सायकल म्हणते मी आहे ना स्वाध्याय

सायकल म्हणते मी आहे ना इयत्ता सहावी स्वाध्याय

सायकल म्हणते मी आहे ना स्वाध्याय

प्रश्न. 1. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात ?

उत्तर :

दुकानातून साबण आणण्याकरिता मुले सायकलचा वापर करतात. त्याचप्रमाणे भाजीपाला आणायला असेल तर मुले सायकलचा वापर करतात. कधी आजोबांच्या गोळ्या आणून द्यायला तर कधी दूध आणून द्यायला मुले सायकलचा वापर करतात. अशी छोटी-मोठी कामे करायला मुले सायकलचा वापर करतात.

आ) सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे ?

उत्तर :

घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात. या कारणामुळे सायकल चालवणाऱ्या वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे.

इ) सायकलच्या रुपात कसा कसा बदल होत गेला ?

उत्तर :

मुळात सायकल बिनगिअरची होती. आता तिला गिअरपण लागले आहेत. शर्यतीसाठी तिची बांधणी वेगळी असते. पर्यटनासाठी वेगळी असते. सायकलच्या रुपात असा बदल होत गेला.

प्रश्न. 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता, सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले, तर कोणकोणते फायदे होतील ?

उत्तर :

आपल्या देशात पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते. त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. प्रत्येकाने स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहन वापरले तर या इंधनात बचत होईल. त्यामुळे आपले जे चलन परदेशात जाते त्यात बचत होईल. शिवाय पार्किंगची अडचण दूर होईल. आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर असे राष्ट्रीय व सामाजिक लाभ होतील.

आ) तुमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?

उत्तर :

जेथे पार्किंगचा प्रश्न आहे तेथे सायकल कशी सहज उभी राहू शकते हे मी त्याला दाखवीन. किराणा कसा पटकन आणता येतो हे त्याला दाखवून देईल. भाजीपाला किंवा दळण आणताना पिशव्यांचा भार कसा वाटत नाही हे त्याला प्रत्यक्ष दाखवीत. औषध आणणे, दूध आणणे अशी कामे कशी पटापट होतात आणि सायकल चालवताना कसा उत्साह वाटतो हे ही त्याच्या अनुभवास आणून देईल. आमच्या कुटुंबातील, परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी मी हे सर्व प्रयत्न करीन.

प्रश्न. 3. खालील आकृतीत दिलेल्या मुद्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा.

उत्तर :

प्रश्न. 4. सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा.

उत्तर :

हँडल, ब्रेक, चाके, चेन, टायरट्यूब, बॉडी, सायकलची बेल, सायकलची सीट

प्रश्न. 5. सायकल शिकताना तुम्हांला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यांत लिहा.

उत्तर :

सुरुवातीला सायकल बद्दल मला फार नवल वाटायच ! सायकल कशी बरं चालवत असेल. ही सायकल चालवतांना आपण पडू का ? मला सायकल कोण शिकवेल ? असे प्रश्नही मला पडले. परंतु बाबांनी मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल घेऊन दिली मग मला सायकल शिकण्याची जिद्दच लागली.

माझ्या मोठ्या बहिणीने मला सायकल शिकविली. सायकल शिकताना प्रथम मी फार घाबरत असे. आपण पडू की काय अशी सारखी भीती मनात वाटायची. माझ्या बहिणीने मला सायकलवर बसविले. आणि तिने सायकल पकडुन हळूहळू सायकल शिकविली. त्यानंतर एकदा पडलोही. थोडेसे खरचटलही नंतर माझी भीती पार निघून गेली. नंतर काही दिवसांनी मला चांगली सायकल यायला लागली. मी मोठ्या ऐटीत सायकल चालवत असे. नंतर तर मी खूप वेगाने सायकल चालवत होतो. सायकलची बेल वाजवत होते. बेलचा आवाज ऐकताच लोक थोडे बाजूला व्हायचे, तेव्हा मला खूप मजा वाटायची. आता तर मी माझ्या मोठ्या बहिणीलाही डबलसीट घेऊन जातो.

प्रश्न. 6. संगणक तुमच्याशी बोलू लागला तर ….. कल्पना करा व लिहा.

उत्तर :

संगणक तुमच्याशी बोलू लागला तर तो आपलीच शेखी मिरवील. तो म्हणेल, मी म्हणजे तुम्हाला मिळालेले वरदान आहे. जी आकडेमोड करायला तुम्हाला एक वर्ष लागले असते ती मी दोन तासात करून देतो. शिवाय तुमच्या चुका होत असतात. माझं काम अचूक असते. आणखी असे की तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरून जाता पण तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी मी ‘मेमरी’ मध्ये साठवून ठेवतो आणि त्यातली एकही गोष्ट मी विसरत नाही. यामुळे मोठ्या उद्योगांचा मी प्राण झालो आहे. अंतराळयानाचा मार्गही मीच ठरवतो. आंतरजालामुळे मी सर्व पुस्तकातील माहिती तुम्हाला पुरवीत असतो. म्हणजे मी कितीतरी श्रेष्ठ आहे.

