अनाम वीरा स्वाध्याय
अनाम वीरा स्वाध्याय इयत्ता सातवी मराठी
प्रश्न. 1. कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते ?
अ) स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
उत्तर :
‘अनाम वीरा’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की, देशांच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले असे कितीतरी अनाम वीर आहे. ते अज्ञात आहेत. म्हणून त्यांच्या नावाने कुणी स्तंभ उभारला नाही किंवा त्यांची आरती गायिली नाही. कारण त्याचे बलिदान अज्ञात होते.
आ) जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !
उत्तर :
‘अनाम वीरा’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की, संसार सर्वांना प्रिय असतो. पण देशाचे रक्षण करायला आणि त्यासाठी प्राणांचे बलिदान द्यायला हे सैनिक संसाराचा त्याग करून रणांगणावर जातात.
इ) सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
उत्तर :
‘अनाम वीरा’ या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की, आपल्या बलिदानाप्रीत्यर्थं कुणी स्तंभ उभारले नाहीत, कुणी पोवाडे गायले नाहीत, कुणी आरती गायली नाही, पण याचा अर्थ बलिदान वाया गेले असा नाही. खरे तर त्याचेच बलिदान सफल झाले आहे.
प्रश्न. 2. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर :
प्रश्न. 3. खालील जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) धगधगतां समाराच्या ज्वाला | अ) शांतपणे मरण स्वीकारणे |
2) मरणामध्ये विलीन | आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता |
3) ना भय ना आशा | इ) भावना व्यक्त न करणे |
4) नच उधाणले भाव | ई) महाभयंकर युद्ध |
उत्तर :
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
1) धगधगतां समाराच्या ज्वाला | ई) महाभयंकर युद्ध |
2) मरणामध्ये विलीन | अ) शांतपणे मरण स्वीकारणे |
3) ना भय ना आशा | आ) निर्भयपणे, मनात कोणतीही आसक्ती न ठेवता |
4) नच उधाणले भाव | इ) भावना व्यक्त न करणे |
प्रश्न. 4. खालील शब्दांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
1) अनाम वीरा –
उत्तर :
अज्ञात वीर, ज्याचे स्तंभ नाहीत, पोवाडे नाहीत असा.
2) जीवनान्त –
उत्तर :
जीवनाचा अंत, मृत्यू, सैनिकाचा रणांगणावरील मृत्यू.
3) संध्येच्या रेषा –
उत्तर :
संध्याकाळचे रंग
4) मृत्युंजय वीर –
उत्तर :
मृत्यूवर विजय मिळवणारा वीर
लिहिते होऊया
तुम्ही कोण होणार, ते ठरवा. त्यासंबंधित खाली काही प्रश्न दिले आहेत, त्यांवर विचार करा. त्या प्रश्नांची उत्तरे तयार करून त्यांचे सलग लेखन करा.
उत्तर :
मी लेखक होणार
बालपणापासूनच मला वाचनाची व लेखनाची आवड आहे. डॉक्टर फक्त रुग्णाचे शरीर निरोगी ठेवतो. पण लेखन समाजाचे मन निरोगी ठेवतो. शिवाय आपला संसारही सांभाळता येतो आणि लेखनही करता येते. असे अजूनही लेखकच अजरामर होतात. त्याच्या मृत्यूनंतर कितीही वर्षे लोटली तरी पुढच्या पिढ्या स्मरण ठेवतात. उदा., पु.ल.देशपांडे, कुसुमाग्रज या पुस्तकातील पाठांचे लेखक आजही आम्ही अभ्यासत आहोत.
मी लेखक होणार ! हे कुटुंबातील सदस्यांना सांगितले तर त्यांना नुसता आनंदच झाला नाही तर माझ्याबद्दल अभिमान वाटला.
लेखक होण्यासाठी मी नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांचे आणि इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखकांचे साहित्य वाचून काढणार आहे. त्यांच्या विविध अनुभवांचा अभ्यास करून त्यांची शैलीही आत्मसात करणार आहे.
मी लेखक झाल्यावर संपूर्ण जगभर प्रवास करीन. देववादी व दैववादी रुढींवर प्रखर हल्ले चढवून समाजातील अंधश्रद्धा दूर करीन. हे करताना कितीही संकटे कोसळली तरी डगमगणार नाही, प्रलोभनाला बाळी पडणार नाही, लाचारी पत्करणार नाही.
मला नोबेल परितोषिक मिळावे, हे माझे स्वप्न आहे.
म्हणी ओळखूया
खालील वाक्ये वाचा. वाक्याच्या अर्थानुसार योग्य म्हण लिहा.
1) गणपतरावांकडे जोपर्यंत प्रतिष्ठेचे पद होते, धनसंपत्ती होती, तोपर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पैपाहुण्यांचा राबता होता. जसे ते सेवानिवृत्त झाले, तसा माणसांचा वावर कमी झाला आहे, म्हणतात ना……………
उत्तर :
असतील शिते तर जमतील भुते
2) रेहानाची कंपासपेटी हरवली, तिने ती घरभर शोधली. शेजारीपाजारीही जाऊन पाहिजे; पण कंपासपेटी कोठेच नव्हती. शेवटी ती रेहानाच्याच दप्तरातच सापडली, म्हणतात ना…………..
उत्तर :
काखेत कळसा, अन् गावाला वळसा.
3) पावसात भिजणाऱ्या कावळ्याने ठरवले, पावसाळा संपला, की घर बांधायचे. पावसाळा संपला, पण इकडे तिकडे फिरण्यात तो विसरून गेला. पुन्हा पावसाळा आला. पावसात भिजताना त्याला आठवले, की आपण घर बांधायचे ठरवले होते, म्हणतात ना ……….
उत्तर :
शेकली तेव्हा टेकली.
4) फर्नाडिस खूप बुद्धिमान व प्रसंगावधानी म्हणून प्रख्यात होते. त्यांचा मुलगा फिलिप जसजसा मोठा होऊ लागला, तसतसे त्याच्यात हे गुण दिसू लागले. गावातले सगळे म्हणू लागले, ………..
उत्तर :
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
वाचा व लिहा.
खालील उतारा वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून उतारा पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे
उत्तर :
मुलांनो ! शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत कोण बरे आहेत हे मित्र ? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल. आपल्याला फळे, फुले सावली देणारे वृक्ष, आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नद्या, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन, अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.