शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय

शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय

शब्दकोश (स्थूलवाचन) स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द ‘अकारविल्हे’ प्रमाणे लावा.

उत्तर :

प्रश्न. 2. तुम्हांला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल ? सोदाहरण सांगा.

उत्तर :

मला ‘पाड्यावरचा चहा’ या पाठातील ‘मेढी’ या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. मी प्रथम शब्दकोशातील ‘म’ पासून सुरू होणाऱ्या शब्दाचे पृष्ठ उघडीन. नंतर ‘मू’ पर्यंत काहीच न पाहता ‘मे’ पाहीन. नंतर तेथेही ‘ड’ पर्यंत काहीच न पाहता ‘मेढ’ च्या पृष्ठानंतर ‘मेंढी’ हा शब्द मला आढळेल. त्या शब्दापुढे दिलेले अर्थ मी लक्षात घेईन.

प्रश्न. 3. शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर :

शब्दांचा अचूक अर्थ कळणे आणि शब्दाची व्युत्पत्ती लक्षात येणे, शब्दाचे लिंग कळणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे. शिवाय त्या शब्दाचे समानार्थी शब्दही त्यात असतात. त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्प्रचार व म्हणी हे ही त्यात पाहायला मिळतात.

प्रश्न. 4. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.

उत्तर :

i) शब्दकोशाचा उपयोग – शब्दांचा अचूक अर्थ कळणे, शब्दाची व्युत्पत्ती लक्षात येणे, शब्दाचे लिंग कळणे, समानार्थी शब्द, त्या शब्दापासून निर्माण झालेले म्हणी – वाक्प्रचार इ. चा बोध होणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे.

ii) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे – प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो ही कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, ‘शब्दकोश’ ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोशाची उद्दिष्टे आहेत.

भाषासौंदर्य

खाली काही कवी कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत. या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा.

i) रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला –

उत्तर :

इंदिरा संत

ii) आनंद आनंद गडे, इकडे इकडे चोहीकडे –

उत्तर :

बालकवी

iii) या बालांनो, या रे या ! लवकर भरभर सारे या ! –

उत्तर :

भा. रा. तांबे

iv) एका तळ्यात होती बदके पिले सुरेख –

उत्तर :

ग. दि. माडगुळकर

v) ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला –

उत्तर :

स्वा. सावरकर

vi) अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर –

उत्तर :

बहिणाबाई चौधरी

vii) छळूण घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही –

उत्तर :

अशोक थोरात

viii) बाळ, चाललासे रणा, घरा बांधिते तोरण –

उत्तर :

पद्मा गोळे

ix) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे –

उत्तर :

विं. दा. करंदीकर

x) या नभाने या भूमीला दान द्यावे –

उत्तर :

ना. धों. महानोर

xi) खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे –

उत्तर :

साने गुरुजी

xii) आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं –

उत्तर :

फ. मुं. शिंदे

Leave a Comment