठी
प्रश्न. 1. चर्चा करून उत्तरे लिहा.
अ) बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती, तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते ? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.
उत्तर :
i) तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता किंवा
ii) इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती किंवा
iii) पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती
आ) इजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची ?
उत्तर :
इजारीची चड्डी झाली, यात चूक सगळ्यांचीच झाली. परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली. कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला, आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते.
इ) बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले, म्हणजे ‘पाय’ असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे लिहा.
उत्तर :
i) टेबलाचे पाय
ii) पेनची जीभ
iii) कपाचा कान
iv) बटाट्याचा डोळा
v) बाटलीचे तोंड
vi) सुईचे नाक
vii) कांगव्याचा दात
viii) चपलेचा अंगठा
प्रश्न. 2. खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा.
(कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड)
अ) चुलीवरच्या तव्याची ……………… काळीभोर झाली होती.
उत्तर :
चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती.
अर्थ : तव्याची पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू.
आ) कपाचा ………………… तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.
उत्तर :
कपाचा कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.
अर्थ : कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी.
इ) ‘हा नारळ नासका निघणार,’ नारळाचा ………………. बघून धनव्वा म्हणाली.
उत्तर :
‘हा नारळ नासका निघणार,’ नारळाचा डोळा बघून धनव्वा म्हणाली.
अर्थ : नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबण.
ई) मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे ……………… फुगले होते.
उत्तर :
मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते.
अर्थ : नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र.
उ) कितीही जोर लावला तरी बाटलीचे ……………….. उघडेना.
उत्तर :
कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.
अर्थ : बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच.
ऊ) चरवीतले दूध गंजात ओतले, तर ते गंजाच्या ……………… पर्यंत आले.
उत्तर :
चरवीतले दूध गंजात ओतले, तर ते गंजाच्या गळा पर्यंत आले.
अर्थ : गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू.
ए) सुईच्या …………….. दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली.
उत्तर :
सुईच्या नाक दोरा ओवून धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरू केली.
अर्थ : सुईचे नाक म्हणजे सूईचा नेढा.
ऐ) आंब्याच्या कोईचे …………… पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.
उत्तर :
आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोय चोखत राहिला.
अर्थ : आंब्याच्या कोईचे केस म्हणजे कोईवरचे तंतू.
ओ) आपले शेकडो ……………… पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.
उत्तर :
आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.
अर्थ : वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या.
औ) खोलीतल्या एकमेव खुर्चीचा ………………. मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.
उत्तर :
खोलीतल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.
अर्थ : खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभी असते.
‘भिंतीलाही कान असतात.’ ही म्हण आपण वापरतो. ‘भिंतीला’ कपांप्रमाणे कान नसतात. भिंतीला ‘कान’ असतात, हे कोणत्या अर्थाने वापरले आहे, ते शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा करून सांगा.
वरीलप्रमाणे ‘त्याच्या पैशाला पाय फुटले,’ असेही बोलताना आपण म्हणतो. यासारखी उदाहरणे शोधा. त्यांचा अर्थ माहीत करून घ्या. बोलण्यात त्यांचा वापर करा.
उत्तर :
i) भिंतीलाही कान असतात : आपले बोलणे कुणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कुणीही ऐकणार नाही, पण तसे नसते. कुणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो. असा ‘भिंतीलाही कान असतात’ यांचा अर्थ.
ii) पैशाला पाय फुटले : पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो, त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात.