डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय

डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय

डॉ कलाम यांचे बालपण स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत ?

उत्तर :

कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे. कोणाला कुणी चेन्नईतल्या बाजारपेठेत सोन्याचांदीचे भाव समजण्याची उत्सुकता असे. काही लोक हिटलर, महात्मा गांधी, जीना यांच्यावर चर्चा करीत आणि सर्वानाच पेरियार इ. व्ही. रामस्वामी यांची चळवळ जाणून घेण्यात रस होता. लेखकाच्या लहानपणी लोक या वेगवेगळ्या कारणांसाठी वर्तमानपत्र वाचत असत.

आ) लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली ?

उत्तर :

दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम असा झाला की, रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. त्यामुळे वर्तमानपत्रांचे गठ्ठे चालत्या रेल्वेगाडीतून रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी लेखक शमसुद्दीनला मदत करायचे. लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई करण्याची संधी अशी मिळाली.

इ) डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले ?

उत्तर :

डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना म्हणाले की अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर, गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून, एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील, तिथे तुला जायला हवे. आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.

ई) रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता ?

उत्तर :

पन्नास हजारावर वस्ती असलेल्या रामनाथपुरम या शहरात सदैव गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा या शहरात लेखकाला अनुभवायला आला नाही. त्याला घराची ओढ अस्वस्थ करायची. या शहरात असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा त्याला आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मोलाची वाटत असे. यामुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता.

प्रश्न. 2. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) तुम्हांला आई, वडील, बहीण, भाऊ, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते ?

उत्तर :

आम्हांला आईमुळे सर्वांशी समानतेने आणि प्रेमाने कसे वागावे हे शिकायला मिळते. वडिलांकडून शिस्तीचे धडे मिळतात. बहीण व भाऊ यांच्याकडून अभ्यास कसा करावा हे शिकायला मिळते. शेजाऱ्यांकडून क्रिकेटबद्दल आणि काही समाजविषयी माहिती शिकायला मिळते. शिक्षकांच्या सहवासामुळे वाचनाचे महत्त्व आमच्या मनावर ठसले आहे.

आ) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता ? वर्तमानपत्रातील कोणता भाग तुम्हांला वाचायला अधिक आवडतो ? तो भाग का आवडतो ?

उत्तर :

आमची आर्थिक स्थिती सामान्य असल्यामुळे आमच्याकडे ‘लोकमत’ हे एकत्र वर्तमानपत्र येत असते. ते आम्ही वाचतो. त्यातला खेळ आणि क्रीडा हा भाग मला वाचायला अधिक आवडतो. कारण मला खेळांची आवड आहे आणि कुणी कोणत्या स्पर्धेत कसे प्रावीण्य मिळवले हे जाणून घेण्याची मला फार उत्सुकता असते.

इ) आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हांला तिची आठवण येते ?

उत्तर :

आई परगावी गेल्यावर जेवणाऱ्या वेळी तिची आठवण येते. कारण ती मुद्दाम माझ्याकरिता मला आवडणारे नवे नवे पदार्थ करून मला वाढत असते. मला चॉकलेट हवे असते त्यावेळी मला आईची हमखास आठवण येते. कारण चॉकलेटसाठी हवे असलेले पैसे मी आईकडूनच घेत असतो. माझे मित्र घरी येतात तेव्हा तेही आठवण काढत असतात कारण तिने माझ्यात आणि त्यांच्यात कोणत्याही भेदभाव केलेला नाही. अशा अनेक लहानमोठ्या प्रसंगात मला आईची आठवण येते.

ई) तुमच्या आई-वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते ? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?

उत्तर :

माझ्या आई-वडिलांना मी मोठेपणी डॉक्टर व्हावे असे वाटते. डॉक्टर होण्याकरिता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यासाठी प्रथमत: बारावीत खूप गुण मिळवावे लागतात. मी सतत मन: पूर्वक अभ्यास करून गुणवत्ता यादीत येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे प्रि-मेडिकल परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरिता भरपूर वाचन करणार आहे.

खेळूया शब्दांशी

1. खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा.

अ) परवानगी –

उत्तर :

पर, परवा, रवा, वार, वानगी, नर, नवा

आ) हजारभर –

उत्तर :

हर, हजार, भर, जार, रजा

इ) एकजिनसीपणा –

उत्तर :

एक, एकजिनसी, कप, जिन, जिक

ई) जडणघडण –

उत्तर :

जडण, घडण, जड, जण, घड

2. खालील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्ये तयार करा.

अ) वितरण –

उत्तर :

वा. उ. – माझा मित्र गॅस कंपनीत गॅसचा वितरक आहे.

आ) गिऱ्हाईक –

उत्तर :

वा. उ. – प्रामाणिक दुकानदारावर गिऱ्हाईक खुश असतात.

इ) वर्तमानपत्र

उत्तर :

वा. उ. – मला रोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे.

ई) एकलांबी तंबू

उत्तर :

वा. उ. – आमच्या घरात आमचे बाबा म्हणजे एकखांबी तंबू आहेत.

3. ‘एकखांबी तंबू’ म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. तसे खालील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

अ) कर्ताधर्ता –

उत्तर :

कर्ताधर्ता – सर्व कामाची जबाबदारी सांभाळणारा.

वा. उ. – आईवडील गेल्यावर कृष्णाच त्यांच्या घरातील कर्ताधर्ता बनला.

