भरती-ओहोटी स्वाध्याय
भरती-ओहोटी स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल
प्रश्न. 1. जोड्या लावून साखळी बनवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
---|---|---|
लाटा | अष्टमी | वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. |
केंद्रोत्सारी प्रेरणा | अमावास्या | सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. |
गुरुत्वीय बल | पृथ्वीचे परिवलन | भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात. |
उधाणाची भरती | चंद्र, सूर्य व पृथ्वी | चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात. |
भांगाची भरती | वारा | पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट | ‘क’ गट |
---|---|---|
लाटा | वारा | भूकंप व ज्वालामुखीमुळेही निर्माण होतात. |
केंद्रोत्सारी प्रेरणा | पृथ्वीचे परिवलन | वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. |
गुरुत्वीय बल | चंद्र, सूर्य व पृथ्वी | पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. |
उधाणाची भरती | अमावास्या | सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. |
भांगाची भरती | अष्टमी | चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगळ्या दिशेने कार्य करतात. |
प्रश्न. 2. भौगोलिक कारणे सांगा.
1) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
उत्तर :
कारण – i) सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे.
ii) त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
2) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
उत्तर :
कारण – i) सागर किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात सागर जलाचा परिणाम होत असतो.
ii) त्यानंतर सावकाशपणे तरंगघर्षणामुळे सागरीय चबुतऱ्यांची वाढ होतो आणि सागर किनाऱ्याच्या पृष्ठभागावर गाळाचा पातळसा थर साचत राहतो.
iii) कालांतराने तरंगघर्षित मैदानाचा पूर्ण विकास झाल्यावर हे सागरकिनारे लाटांनी वाहून आणलेल्या पदार्थानी भरून निघतात. अशा प्रकारे वाळूच्या संचयनाने खाजण तयार होते. तसेच पाण्याच्या संचयनामुळे दलदलीचा भाग तयार होतो. म्हणून काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
3) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
उत्तर :
कारण – i) पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे केंद्रोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत कार्यरत असतात.
ii) एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असेल, तर या दोन रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तांवर ओहोटी असते. त्यामुळे ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते.
प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.
1) जर सकाळी 7.00 वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
उत्तर :
i) जर सकाळी 7.00 वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही दुपारी 1.12 मिनिटांनी व भरती रात्री 7.25 मिनिटांनी होईल.
ii) भरती-ओहोटी ही सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे.
iii) सागरातील पाण्याच्या पातळीत ठरावीक कालावधीने बदल होत असतो. दर 12 तास 25 मिनिटांनी भरती-ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते.
2) ज्या वेळी मुंबई (73° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी 1.00 वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा.
उत्तर :
ज्या वेळी मुंबई (73° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी 1.00 वाजता भरती असेल, त्यावेळी 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारण पूर्व रेखावृत्ताचा भाग हा चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याचवेळी पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस 107° पश्चिम रेखावृत्तावर भरती येईल.
3) लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.
उत्तर :
लाटानिर्मितीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. i) वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांनी निर्मिती होते. म्हणजेच लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे.
ii) तसेच सागर तळाशी झालेला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळेही लाटांची निर्मिती होते.
प्रश्न. 4. पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.
1) पोहणे 2) जहाज चालविणे 3) मासेमारी 4) मीठ निर्मिती 5) सागरी किनारी सहलीला जाणे
उत्तर :
1) पोहणे – i) समुद्रात पोहायचे असल्यास स्थानिक लोकांचा सल्ला ऐकणे महत्त्वाचे आहे. कारण पोहण्यावर भरती-ओहोटीचा परिणाम होतो.
ii) ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नये. कारण ओहोटी आत खेचून घेते व भरती बाहेर फेकते.
iii) काही किनारा एकदम खोल होत जातात, काही किनाऱ्यावर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा वेग जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, ते खूप धोकादायक ठरू शकतात.
iv) भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
2) जहाज चालविणे – i) भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात.
ii) सागरी प्रवाह जहाज चालविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जहाज चालविले जाते. कारण भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटा वेगाने समोर येतात व परत जातात. त्यामुळे लाटांना वेग वाढून जहाज ढकलले जाते व वेळेची बचत होते, तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च कमी होतो.
3) मासेमारी – i) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मारेमारीसाठी होतो.
ii) भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही. त्यामुळे मच्छिमाऱ्यांचे श्रम व वेळ वाचतो.
4) मीठ निर्मिती – i) मिठागरे हे समुद्राच्या किनारावर मीठ तयार करण्यासाठी केलेले वाफे असतात.
ii) भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात येते.
iii) सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते. अशाप्रकारे मीठ उत्पादनासारखे उद्योग समुद्र किनाऱ्यावर केले जाते.
5) सागर किनारी सहलीला जाणे – i) सागर किनारी सहलीला जातांना भरती-ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला भरती-ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे.
ii) या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हांला त्या त्या दिवसाची ‘तिथी’ माहीत असणे आवश्यक आहे. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते.
iii) भरती-ओहोटी बरोबरच एखाद्या ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार. खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्र किनारी सहलीला जावे.
प्रश्न. 5. भांगाची भरती-ओहोटी या आकृती 3.8 चे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) आकृती कोणत्या तिथीची आहे ?
उत्तर :
आकृती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीची आहे.
2) चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे ?
उत्तर :
चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोनात आहे.
3) या स्थितीचा भरती-ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल ?
उत्तर :
चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. त्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. त्यामुळे भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असेल तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असेल.
प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा.
1) भरती व ओहोटी
उत्तर :
भरती | ओहोटी |
---|---|
i) सागराच्या पाण्यात पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात. ii) एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते. iii) भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते. | i) सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास ओहोटी म्हणतात. ii) एकाच वेळी दोन रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तावर ओहोटी असते. iii) ओहोटीच्या वेळी पाणी मागे खेचल्या जाते. |
2) लाटा व त्सुनामी लाटा
उत्तर :
लाटा | त्सुनामी लाटा |
---|---|
i) लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. ii) लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भू-भागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळण निर्माण होते. iii) लाटा फारशा विनाशकारी नसतात. | i) सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखींमुळे त्सुनामी लाटांची निर्मिती होते. ii) त्सुनामी लाटा विध्वंसक असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. iii) त्सुनामी लाटा विनाशकारी असतात. |
प्रश्न. 7. भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.
उत्तर :
भरती-ओहोटीचे चांगले परिणाम – i) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो.
ii) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो.
iii) बंदरे गाळाने भरत नाहीत.
iv) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरास आणता येतात.
v) भरतीचे पाणी मीठगारात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते.
vi) भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते.
vii) भरती-ओहोटीमुळे तिवराची वने, किनारी भागांतील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.
भरती-ओहोटीचे वाईट परिणाम – i) भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.