मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय
मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम स्वाध्याय इयत्ता सातवी इतिहास
प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडा.
1) औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता.
अ) शाहजादा अकबर
ब) छत्रपती संभाजी महाराज
क) छत्रपती राजाराम महाराज
उत्तर :
ब) छत्रपती संभाजी महाराज
2) बादशाहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे
अ) संताजी व धनाजी
ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण
क) खंडो बल्लाळ व रुपाजी भोसले
उत्तर :
ब) संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण
3) गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा
अ) येसाजी कंक
ब) नेमाजी शिंदे
क) प्रल्हाद निळाजी
उत्तर :
अ) येसाजी कंक
प्रश्न. 2. पाठात शोधून लिहा.
1) संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले ?
उत्तर :
मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आल्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले.
2) संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांना धडा शिकवण्याचे का ठरवले ?
उत्तर :
गोव्याच्या पोर्तुगिजांनी संभाजीमहाराजांच्या विरुद्ध बादशाहाशी हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी पोर्तुगिजांना धडा शिवण्याचे ठरवले.
3) राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली ?
उत्तर :
राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली.
4) महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे.
उत्तर :
महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दांत केले आहे.
“ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली |
दिल्ली झाली दीनवाणी | दिल्लीशाचे गेले पाणी |
रामराणी भद्रकाली | रणरंगी क्रुद्ध झाली |
प्रयत्नाची वेळ आली | मुगल हो सांभाळा ||
प्रश्न. 3. का ते लिहा.
1) औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला.
उत्तर :
कारण – मराठ्यांविरुद्धच्या मोहिमेमध्ये औरंगजेबाला यश येत नव्हते. हे पाहून त्याने मराठ्यांविरुद्धची मोहीम रद्द केली. त्यामुळे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्याकडे वळवला. आणि त्याने ही राज्ये जिंकून घेतली.
2) संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
उत्तर :
कारण – i) संभाजी महाराजाची औरंगजेबाने अमानुषपणे हत्या केली होती. आपण आता आपले मराठी राज्य जिंकून घेण्याचे स्वप्न साकार होणार असे औरंगजेबाला वाटू लागले.
ii) परंतु आपल्या छत्रपतींची या बादशाहाने आमनुषपणे हत्या केल्यामुळे मराठे अधिक जिद्दीने पेटून उठले.
iii) त्यामुळे त्यांनी संभाजी महाराजांचा धाकटा भाऊ राजाराममहाराज याला छत्रपती केले. आणि स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले.
3) महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
उत्तर :
कारण – i) बादशाहाने रायगडाला वेढा घालण्यासाठी झुल्फिकारखान यास पाठवले. यावेळी राजाराम महाराज व महाराणी ताराबाई, संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते.
ii) राजघराण्यातील सर्वानी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते, तेव्हा छत्रपतींनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे व जिंजीला जावे. यामुळे महाराणी येसूबाईच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.