अन्नजाल स्वाध्याय
अन्नजाल स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी
प्रश्न. 1. अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे –
उत्तर :
i) मनुष्य कडीला कडी जोडून साखळी तयार करतो. पण मधली कोणती कडी तुटली तर कडीची मालाच भंग पावते.
ii) कोळ्याच्या जाळ्यात एका धाग्याला खूप धागे जोडलेले असतात. त्या खूप धाग्यांना अनेक धागे जोडलेले असतात. त्यामुळे काही धागे तुटले तरी जाळे कायमच राहते.
प्रश्न. 2. चुकीचे विधान शोधा.
अ)
1) मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते.
2) निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.
3) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.
4) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.
उत्तर :
1) मधली कडी तुटली तर संपूर्ण साखळी कायम राहते.
आ)
1) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते.
2) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाही.
3) एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते.
4) अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
उत्तर :
4) अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
प्रश्न. 3. कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा.
कोळ्याचे जाळे | अन्नजाल |
---|---|
उत्तर :
कोळ्याचे जाळे | अन्नजाल |
---|---|
i) अनेक धागे एकास एक जोडून कोळी जाळे विणतो. ii) अनेक धागे तुटले तरी जाळे कायम राहते. | i) प्राणीजातीसाठी निसर्ग अन्नजाल विणतो. ii) कित्येक प्राणीजाती लोपल्या तरी अन्नजाल टिकून राहते. |
प्रश्न. 4. खालील कृतीचा/घटनेचा परिणाम लिहा.
मानवाने प्राण्यांना मारले तर –
उत्तर :
अन्नाचे महाजाल कमकुवत होईल आणि कालांतराने हळूहळू संपून महाजाल तुटून जाईल.
प्रश्न. 5. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अ) तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
एकास एक कडी जुळवून जशी माणूस साखळी तयार करतो, तसे प्राणिजातीसाठी निसर्गाने अन्नसाखळीचे महाजाल तयार केले आहे. एका प्राण्याला दुसरा बलदंड प्राणी मारून खातो, दुसऱ्याला तिसरा मारून खातो. जेव्हा एकमेकांचे भक्ष्य होणे व खाणे नैसर्गिक वृत्तीतून येते, तेव्हा ही अन्नसाखळी तुटत नाही.
काळाच्या ओघात काही प्राणिजाती नष्ट झाल्या तरी हे महाजाल तुटत नाही ते टिकून राहते. परंतु माणसाने अनाठायी प्राण्यांना जर मारले, तर ते अन्नसाखळीला हानिकारक आहे. स्वतःच्या छंदासाठी माणसाने प्राणिजीवन संपवू नये, उदाहरणार्थ, वाघ, डुक्कर, सशासारखे छोटे-मोठे प्राणी जर माणसाच्या स्वैर शिकारीमुळे नष्ट झाले, तर पर्यावरणाचा तोल बिघडू शकतो. म्हणून प्राणिजीवनाची अन्नसाखळी अबाधित ठेवायला हवी.
आ) कवितेच्या आधारे ‘जीवी जीवस्य जीवनम् |’ हे सुवचन स्पष्ट करा.
उत्तर :
प्राणिजीवनाची अन्नसाखळी ही नैसर्गिक आहे. एकमेकांना खाऊन प्राणी राहतात. ते एकमेकांचे अन्न असते. अशा प्रकारे त्यांची अन्नसाखळी तुटत नाही. एक प्राणी दुसऱ्याचा जीव घेतो, दुसरा तिसऱ्याचा घेतो, असा त्यांचा उदरनिर्वाह होत असतो.
एका चित्रात असे दाखवले आहे की छोट्या कीटकांना एक पाल खात आहे, पालीला बेडूक खात आहे, बेडकाला साप व सापाला गरुड भक्ष्य करतो. एकमेकांचे भक्ष्य होणे, म्हणजेच ‘जीवो जीवस्य जीवनम्’ होय ! प्राणिजातीमधील हे अखंड अन्नजाल टिकून आहे. एखादी प्राणिजात नष्ट झाली, तरी ते टिकून राहते. या जीवनाच्या ओघवत्या सारणीला ‘जीवो जीवस्य जीवनम् |’ असे म्हणतात.