आपली पृथ्वी आपली सूर्यमाला स्वाध्याय
आपली पृथ्वी आपली सूर्यमाला स्वाध्याय इयत्ता पाचवी
1. काय करावे बरे ?
लघुग्रहांच्या पट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल ?
उत्तर :
i) पहिला उपाय म्हणजे एखाद्या संहारक अस्त्राने लघुग्रहाचे तुकडे करता येतील.
ii) दुसरा उपाय म्हणजे लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल.
iii) लेसर किरणांच्या साहाय्याने लघुग्रहावरच्या पदार्थाचे बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल. या वस्तुमानाच्या बदलामुळे लघुग्रहाचा मार्ग देखील बदलेल.
iv) लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी अंतराळयानाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल.
2. जरा डोके चालवा.
1) सूर्य अचानक गडप झाला, तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल ?
उत्तर :
i) सर्वत्र अंधार होईल.
ii) सर्व ग्रहांचे परिभ्रमण थांबेल.
iii) दिन – रात्र चक्र संपेल.
iv) ऋतू बदलणार नाहीत.
v) झाडे मरून जातील, कारण त्यांना अन्न निर्माण करता येणार नाही.
vi) पाऊस पडणार नाही. सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाहीत. त्यामुळे जलचक्र थांबेल.
vii) सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे बंद पडतील.
2) असे समजा, की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसे लिहाल ?
उत्तर :
राजू जाधव
गांधी नगर, नाशिक रोड, मुंबई
महाराष्ट्र राज्य, भारत देश, आशिया खंड,
पृथ्वी (ग्रह 3 रा).
सूर्यमाला, आकाशगंगा.
3. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे, ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा.
उत्तर :
दिलेल्या चित्रात मंगळ व पृथ्वी यांची अदलाबदल झाली आहे. तसेच गुरू व शनि यांचा क्रम चुकला आहे.
योग्य क्रम असा पाहिजे : बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस व नेपच्यून
4. मी कोण ?
अ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हांला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो.
उत्तर :
चंद्र
आ) मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळे ग्रहांना प्रकाश मिळतो.
उत्तर :
सूर्य
इ) मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो.
उत्तर :
उपग्रह
ई) मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
उत्तर :
ग्रह
उ) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.
उत्तर :
पृथ्वी
ऊ) मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे.
उत्तर :
सूर्य
5. अ) अवकाश प्रदेक्षणामध्ये रॉकेट का वापरतात ?
उत्तर :
अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते. यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जातात. या अग्निबाणात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात. अनेक तन वजनाच्या अवकाशयानांचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते. म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात.
आ) कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?
उत्तर :
कृत्रिम उपग्रहांच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षणे करता येतात. या निरीक्षणावरून शेती, पर्यावरण, हवामान अंदाज, पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते. या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात. कृत्रिम उपग्रहांमुळे संदेशवहनही करता येते.