आ) खुशालचेंडू

उत्तर :

खुशालचेंडू – चैनी व निष्काळजी असलेला.

वा. उ. – वडिलांच्या भरपूर संपत्तीमुळे व लाडामुळे रघू खुशालचेंडू बनला आहे.

इ) लिंबूटिंबू

उत्तर :

लिंबूटिंबू – लिंबू व तशा इतर वस्तू वगैरे

वा. उ. – बाजारात जाऊन मी भाजी व लिंबूटिंबूही आणले.

ई) व्यवस्थापक

उत्तर :

व्यवस्थापक – व्यवस्था पाहणारे प्रमुख

वा. उ. – आमच्या हॉस्टेलचे व्यवस्थापक फार कर्तव्यदक्ष आहेत.

शोध घेऊया

अ. आंतरजालाच्या साहाय्याने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा.

अ) पूर्ण नाव

आ) आई-वडिलांचे नाव

इ) जन्मतारीख

ई) जन्मगाव

उ) शिक्षण

ऊ) भूषवलेली पदे

ए) लिहिलेली पुस्तके

उत्तर :

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम

महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल फकीर जैनुल आबिदीन अब्दुल कलाम आहे. त्यांच्या आईचे नाव आशिना व वडिलांचे नाव जैनुल आबिदीन होते. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 मध्ये दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या रामेश्वरम जिल्ह्यातील धनुष्कोडी या गावात एका कोळी कुटुंबात झाला होता.

डॉ. अब्दुल कलाम यांचे शालेय शिक्षण रामनाथपुरमच्या सक्वाट्र्ज हायस्कूल मध्ये झाले होते. त्यानंतर विज्ञान विषयात स्नातक ही पदवी तिरूचिरापल्लीच्या सेट जोसेफ कॉलेजमधून प्राप्त केली. 1954-57 मध्ये मद्रास इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एम. आई. टी.) मधून एरॉनॉटिकल इंजिनियरिंगचा डिप्लोमा प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

डॉ. अब्दुल कलाम यांची 1958 मध्ये डीटीडी एड पी. (एयर) मध्ये वरिष्ठ सहायक वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी भारतीय आंतरिक्ष अनुसंधान संगठन मध्ये 1963 ते 1982 पर्यंत विविध पदांचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर ते एरोडॉयनमिक्सशी जुडले. व थुम्बा सॅटेलाईट प्रक्षेपण यान टीम चे सदस्य बनले आणि लवकरच ते एस. एल. वी चे निर्देशक बनले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणाची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती म्हणून पद स्वीकारल्यानंतर आणि निवृत्ती घेतल्यानंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सोडले नाही. चेन्नई-आण्णा विद्यापीठात 2001 पासून कलाम प्राध्यापक होते. तेथे त्यांनी मार्गदर्शनाबरोबर संशोधनावरही भर दिला.

डॉ. कलाम हे वैज्ञानिक तर होतेच त्या व्यतिरिक्त ते उत्तम कवी व लेखक ही होते. त्यांनी लिहिलेली दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहे. त्यातील ‘इंडिया 2020’ आणि ‘विंग्ज ऑफ फायर एन ऑटो बॉयोग्राफी’ ही पुस्तके आहे. ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्राचे भाषांतर माधुरी शानभाग यांनी ‘अग्निपंख’ या नावाने केले आहेत.

आ. तुम्हांला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावाची यादी करा.

उत्तर :

मराठी – महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, तरुण भारत, लोकमत, पुण्य नगरी

हिंदी – नवभारत, दैनिक भास्कर, लोकमत समाचार

इंग्रजी – टाइम्स ऑफ इंडिया, बॉबे क्रॉनिकल, द हितवाद

खाली काही सामान्यनामे, विशेषनामे व भाववाचकनामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा.

नामे – देशमुख, चांगुलपणा, कडधान्य, कळसूबाई, पर्वत, वात्सल्य, शिखर, फूल, नवलाई, आडनाव, माणुसकी, हिमालय, मुलगी, नम्रता, जास्वंद, मटकी, सविता.

सामान्यनाम मुलगी, ………
विशेषनाम सविता, ……….
भाववाचकनाम माणुसकी, …….

उत्तर :

सामान्यनाम मुलगी, कडधान्य, पर्वत, शिखर, फूल, आडनाव.
विशेषनाम सविता, मटकी, कळसूबाई, हिमालय, जास्वंद, देशमुख.
भाववाचकनाम माणुसकी, चांगुलपणा, नवलाई, वास्तल्य, नम्रता.

खालील चित्रांच्या समोर सामान्यनाम, विशेषनाम, भाववाचकनाम लिहा.

उत्तर :

खाली दिलेल्या वाक्यांतील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा.

1. मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली.

उत्तर :

मनाली – विशेषनाम, मुंबईहून – विशेषनाम, गावी – सामान्यनाम

2. मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली.

उत्तर :

मुलांच्या – सामान्यनाम, हलगर्जीपणामुळे – भाववाचकनाम, इस्त्रीची – सामान्यनाम, वायर – सामान्यनाम

3. सुधीरला पुरणपोळी आवडते.

उत्तर :

सुधीरला – विशेषनाम, पुरणपोळी – विशेषनाम

4. ताजमहालचे सौंदर्य काही निराळेच आहे.

उत्तर :

ताजमहालचे – विशेषनाम, सौंदर्य – भाववाचकनाम

Leave a Comment