धाडसी कॅप्टन राधिका मेनन स्वाध्याय

धाडसी कॅप्टन राधिका मेनन स्वाध्याय

धाडसी कॅप्टन राधिका मेनन स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. चौकटी पूर्ण करा.

अ) राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव –

उत्तर :

कोदुनगलर

आ) पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स –

उत्तर :

मरीन कॉलेजात रेडिओ कोर्स

इ) मर्चट नेव्हीच्या जय जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज –

उत्तर :

संपूर्ण स्वराज्य

ई) राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार –

उत्तर :

अवॉर्ड फॉर एक्सेप्शनल ब्रेव्हरी ॲट सी.

प्रश्न. 2. कारणे लिहा.

अ) राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जवांसं वाटायचं, कारण…………………

उत्तर :

ती नेहमी समुद्राच्या उसळणाऱ्या नखरेल लाटा पाहत असे.

आ) त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण………………

उत्तर :

त्यांना वाटत होते नाजूक प्रकृतीची राधिका समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.

इ) बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यत पोहोचण्यास अडथळे आले, कारण……………..

उत्तर :

वादळाचा जोर इतका मोठा होता की टीमला नावेपर्यंत जाताच येईना.

प्रश्न. 3. आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 4. मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 5. स्वमत लिहा.

अ) कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांपर्यत पोचण्याचा निकराने प्रयत्न केला. पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यत जाता आले नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला. राधिकाने तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतले सातही मच्छीमार सहीसलामत वाचले होते.

आ) धाडस आणि हिंमत असली, की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा.

उत्तर :

धाडस आणि हिंमत असल्यामुळेच नौसेनेत जाण्याच्या राधिकेच्या निर्धाराला विरोध असूनही तिच्या आईवडिलांना तिला परवानगी द्यावी लागली. धाडस आणि हिंमतीमुळे ती आपली नोकरी, संसार व मुलाला सांभाळू शकली. मच्छीमारांना वाचवण्याचे प्रयत्न दोनदा असफल झाल्यावरही तिसऱ्यांदा त्यांचे प्राण ती वाचवू शकली. या सर्व घटनांतून धाडस आणि हिंमत असली की, कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे सिद्ध होते.

इ) मोठेपणी तुम्हांला कोण व्हावेसे वाटते आणि का, ते थोडक्यात लिहा.

उत्तर :

मोठेपाणी वनाधिकारी व्हावे असे मला खूप खूप वाटते. मला माहित आहे की, वनाधिकारी बनणे कठीण असते. खूप शिकावे लागते. खूप अभ्यास करावा लागतो. कठीण परीक्षा द्याव्या लागतात. शिवाय नोकरीत असताना नेहमीच जंगलात राहावे लागते. शहरातील सूखे तिथे मिळत नाहीत. आपल्या माणसांपासून दूर राहावे लागते. या अडचणी साध्या नाहीत. तरीही मी वनाधिकारी होणार. माझे हे स्वप्न आहे.

मी हे ध्येय बाळगण्यामागे कारणेही तशीच महत्त्वाची आहेत. सध्या आपली जंगले बेकायदेशीर रितीने तोडली जात आहेत. आपली जंगले नष्ट होत आहेत. जंगलातले प्राणी आपले सखेसोबती आहेत. पण त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. जंगल टिकले नाही, प्राणी वाचले नाहीत, तर माणूसही जिवंत राहणार नाही, मला पर्यावरण वाचवायचे आहे. पृथ्वीला वाचवायचे आहे. म्हणून मी वनाधिकारी होणार आहे.

खेळूया शब्दांशी

खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा वापर करून वाक्ये तयार करा.

1) युध्दप्रसंगी सैनिक जिवाची बाजी लावून लढत असतो.

उत्तर :

जिवाची बाजी लावणे – क्रांतिकारकांनी स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावली होती.

2) मच्छीदार मदतीसाठी जिवाच्या आकांताने ओरडत होते.

उत्तर :

जिवाच्या आकांताने ओरडणे – सापाला अचानक आलेले पाहताच मंदा जिवाच्या आकांताने ओरडली.

आपण समजून घेऊया

1) खालील जोडशब्दांचा संधिविग्रह करून तक्ता पूर्ण करा.

संधी संधिविग्रह
सुरेश ……… + ……….
निसर्गोपचार ……… + ……….
भाग्योदय ……… + ……….
राजर्षी ……… + ……….

उत्तर :

संधी संधिविग्रह
सुरेश सुर + ईश
निसर्गोपचार निसर्ग + उपचार
भाग्योदय भाग्य + उदय
राजर्षी राजा + ऋषी

2) खालील तक्ता पूर्ण करा.

संधिविग्रहसंधी
महा + ईश ……………..
राम + ईश्वर ……………….
धारा + उष्ण ……………….
सह + अनुभूती ……………….
लाभ + अर्थी ……………….

उत्तर :

संधिविग्रहसंधी
महा + ईश महेश
राम + ईश्वर रामेश्वर
धारा + उष्ण धारोष्ण
सह + अनुभूती सहानुभूती
लाभ + अर्थी लाभार्थी

जाहिरात लेखन

खालील जाहिरातीचे वाचन व निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) उत्तरे लिहा.

1) जाहिरातीचा विषय –

उत्तर :

जि. प. वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा, पिसगाव येथे प्रवेश

2) जाहिरात देणारे (जाहिरातदार) –

उत्तर :

शाळा व्यवस्थापन समिती पिसगाव

3) वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक –

उतर :

100 टक्के गुणवत्तेची हमी.

4) जाहिरात कोणासाठी आहे ?

उत्तर :

इ. पहिली ते आठवीत प्रवेश घेऊ icchinatya मुला-मुलींसाठी.

आ) वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यांत कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा, असे तुम्हांला वाटते ?

उत्तर :

भावनिक आवाहन – उदा. ‘त्वरा करा.’ पश्चात्तापाची वेळ येऊ देऊ नका.

प्रलोभन – पहिल्या दहा विद्यार्थ्यांना गणवेश मोफत.

इ) तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये.

उत्तर :

Leave a Comment