इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता सहावी

इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता सहावी

इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई ?

उत्तर :

सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई.

2) वेदवाड्मयातून कोणती माहिती मिळते ?

उत्तर :

इ.स.पू. 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासविषयीची माहिती वेदवाड्मयातून मिळते.

3) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे ?

उत्तर :

मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य पिढ्यान्पिढ्या जतन करून ठेवले आहे.

2. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.

ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ

उत्तर :

भौतिक साधने लिखित साधनेमौखिक साधने
मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य लोककथा, ओवी, पोवाडा, भजन

3. पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा.

उत्तर :

4. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा.

नाण्यावरील मजकूर, वापरलेला धातू, नाण्यावरील वर्ष
………………..………………..………………..
नाण्यावरील चिन्ह,नाण्यावरील चित्र,भाषा,
………………..………………..………………..
वजन,आकार,किंमत
………………..………………..………………..

उत्तर :

नाण्यावरील मजकूर, वापरलेला धातू, नाण्यावरील वर्ष
भारत, सत्यमेव जयते स्टेन्लेस् स्टील 2013
नाण्यावरील चिन्ह,नाण्यावरील चित्र,भाषा,
स्तंभशीर्ष कमळाचे फूल मराठी, इंग्रजी
वजन,आकार,किंमत
6 ग्रॅम गोल 2 ₹

5. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत ? त्यांचे गटात सादरीकरण करा.

उदा. कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी

उत्तर :

श्लोक

मना सज्जना भक्तिपंथेची जावे |

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||

जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे |

जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||

नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी ||

नको रे मना सर्वदा अंगिकारू |

नको रे मना मत्सरुदंभ भारू ||

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे |

मना बोलणे नीच सोशीत जावे ||

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसि रे नीववावे ||

Leave a Comment