सजीवांतील पोषण स्वाध्याय

सजीवांतील पोषण स्वाध्याय

सजीवांतील पोषण स्वाध्याय इयत्ता सातवी

Table of Contents

प्रश्न. 1. अन्नप्रकारांनुसार वर्गीकरण करा.

वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ, गोचीड.

उत्तर :

प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
1) परजीवी वनस्पती
2) कीटकभक्षी वनस्पती
3) मृतोपजीवी वनस्पती
4) सहजीवी वनस्पती
अ) भूछत्र
ब) दगडफूल
क) ड्रॉसेरा
ड) अमरवेल

उत्तर :

‘अ’ गट ‘ब’ गट
1) परजीवी वनस्पती
2) कीटकभक्षी वनस्पती
3) मृतोपजीवी वनस्पती
4) सहजीवी वनस्पती
ड) अमरवेल
क) ड्रॉसेरा
अ) भूछत्र
ब) दगडफूल

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

1) सजीवांना पोषणाची गरज का असते ?

उत्तर :

सजीवांना पुढील कारणांसाठी पोषणाची गरज असते.

i) काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा यासाठी पोषण आवश्यक आहे.

ii) शरीराची वाढ व विकास उत्तमरित्या व्हावी यासाठी.

iii) पेशींची झीज भरून काढण्यासाठी व ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी.

iv) शरीराला रोगांपासून वाचविण्यासाठी प्रत्येक सजीवाला पोषण आवश्यक आहे.

2) वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर :

काही वनस्पती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात.

वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया

i) जमिनीतील पाणी, पोषकतत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ असे म्हणतात.

कार्बन डायऑक्साइड + पाणी → / प्रकाश ऊर्जा अन्न (ग्लुकोज) + ऑक्सिजन

6 CO2 + 6 H2O → / हरितद्रव्य C6H12O6 + 6 O2

ii) वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात.

iii) मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते. तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवते. पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील CO2 घेतला जातो. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. पानांमधील हरितलवकात हरितद्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो.

3) परपोषी वनस्पती म्हणजे काय ? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा.

उत्तर :

ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात.

उदा. अमरवेल, बांडगूळ इत्यादी.

परपोषी वनस्पतींचे प्रकार

i) संपूर्ण परजीवी वनस्पती – काही वनस्पती हरितद्रव्ये नसल्याने संपूर्णपणे आश्रमी वनस्पतींवरच अवलंबून असते, म्हणून त्यांना संपूर्ण परजीवी वनस्पती असे म्हणतात. उदा. अमरवेल.

ii) अर्ध परजीवी वनस्पती – ज्या वनस्पती इतर वनस्पतींवर वाढून प्रकाशसंश्लेषण क्रिया, क्षार व पाणी त्यांच्या मार्फत मिळवतात, त्यांना अर्ध परजीवी वनस्पती म्हणतात. उदा. बांडगूळ

4) प्राण्यांमधील पोषणाचे विविध टप्पे / पायऱ्या स्पष्ट करा.

उत्तर :

पाण्यांमध्ये पोषण क्रियेचे अन्नग्रहणापासून उत्सर्जनापर्यंत विविध टप्पे आढळून येतात.

i) अन्नग्रहण – अन्न शरीरात घेणे.

ii) पचन – अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे यास ‘अन्नपचन’ असे म्हणतात.

iii) शोषण – पचनातून तयार झालेले विद्राव्य रक्तात शोषले जाणे.

iv) सात्मीकरण – शोषलेल्या द्रावणीय अन्नाचे शरीरातील पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती केली जाणे.

v) उत्सर्जन – पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न घटक शरीराबाहेर टाकले जातात.

5) एकाच पेशी सर्व जीवनक्रिया होणारे एक पेशीपेशीय सजीव कोणते ?

उत्तर :

अमिबा, युग्लीना, पॅरामेशिअम हे एकाच पेशीत सर्व जीवन क्रिया होणारे एकपेशीय सजीव आहेत.

प्रश्न. 4. कारणे लिहा.

1) कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

उत्तर :

कारण – i) कीटकभक्षी वनस्पती परपोषी असतात. त्यांचे पोषण दुसऱ्या वनस्पती किंवा कीटकांवर अवलंबून असते.

ii) स्वत:चे अन्न स्वत: तयार करू शकत नसल्यामुळे कीटकांना स्वत:कडे आकर्षित करणे फार गरजेचे असते. वनस्पतींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होऊ शकत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त भक्ष्य स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

2) फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर :

कारण – फुलातील रस शोषून घेऊन अन्नग्रहण करण्यासाठी फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

प्रश्न. 5. वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषणपद्धतीनुसार ओघतक्ता तयार करा.

उत्तर :

प्रश्न. 6. विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

1) आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का ?

उत्तर :

नाही. कारण अन्न तयार करण्यासाठी आपल्याला अन्नपदार्थाची जुळवा जुळव करावी लागते. मानव हा मिश्राहारी प्राणी आहे. तो अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्हींवर अवलंबून आहे. म्हणून आपण स्वयंपोषी नाही.

2) स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते ?

उत्तर :

परपोषी सजीवांची संख्या जास्त असते. त्यामानाने स्वयंपोषी सजीव कमी आहेत. कारण परपोषीमध्ये मानव, प्राणी, काही वनस्पती यांचा समावेश होतो. तर स्वयंपोषी मध्य फक्त हिरवी झाडे, झुडुपे, वेली यांचा समावेश होतो. म्हणून स्वयंपोषी सजीवांपेक्षा परपोषी सजीवांची संख्या जास्त आहे.

3) वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का ?

उत्तर :

i) वाळवंटी भागात पाण्याच्या कमतरतेमुळे निवडुंग, कोरफड यांसारख्या वनस्पती स्वत:च्या पोषणासाठी अन्न, पाणी हे घटक स्वत:च्या पानांमध्ये/खोडामध्ये साठवून ठेवतात. म्हणून त्या वनस्पती फक्त स्वत:चे पोषण त्या परिस्थितीमध्ये करू शकतात.

ii) इतर वनस्पती त्यांच्यावर अवलंबून राहण्यास अनुकूल वातावरण नसते. म्हणून परपोषी वनस्पती वाळवंटी भागात कमी आढळतात.

iii) याउलट परिस्थिती समुद्रामध्ये असते. सजीवांना पोषक वातावरण तेथे उपलब्ध असते. म्हणून समुद्रामध्ये परपोषी जास्त प्रमाणात आढळतात.

4) हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही ?

उत्तर :

कारण – i) वनस्पतींच्या पानांव्यतिरिक्त इतर कोणताही अवयव हिरवा नसतो.

ii) हिरव्या भागांत हरितलवक असते. त्या हरितलवकात हरितद्रव्य असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करते. म्हणून हिरव्या भागांव्यक्तिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.

5) बाह्य परजीवी व अंत:परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?

उत्तर :

i) बाह्य परजीवी प्राणी हे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात. उदा. लिखा, गोचीड, ढेकूण तर अंत:परजीवी प्राणी हे मानवी शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. उदा. पट्टकृमी, गोलकृमी.

ii) बाह्य परजीवीमुळे प्राणी व मानव यांच्या शरीरावर जखम तयार होते व खाज सुटते. तर अंत:परजीवीमुळे शरीरातील आंतरक्रिया बिघडते. जसे अतिसार, कॉलरा यांसारखे रोग उद्भवतात.

Leave a Comment