मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय
मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास
प्रश्न. 1. म्हणजे काय ?
1) चौथाई
उत्तर :
चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थाश भाग होय.
2) सरदेशमुखी
उत्तर :
सरदेशमुखी म्हणजे एक दशांश भाग होय.
प्रश्न. 2. एका शब्दांत लिहा.
1) बाळाजी मूळचा कोकणातील या गावाचा होता.
उत्तर :
श्रीवर्धन
2) बुंदेलखंडात याचे राज्य होते.
उत्तर :
छत्रसाल
3) या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला.
उत्तर :
रावेरखेडी
4) पोर्तुगिजांचा पराभव यांनी केला.
उत्तर :
चिमाजी आप्पा
प्रश्न. 2. लिहिते व्हा.
1) कान्होजी आंग्रे
उत्तर :
i) कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता.
ii) त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेतली होती.
iii) तसेच शाहू महाराजांच्या मुलखावर त्याने हल्ले केले. अशावेळी शाहू महाराजांसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत शाहूमहाराजांनी बाळाजीला पेशवा केले आणि त्यास कान्होजी विरुद्ध पाठवले.
iv) परंतु युद्ध टाळून मुत्सद्देगिरीने बाळाजी विश्वनाथाने कान्होजीस शाहूमहाराजांच्या बाजूस वळवले.
2) पालखेडची लढाई
उत्तर :
i) बादशाहा फर्रुखसियरने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यांतून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले याला निजामाचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला.
ii) बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाला औरंगाबादजवळ पालखेड येथे पराभव केला. हिच पालखेडची लढाई होय. या लढाईनंतर निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला.
3) बाळाजी विश्वनाथ
उत्तर :
i) बाळाजी विश्वनाथ हे मूळचे कोकणातील श्रीवर्धन गावचे होत.
ii) ते कर्तृत्ववान व अनुभवी होते.
iii) शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवा केले.
iv) त्यांनी शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत, हे पटवून देऊन अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळवले.
4) पहिला बाजीराव
उत्तर :
i) शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव याची इ. स. 1720 मध्ये पेशवेपदी नेमणूक केली.
ii) पेशवेपदाच्या वीस वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला.
iii) बाजीराव हा एक उत्तम सेनानी होता. आपल्या पराक्रमाने त्याने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने मराठ्यांच्या सत्तेला अखिल भारतीय पातळीवरील एक प्रबळ सत्ता म्हणून स्थान मिळवून दिले.
प्रश्न. 3. कारणे लिहा.
1) मराठेशाहीत स्वतंत्र दोन राज्ये निर्माण झाली.
उत्तर :
कारण – i) शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यातील काही काळ विरोध चालू राहिला.
ii) इ. स. 1710 मध्ये महाराणी ताराबाईनी पन्हाळगडावर आपला अल्पवयीन मुलगा शिवाजी (दुसरा) यास छत्रपती म्हणून घोषित केले. त्यामुळे मराठेशाहीत सातारच्या राज्याखेरीज कोल्हापूरचे अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.
2) आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
उत्तर :
कारण – i) औंरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर शाहजादा आझमशाच्या ताब्यात राजपूत्र शाहू होते.
ii) शाहू महाराजांना कैदेतून सोडल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतींच्या गादीसाठी कलह होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची होईल, असे आझमशाहाला वाटले. म्हणून आझमशाहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.
3) दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.
उत्तर :
कारण – i) मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी, अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता.
ii) त्याशिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यांमुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. त्यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या साहाय्याची गरज होती.