आपले समाजजीवन स्वाध्याय
आपले समाजजीवन स्वाध्याय इयत्ता सहावी नागरिकशास्त्र
1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला ………………. गरज वाटली.
उत्तर :
समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
2) माणसातील कलागुणांचा विकास ……………….. होतो.
उत्तर :
माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो.
3) आपल्या काही भावनिक आणि ………………. गरजाही असतात.
उत्तर :
आपल्या काही भावनिक आणि विचारशक्ती गरजाही असतात.
2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) आपल्या मूलभूत गरजा कोणत्या ?
उत्तर :
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहे.
2) आपल्याला कोणाचा सहवास आवडतो ?
उत्तर :
आपल्याला कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांचा सहवास आवडतो.
3) समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते ?
उत्तर :
समाजामुळे आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.
3. तुम्हांला काय वाटते ? दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
1) समाज कसा तयार होतो ?
उत्तर :
i) मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटित होऊ लागला. यातून समाज तयार झाला.
ii) व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून समाज तयार होतो.
iii) माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्ट्ये साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज तयार होतो.
2) समाजात कायमस्वरुपी व्यवस्था का निर्माण करावी लागते ?
उत्तर :
i) अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरुपी व्यवस्था निर्माण करावी लागते.
ii) समाजात कायमस्वरुपी व्यस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत.
iii) समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था आवश्यक आहे. म्हणून समाजात कायमस्वरुपी व्यस्था निर्माण करावी लागते.
3) माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते ?
उत्तर :
i) मानवाला समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. यातून समाज तयार झाला.
ii) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.
iii) त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले.
4) समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या ?
उत्तर :
i) समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही.
ii) जसे अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. जर शेती केली नाही तर अन्नपुरवठा होणार नाही.
iii) तसेच शेतीशी संबंधित सर्व कार्ये पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. या संस्था निर्माण झाल्या नाही तर शेतीशी संबंधित कार्ये पार पाडली जाणारा नाही. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने उपलब्ध होणार नाही, त्यांना कर्ज देण्यासाठी बँका व उत्पादित मालासाठी बाजारपेठा या बाबी उपलब्ध होणार नाही. अशा अनेक अडचणी आल्या असत्या.
4. पुढील प्रसंगी काय कराल ?
1) तुमच्या मित्राची / मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे.
उत्तर :
माझ्या मैत्रिणीची शालेय वस्तू म्हणजे पेन ती घरी विसरली तर माझ्याजवळ असणाऱ्या दोन पेनांपैकी एक पेन मी तिला देईल, त्यामुळे वर्गात तिला लिहायला मदत होईल.
2) रस्त्यात एखादी अंध / अपंग व्यक्ती भेटली.
उत्तर :
रस्त्यात एखादी अंध व्यक्ती भेटली तर तिचा हात धरुन तिला रस्ता ओलांडण्यात मदत करील. त्या व्यक्तीला जिथे जायचे असेल तिथे नेऊन देईल.