नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय

नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सातवी

Table of Contents

प्रश्न. 1. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.

(तापमान, आकारमान, वस्तुमान, घनता, आर्द्रता, आम्लधर्मी, उदासीन, आकार)

1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या ………………. प्रमाणे ठरते.

उत्तर :

हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाणे ठरते.

2) पाण्याला स्वत:चा ……………… नाही, परंतु निश्चित ………………… व ………………… आहेत.

उत्तर :

पाण्याला स्वत:चा आकार नाही, परंतु निश्चित घनतावस्तुमान आहेत.

3) पाणी गोठताना त्याची ………………… वाढते.

उत्तर :

पाणी गोठताना त्याची आकारमान वाढते.

4) ………………. मृदेचा pH 7 असतो.

उत्तर :

उदासीन मृदेचा pH 7 असतो.

प्रश्न. 2. असे का म्हणतात.

1) हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

उत्तर :

कारण – i) पृथ्वीसभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सहा निष्क्रीय वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड इत्यादी वायूंचे मिश्रण असते.

ii) तसेच वायूंबरोबरच धूलिकण, पाण्याची वाफ (बाष्प) यांचा देखील समावेश हवेत होतो. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

2) पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

उत्तर :

कारण – i) सर्वसाधारण तापमानात पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते. पाण्याला रंग, चव व वास नसतो.

ii) अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात.

iii) द्रावक म्हणून पाण्याचा उपयोग कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळांमध्ये, अन्नपदार्थामध्ये, शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या पचन, उत्सर्जन इत्यादी अनेक प्रकारच्या जैविक प्रक्रियांमध्ये होतो. म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

3) स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

उत्तर :

कारण – i) पाणी ही सजीवांची अत्यंत आवश्यक गरज आहे. पाण्याशिवाय सजीव जीवंत राहू शकत नाही.

ii) सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, अन्न शिजवण्यासाठी, धुण्यासाठी आपण पाणी वापरत असतो. त्याऐवजी अन्य कुठल्याही पदार्थाचा वापर करता येत नाही.

iii) तसेच पाण्याच्याद्रव्यपदार्थ, पारदर्शक व उदासीन या सर्व गुणधर्मामुळे स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

प्रश्न. 3. काय होईल ते सांगा.

1) हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले.

उत्तर :

हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर आर्द्रतेचे प्रमाणही वाढेल. कारण हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. बाष्पाचे प्रमाण जास्त झाल्यास आपल्याला दमटपणा जाणवतो.

2) जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर :

जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीचा कस कमी होतो. ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही.

प्रश्न. 4. सांगा, मी कोणाशी जोडी लावू ?

‘अ’ गट ‘ब’ गट
1) हवा
2) पाणी
3) मृदा
अ) उत्सर्जन क्रिया
आ) प्रकाशाचे विकीरण
इ) आकार्यता

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1) हवा
2) पाणी
3) मृदा
आ) प्रकाशाचे विकीरण
अ) उत्सर्जन क्रिया
इ) आकार्यता

प्रश्न. 5. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा.

1) रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.

उत्तर :

बरोबर

2) समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे.

उत्तर :

बरोबर

3) ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

उत्तर :

बरोबर

4) हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

उत्तर :

बरोबर

प्रश्न. 6. खालील चित्रांविषयी स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

‘अ’ या आकृतीत खाचेत पाणी दिसत आहे. ‘आ’ या आकृतीत खाचेत बर्फ दिसत आहे. पाण्याचे बर्फ होताना पाणी गोठते, तेव्हा ते प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते. आकारमान वाढत असतांना तो तेवढी जागाही घेतो. म्हणून ‘आ’ या चित्रातील खाचेचा आकार ही वाढलेला दिसत आहे.

प्रश्न. 7. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

1) हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते ?

उत्तर :

i) हवा हे काही वायू तसेच धूळ व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे.

ii) जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. अशा प्रकारे हवेमुळे प्रकाशाचे विकिरण होते.

2) पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर :

पाण्याचे गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत.

i) पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे.

ii) पाणी रंगहीन, गंधहीन आणि चवहीन आहे.

iii) पाणी उदासीन आहे.

iv) पाणी पारदर्शक व द्रव्यपदार्थ आहे.

3) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते ?

उत्तर :

पावसाचे पाणी हलके असते. तर समुद्राच्या पाण्यात क्षार असल्याने त्या पाण्याची घनता वाढलेली असते. म्हणून समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त असते.

4) चांगल्या मृदारचनेचे महत्त्व काय आहे ?

उत्तर :

मृदारचनेवरच जमिनीची सुपीकता अवलंबून असते.

i) चांगल्या मृदारचनेमुळे मुळांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो.

ii) पाण्याचा निचरा चांगला होता, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते.

5) मृदेचे विविध उपयोग कोणते ?

उत्तर :

मृदेचे विविध उपयोग

i) वनस्पती संवर्धन – मृदेचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे वनस्पतींची वाढ करणे.

ii) जलसंधारण – मृदा पाणी धरून ठेवते. यामुळे बंधारे तळी या माध्यमांतून पाण्याला आपल्याला बाराही महिने उपयोग करता येतो.

iii) आकार्यता – मृदेला हवा तसा आकार देता येतो. मृदेच्या या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपल्याला विविध आकारांच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवता येतात. उदा. माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.

6) मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व काय आहे ?

उत्तर :

मृदा परीक्षणाची शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरज व महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

i) मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते.

ii) मृदेचे रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण मृदापरीक्षणामध्ये तपासले जाते.

iii) मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत हे ठरवण्यासाठी मृदापरीक्षण केले जाते.

7) ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय ?

उत्तर :

ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

i) आपल्याला ऐकू येणारं सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात.

ii) तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते.

iii) थंडीमध्ये हवेची घनता वाढते. थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. यावरून समजते की, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी, हवेचा माध्यम म्हणून उपयोग होतो.

8) पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये ?

उत्तर :

पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये. कारण

i) फ्रीझरचे तापमान गोठणबिंदूच्या खाली असल्याने फ्रीझरमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते.

ii) पाणी गोठत असताना पाणी प्रसरण पावते व त्याच्या आकारमानात वाढ होते.

iii) जर बाटली पाण्याने पूर्ण भरलेली असेल तर टि फुटेल. कारण पाण्याचा बर्फ होतांना त्याच्या आकारमानात वाढ होईल. त्याला मोकळी जागा न मिळाल्याने बाटली फुटेल.

Leave a Comment