इतिहास म्हणजे काय स्वाध्याय इयत्ता पाचवी इतिहास
इतिहास म्हणजे काय याचे प्रश्न उत्तर
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
अ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ………………. म्हणतात.
उत्तर :
भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.
आ) इतिहास केवळ ……………. च्या आधारे लिहिता जात नाही.
उत्तर :
इतिहास केवळ कल्पने च्या आधारे लिहिता जात नाही.
2. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ?
उत्तर :
प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही, है ठरवण्याच्या पद्धतीला ‘शास्त्रीय पध्दत’ असे म्हणतात.
आ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?
उत्तर :
स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्यलढा या कृतीचा परिणाम आहे.
इ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
उत्तर :
इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय, यांचाअभ्यास करणे शक्य होते.
3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ?
उत्तर :
i) इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही.
ii) भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेने पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो.
iii) आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते; म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे, असे म्हटले जाते.
आ) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात ?
उत्तर :
गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही; तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात.
4. संकल्पनाचित्र तयार करा.
उत्तर :
5. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.
इतिहासाची साधने – नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा.
भौतिक | लिखित | मौखिक |
---|---|---|
उत्तर :
भौतिक | लिखित | मौखिक |
---|---|---|
नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे, स्तंभ, राजमुद्रा, हाडे | पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ, हस्तलिखिते | जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा |