अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय

अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय

अन्न टिकवण्याच्या पद्धती स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. काय करावे बरे ?

अ) पापड सादळले आहेत.

उत्तर :

पापड कडक उन्हात वाळवून घ्यावे.

आ) आंबा, कैरी, आवळा, पेरू, अशी फळे, तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठरावीक काळात भरपूर प्रमाणत उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत.

उत्तर :

आंबा, कैरी, आवळा, पेरू ही फळे वाळवून तसेच त्यांचे जॅम, मुरांबे बनवून वर्षभर वापरतो येते. मटार, मेथी, कांदा, टोमॅटो या भाज्या देखील वाळवून वर्षभर वापरता येते. मटार हवाबंद डब्यात शीतकपाटात ठेवल्याने जशीच्या तशी राहतात.

2. जरा डोके चालवा.

शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात; परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते, असे का ?

उत्तर :

शेवया या कडक उन्हात वाळविल्याने त्यातील पाणी निघून जाते त्यामुळे त्या अनेक दिवस चांगल्या राहतात. परंतु शेवयांच्या खिरीत पाणी असल्यामुळे ते लवकरच खराब होते.

3. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

अ) पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो.

उत्तर :

बरोबर

आ) सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की आपले अन्न खराब होत नाही.

उत्तर :

चूक. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की आपले अन्न खराब होते.

इ) उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत.

उत्तर :

चूक. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येते.

ई) फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते.

उत्तर :

चूक. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो.

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

अ) अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?

उत्तर :

वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे, परिरक्षके वापरणे इत्यादी पद्धतीने अन्न टिकवले जाते.

आ) खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो ?

उत्तर :

i) खराब झालेले अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. अशा अन्नाचे पोषणमूल्य कमी झालेले असते.

ii) काही वेळेला प्रकृतीला धोका होऊ शकतो. म्हणून खराब झालेले अन्न आपण खाण्याचे टाळतो.

इ) फळांचे मुरांबे का केले जातात ?

उत्तर :

i) वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे भरपूर प्रमाणात मिळतात.

ii) मोठ्या प्रमाणावर आलेल्या फळांचा वर्षभर आस्वाद घेता यावा, यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून फळांचे मुरांबे केले जातात.

ई) परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात ?

उत्तर :

लोणची, मुरांबे यांसारखे पदार्थ वर्षभर टिकावे म्हणून साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर या परिरक्षकांचा वापर करतात.

ए) मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत ?

उत्तर :

लवंग, मोठी विलायची, शहाजिरे, धने, कलमी, मिरे, कर्णफूल, तेजपान हे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. ते वनस्पतींची फळे, फुले, पाने व झाडाची साल हे भाग आहे.

Leave a Comment