सामाजिक आरोग्य स्वाध्याय
सामाजिक आरोग्य स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १

१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
अ) निरामयतेमुळे आपल्यातील …………. भावना वाढते.
उत्तर :
निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते.
आ) तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने ………….. मध्येही, कर्करोग होऊ शकतो.
उत्तर :
तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिके मध्येही, कर्करोग होऊ शकतो.
इ) अति ……….. मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
उत्तर :
अति मद्यपाना मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
ई) देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ……………
उत्तर :
देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक.
उ) व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे ………….. व सार्वजनिक ……………. प्राप्त करता येते.
उत्तर :
व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते.
२. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
अ) प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता कीटकदंशापासून होणारे आजार, सामाजिक आरोग्य चांगले बनवतात.
उत्तर :
चूक.
दुरुस्त विधान : प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता कीटकदंशापासून होणारे आजार, सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात.
आ) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे.
उत्तर :
बरोबर
इ) पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते.
उत्तर :
बरोबर
ई) आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरायम जीवन जगता येत नाही.
उत्तर :
चूक
दुरुस्त विधान : आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरायम जीवन जगता येते.
३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) उत्तम आरोग्य कसे मिळवता येते ?
उत्तर :
उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी स्वच्छ आणि पौष्टिक अन्न खावे, नियमित व्यायाम करावा, पुरेसे पाणी प्यावे व स्वच्छता पाळावी. वेळेवर झोप घेणे आणि आनंदी राहणे देखील आवश्यक आहे.
आ) सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते ?
उत्तर :
सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक म्हणजे भांडण-तंटे, अस्वच्छ परिसर, व्यसनाधीनता, असमानता, स्वच्छता व्यवस्था आणि समाजातील दुर्लक्ष किंवा गैरसमज यांसारखे प्रकार.
इ) तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते ?
उत्तर :
तंबाखू खाल्ल्याने दात खराब होतात, तोंडाला दुर्गंधी येते, श्वासोच्छ्वासाच्या समस्या होतात आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
ई) मद्यपानाचे घातक परिणाम कोणते ?
उत्तर :
मद्यपान केल्याने आरोग्य कमजोर होते, यकृताचे नुकसान होते, विचारशक्ती मंदावते आणि अपघात व भांडणांची शक्यता वाढते.