संगणकाने सांगितलेले सारे काही खरे असले तरी त्याचा गर्व काही खरा नसेल. आम्ही त्याला म्हणू, ‘तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण तुला स्वतंत्र बुद्धी नाही. आम्ही सांगू तेच तू करू शकतोस. आमचा तू गुलाम आहेस’.

प्रश्न. 7. सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळींत लिहा.

उत्तर :

मोटरसायकल – अग सायकल, किती हळूहळू धावतेस तू, मी तरी पाहा, तुझ्या नंतर निघाले आणि तुझ्याहून पुढे निघाले.

सायकल – खरं आहे. माझा वेग तुझ्यासारखा भरधाव नाही. पण तुला सांगू का ? तुला लोक घाबरतात, दचकून चालतात. कारण तू केव्हा त्यांचा अपघात करशील याचा नेमच नसतो. माझी अशी भीती लोकांना वाटत नाही. ते निर्भयपणे चालतात. अग, इंथं का थांबलीस ? चल ना पुढे ?

मोटरसायकल – अग, माझ्या पोटात पेट्रोल नाही. त्यामुळं मला पुढं जाताच येत नाही.

सायकल – माझं चांगलं आहे. मला पेट्रोलवर विसंबून न राहता स्वतंत्रपणे धावता येतं. तुझं जीवन पेट्रोलवर म्हणजे परावलंबी आहे.

खेळूया शब्दांशी

1) खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या.

अ) प्रचार व प्रसार

उत्तर :

प्रचार – प्रसिध्दी

प्रसार – पसरणे, फैलाव

आ) विश्वास व आत्मविश्वास

उत्तर :

विश्वास – खात्री, भरवसा

आत्मविश्वास – स्वतःबद्दल खात्री

2) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत उपयोग करा.

अ) रखडत चालणे

उत्तर :

रखडत चालणे – रेंगाळत चालणे

वा. उ. – म्हातारे बहुधा रखडत चालतात.

आ) धडा शिकणे

उत्तर :

धडा शिकणे – बोध घेणे

वा. उ. – नापास होण्यातून तो चांगलाच धडा शिकला.

इ) हातभार लावणे

उत्तर :

हातभार लावणे – मदत करणे

वा. उ. – कमू आईच्या घरकामाला हातभार लावते.

3) हलकीफुलकी म्हणजे खूप हलकी, तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा.

अ) कधीमधी

उत्तर :

कधीमधी – मधूनमधून

आ) अवतीभवती

उत्तर :

अवतीभवती – सभोवताल

इ) धामधूम

उत्तर :

धामधूम – गडबडगोंधळ

ई) फेरफटका

उत्तर :

फेरफटका – फिरणे, हिंडणे

उ) साधेसुधे

उत्तर :

साधेसुधे – अतिशय साधे

4) ‘आडरस्ता’ यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर :

आडवाट

आडमार्ग

आडगाव

आपण समजून घेऊया

खालील वाक्य वाचा.

माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले.

वरील वाक्यांत सहा नामे आली आहेत. ती नामे लिहा.

उत्तर :

i) माधव

ii) सरिता

iii) रस्त्याने

iv) खोडकरपणा

v) शाळेतून

vi) घरी

खालील यादी पूर्ण करा.

1. व्यक्तींची नावे :

उत्तर :

व्यक्तींची नावे – गणेश, सचिन, अवंती ……… इत्यादी

2. गावांची नावे :

उत्तर :

गावांची नावे – नागपूर, पुणे, मुंबई …… इत्यादी

3. नद्यांची नावे :

उत्तर :

नद्यांची नावे – गंगा, यमुना, गोदावरी……… इत्यादी

4. पर्वतांची नावे :

उत्तर :

पर्वतांची नावे – हिमालय, सह्याद्री, सातपुडा…….. इत्यादी

तुम्ही वर लिहिलेली सर्व नावे विशेषनामे आहेत, कारण ही नावे आपण ठरावीक वस्तू किंवा व्यक्तींना दिलेली नावे आहेत. त्यामुळे विशेषनामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो. व्यक्ती, गाव, नदी, पर्वत हे सर्व शब्द सामान्यनामे आहेत. कारण या शब्दांवरून ठरावीक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही, तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो. त्यांच्यात समान गुणधर्म, सारखेपणा जाणवतो.

खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा.

सतलज, बाग, कविता, लाडू, आंबेगाव, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, प्राजक्ता, मराठी, आई, कापड, बंडू, सह्याद्री.

सामान्यनाम बाग, लाडू, शाळा, कीटक, झेंडा, लाकूड, आई, कापड.
विशेषनाम सतलज, कविता, आंबेगाव, प्राजक्ता, मराठी, बंडू, सह्याद्री.

Leave a Comment