इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता सहावी
इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता सहावी इतिहास
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई ?
उत्तर :
सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई.
2) वेदवाड्मयातून कोणती माहिती मिळते ?
उत्तर :
इ.स.पू. 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासविषयीची माहिती वेदवाड्मयातून मिळते.
3) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे ?
उत्तर :
मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य पिढ्यान्पिढ्या जतन करून ठेवले आहे.
2. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.
ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख, पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ
उत्तर :
भौतिक साधने | लिखित साधने | मौखिक साधने |
---|---|---|
मातीची भांडी, मणी, स्तूप, नाणी | प्रवासवर्णने, शिलालेख, वैदिक साहित्य | लोककथा, ओवी, पोवाडा, भजन |
3. पाठातील मातीच्या भांड्यांची चित्रे पहा व त्यांच्या प्रतिकृती तयार करा.
उत्तर :
4. कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा.
नाण्यावरील मजकूर, | वापरलेला धातू, | नाण्यावरील वर्ष |
……………….. | ……………….. | ……………….. |
नाण्यावरील चिन्ह, | नाण्यावरील चित्र, | भाषा, |
……………….. | ……………….. | ……………….. |
वजन, | आकार, | किंमत |
……………….. | ……………….. | ……………….. |
उत्तर :
नाण्यावरील मजकूर, | वापरलेला धातू, | नाण्यावरील वर्ष |
भारत, सत्यमेव जयते | स्टेन्लेस् स्टील | 2013 |
नाण्यावरील चिन्ह, | नाण्यावरील चित्र, | भाषा, |
स्तंभशीर्ष | कमळाचे फूल | मराठी, इंग्रजी |
वजन, | आकार, | किंमत |
6 ग्रॅम | गोल | 2 ₹ |
5. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत ? त्यांचे गटात सादरीकरण करा.
उदा. कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी
उत्तर :
श्लोक
मना सज्जना भक्तिपंथेची जावे |
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ||
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे |
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ||
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम नाना विकारी ||
नको रे मना सर्वदा अंगिकारू |
नको रे मना मत्सरुदंभ भारू ||
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे |
मना बोलणे नीच सोशीत जावे ||
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |
मना सर्व लोकांसि रे नीववावे ||