काळे केस स्वाध्याय

काळे केस स्वाध्याय

काळे केस स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

1) आकृत्या पूर्ण करा.

अ)

उत्तर :

आ)

उत्तर :

2) कारणे शोधा.

अ) लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण…………..

उत्तर :

लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

आ) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण……………

उत्तर :

लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वतःच्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.

3) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

अ) केसभर विषयांवर

उत्तर :

अगदी थोडीसुद्धा विषयातर

आ) केसांत पांढरं पडण्याची लागण

उत्तर :

केस पांढरे होणे

इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड

उत्तर :

कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.

4) खालील शब्दसमूहांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा.

वाक्प्रचारअर्थ
अ) गुडघे टेकणे.
आ) खनपटीला बसणे
इ) तगादा लावणे
ई) निकाल लावणे
उ) पिच्छा पुरवणे

उत्तर :

वाक्प्रचारअर्थ
अ) गुडघे टेकणे.शरण येणे
आ) खनपटीला बसणेसारखे विचारत राहणे
इ) तगादा लावणेपुन्हा पुन्हा विचारणे
ई) निकाल लावणेसंपवणे
उ) पिच्छा पुरवणेएखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे

5) खालील शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

i) निष्णात

उत्तर :

माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.

ii) झिलई

उत्तर :

झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.

iii) नित्यनेम

उत्तर :

मधू नित्यनेमाने व्यायाम करतो.

iv) लहरी

उत्तर :

आपण कधी लहरी वागू नये.

v) तगादा

उत्तर :

‘खाऊ दे’ असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.

6) खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

अ) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारणांप्रमाणे उडू लागतात.

उत्तर :

उपमा

आ) तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो.

उत्तर :

चेतनगुणोक्ती

इ) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते.

उत्तर :

उपमा

7) खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.

अ) मातीच्या ढिगात सुख-दुःखाचे माणिकमोती आढळतात.

उत्तर :

सुख X दु:ख

आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते.

उत्तर :

गर्भित X उघड

इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी.

उत्तर :

स्तुती X निंदा

ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

उत्तर :

प्रश्न X उत्तर

परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना

i) परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.

ii) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

8) विरुद्धार्थी शब्द लिहा.

अ) अवरोह X

उत्तर :

अवरोह X आरोह

आ) अल्पायुषी X

उत्तर :

अल्पायुषी X दीर्घायुषी

इ) सजातीय X

उत्तर :

सजातीय X विजातीय

ई) दुमत X

उत्तर :

दुमत X एकमत

उ) नापीक X

उत्तर :

नापीक X सुपीक

9) स्वमत

अ) लेखकाने खनपतिला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर :

खनपटीला बसलेल्या गृहस्थानी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात. पण कलप लावणे हे काम जिकिरीचे असते. खर्चिक, वेळखाऊ आणि कंटाळवाणे असते. कधी कधी ते राहून जाते. अर्धवट पांढरे-तांबूस केस माणसाचे रूप दयनीय बनवतात. शिवाय कलपाचा एक वाईट परिणामही होतो. कलपामुळे सगळेच केस विलक्षण वेगाने पांढरे होत जातात. चांगले करायला जाता जाता वाईट घडते ते हे असे.

वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.

आ) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे. जुन्या आठवणी निघायच्या. जुन्या आठवणी काढून सर्वजण आपला जुना काळ जागवायचे. सर्वच माणसे तसेच करतात. बालपणीच्या काळात निर्व्याजपणा त्या वेळच्या कृतींमध्ये डावपेच नसतात. एक प्रकारचा निर्मळपणा असतो. लेखक आणि त्यांचे जुने स्नेही जुन्या आठवणी काढून काढून त्या निर्मळपणा आनंद घेऊ पाहायचे.

जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जाते. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जाते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणापासून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

इ) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.

उत्तर :

प्रत्येकाची विचार करण्याची सवय वगैरे वेगवेगळी असते हे मला आता पटू लागले आहे. आम्ही विद्यार्थी म्हणजे मोठे लेखक नव्हेत. लेखकांना विविध प्रकारे विचार करावा लागतो. आम्हांलाही तसा विचार करावा लागतो का ? मी माझे नीट निरीक्षण केले आहे. होय, विचार करावा लागतो. लेखकांनी हे असे इथे का म्हटले आहे ? आपण असे कधी म्हणतो का ? यावर कोणता प्रश्न येऊ शकेल ? त्याचे उत्तर कसे तयार करायचे ? असे अनेक प्रश्न मला पडतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. हे सर्व म्हणजे आमचा अभ्यास हा विचार करण्याचाच भाग आहे.

मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते. सर्व जग निवांत झालेले असते. कुठेही खट्टखुट्ट होत नाही. आपण आणि फक्त आपला अभ्यास. मग कितीही जागरणं करावी लागली, तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही. माझी एक मैत्रीण आहे. तिला सकाळी लवकर उठून, आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते. सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ती सलग शांतपणे अभ्यास करू शकते. आमच्या एका मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते. आमच्यापैकी काही जणांना दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते. कारण काय, तर सकाळी वर्गात शिकविलेले मनात ताजे असते ! विशेष म्हणजे त्या त्या वेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो. म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगवेगळी असते, हेच खरे.

भाषाभ्यास

तत्पुरुष समास

खालील तत्पुरुष समासातील सामाजिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामाजिक शब्दविग्रहविभक्ती
अ) सभागृहसभेसाठी गृह
आ) कलाकुशलकलेत कुशल
इ) ग्रंथालयग्रंथांचे आलय
ई) कष्टसाध्यकष्टाने साध्य
उ) रोगमुक्तरोगापासून मुक्त

उत्तर :

सामाजिक शब्दविग्रहविभक्ती
अ) सभागृहसभेसाठी गृहचतुर्थी
आ) कलाकुशलकलेत कुशलसप्तमी
इ) ग्रंथालयग्रंथांचे आलयषष्ठी
ई) कष्टसाध्यकष्टाने साध्यतृतीया
उ) रोगमुक्तरोगापासून मुक्तपंचमी

खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दांचा विग्रह करा.

अ) आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.

उत्तर :

सूर्यप्रकाश – सूर्याचा प्रकाश

आ) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.

उत्तर :

देशार्पण – देशाला अर्पण

इ) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

उत्तर :

ऋणमुक्त – ऋणापासून मुक्त

ई) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.

उत्तर :

तोंडपाठ – तोंडाने पाठ

Leave a Comment