असे जगावे स्वाध्याय
असे जगावे स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी

प्रश्न. 1. जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1) कवेत अंबर घेताना | अ) जगाला गहिवर यावा. |
| 2) काळीज काढून देताना | आ) अनेक मार्ग मिळतात. |
| 3) शेवटचा निरोप देताना | इ) ओठांवर हसू असावे. |
| 4) इच्छा दांडगी असेल तर | ई) पाय जमिनीवर असावेत. |
उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1) कवेत अंबर घेताना | ई) पाय जमिनीवर असावेत. |
| 2) काळीज काढून देताना | इ) ओठांवर हसू असावे. |
| 3) शेवटचा निरोप देताना | अ) जगाला गहिवर यावा. |
| 4) इच्छा दांडगी असेल तर | आ) अनेक मार्ग मिळतात. |
प्रश्न. 2. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
उत्तर :
या दुनियेतून जाताना असे काहीतरी कर्तृत्व करून जावे की आपल्याला निरोप देताना जगाच्या डोळ्यात अश्रू येतील. आपण आपल्या जीवनात असे काहीतरी कार्य करावे की त्यामुळे आपल्या मृत्यूने जगाला दु:ख होईल.
प्रश्न. 3. संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
जीवनात अनेक संकटे येतात. पण संकटांना घाबरू नये. उलट छातीठोकपणे त्यांचे आव्हान स्वीकारावे. त्या संकटांकडे निर्भयपणे नजर रोखून पाहावे आणि आयुष्यात त्यांना सडेतोड उत्तर द्यावे. हीच संकटात वागण्याची खरी रीत होय.
प्रश्न. 4. ‘संकटांना न घाबरता तोंड द्यावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर :
हत्तीचे बळ असलेल्या अफझलखानाने विजापूरच्या दरबारात प्रतिज्ञा केली होती की मी शिवाजीला घोड्यानिशी पकडून आणीन किंवा त्याचा मुर्दा पाडीन. हिंदवी स्वराज्यावरचे हे सर्वात मोठे संकट होते. तो प्रचंड फौजेसह शिवाजीवर चालून आला. पण या संकटाला न घाबरता शिवाजीमहाराजांनी खानाच्या शक्तीला युक्तीने तोंड देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे पावले टाकून महाराजांनी खानाचाच वध केला. त्याच्या सैन्याचा पराभव केला आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले. हे सर्व शिवाजीमहाराजांनी आलेल्या संकटाला न घाबरता तोंड दिले म्हणून घडून आले.
प्रश्न. 5. कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात, संकटांचा धैर्याने सामना करावा, आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने या कवितेतून दिला आहे.
खेळूया शब्दांशी
अ) खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1) नजर रोखणे. | अ) वास्तवाचे भान ठेवणे. |
| 2) पाय जमिनीवर असणे. | आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. |
| 3) गगन ठेंगणे होणे. | इ) निर्भयपणे पाहणे. |
| 4) कवेत अंबर घेणे. | ई) खूप आनंद होणे. |
| 5) काळीज काढून देणे. | उ) अशक्य गोष्ट शक्य करणे. |
उत्तर :
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| 1) नजर रोखणे. | इ) निर्भयपणे पाहणे. |
| 2) पाय जमिनीवर असणे. | अ) वास्तवाचे भान ठेवणे. |
| 3) गगन ठेंगणे होणे. | ई) खूप आनंद होणे. |
| 4) कवेत अंबर घेणे. | उ) अशक्य गोष्ट शक्य करणे. |
| 5) काळीज काढून देणे. | आ) प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. |
आ) कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
1) अत्तर
उत्तर :
अत्तर – उत्तर
2) ताऱ्यांची
उत्तर :
ताऱ्यांची – स्वप्नांची
3) जाताना
उत्तर :
जाताना – देताना
इ) खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
1) पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.
उत्तर :
पाय असावे जमिनीवरती, कवेत आकाश घेताना.
2) असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर.
उत्तर :
असे जगावे, छाताडावर आमंत्रणाचे लावून अत्तर.
3) असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.
उत्तर :
असे दांडगी इच्छा ज्याची, वाटा (रस्ते) तयाला मिळती सत्तर.
4) नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.
उत्तर :
नजर रोखुनी नजरेमध्ये, जीवनाला द्यावे उत्तर.
5) स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर.
उत्तर :
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कंपित कंपित.
मैत्री तंत्रज्ञानाशी
तुम्हांला येथे काही अँप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही अँप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.
उत्तर :
विचार करा. सांगा.
तुम्हांला मोबाइल/संगणकावरील कोणती अँप्स वापरायला आवडतात ?
उत्तर :
आम्हांला मोबाइल/संकणकावरील इंटरनेट ही अँप्स वापरायला आवडते.
अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या अँपचा वापर करणे तुम्हांला आवडते का ? सकारण सांगा.
उत्तर :
होय. कारण अभ्यासाशीसंबंधित माहिती इंटरनेट या अँप्समुळे मिळते. म्हणून यासारखी अँप्स वापरणे आम्हांला आवडते.
या विविध अँप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का ? असल्यास/नसल्यास का ते सांगा.
उत्तर :
या विविध अँप्सचा उपयोग आम्हांला आवश्यक वाटतो. कारण या अँप्समुळे जगातील सर्व माहिती उपलब्ध होते.
मोबाईल/संगणकावरील अँप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल ?
उत्तर :
मोबाईल वरील काही अँप्स मुलांची दिशा भूल करणारे आहेत. शिक्षणाशी संबंधित अँप्स माहिती करून घेऊ व तेच वापरू, ही दक्षता घेऊ.
तुम्हांला अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी कठीण वाटतात ? त्यासाठी कोणती अँप्स तयार व्हावीत असे तुम्हांला वाटते ?
उत्तर :
नवीन अभ्यासकरामत धड्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेच मिळत नाही. ती इयरत्र पुस्तकांतून शोधावी लागतात. म्हणून असे अँप्स तयार व्हावेत की कुठल्याही प्रश्न असो तो त्यात मिळाला पाहिजे, असे मला वाटते.
मैत्री तंत्रज्ञानाशी

मुलांनो, तुम्ही दररोज मोबाईल व संगणक हाताळत आहात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध सोईसुविधा आपल्याला या माध्यमांद्वारे पुरवल्या जातात.
या सुविधा म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर अँप्लिकेशन्स असतात. त्याला तुम्ही अँप्स असेही म्हणता.
तुम्हांला येथे काही अँप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही अँप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.
उत्तर :
