पाणी स्वाध्याय

पाणी स्वाध्याय

पाणी स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. काय करावे बरे ?

जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे

उत्तर :

माती पाण्याबरोबर वाहून जाऊ नये यासाठी सभोवार पक्की पाळ बांधावी. तसेच गवत व छोटी रोपे सभोवार लावावीत.

2. जरा डोके चालवा.

पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे ?

उत्तर :

रस्ते व पादचारी मार्ग मध्य भागातून किंचित उभट व बाजूने थोडा उतार असणारे बांधावे. जेणे करून पावसाचे पाणी रस्त्यावरून न वाहता बाजूने वाहून जमिनीत मुरेल.

3. प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते ?

उत्तर :

दुष्काळात धान्य, चारा, पाणी मिळणे कठीण होते. लोकांना विपरीत परिस्थितीशी सामना करावा लागतो. प्राणी, वनस्पती यांनाही दुष्काळाचा तडाखा बसतो. दुष्काळात ही परिस्थिती निर्माण होते.

आ) पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात ?

उत्तर :

मोठी धरणे बांधणे, लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे, नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक एकत्र येऊन करतात.

इ) पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते ?

उत्तर :

वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते.

ई) जलव्यवस्थापन कशाला म्हणतात ?

उत्तर :

उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने पाणी पावसाळ्यानंतरच्या काळातही उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच ‘जलव्यवस्थापन’ म्हणतात.

4. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

अ) पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते.

उत्तर :

चूक. पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून चार महिने मिळते. ते साठवून ठेवले तर ते वर्षभर पुरते.

आ) शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हालवले जाते.

उतर :

बरोबर

Leave a Comment