पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय
पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय इयत्ता सहावी भूगोल
अ) अचूक पर्यायासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.
1) पृथ्वीवर पूर्व-पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात ?
रेखावृत्ते
आंतरराष्ट्रीय वाररेषा
अक्षवृत्ते ✓
2) रेखावृत्ते कशी असतात ?
वर्तुळाकार
अर्धवर्तुळाकार ✓
बिंदुस्वरूप
3) अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलाकर काय तयार होते ?
कोनीय अंतर
गोलार्ध
वृत्तजाळी ✓
4) उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत ?
90 ✓
89
91
5) पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात ?
o° मूळ अक्षवृत्त व 180° रेखावृत्त
o° मूळ रेखावृत्त व 180° अक्षवृत्त ✓
उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते
6) खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदुस्वरूपातील वृत्त कोणते ?
विषुववृत्त
उत्तरध्रुव ✓
मूळ रेखवृत्त
7) पृथ्वीगोलावर 45° उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणाचे मूल्य असू शकते ?
एक
अनेक ✓
दोन
ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करा.
1) मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
दुरुस्त विधान – मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर नसते.
2) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
दुरुस्त विधान – सर्व अक्षवृत्ते विषुववृत्तजवळ एकत्रित येत नाहीत.
3) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेखा आहेत.
उत्तर :
हे विधान योग्य आहे.
4) 8°4’65” उत्तर रेखावृत्त आहे.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
दुरुस्त विधान – 8°4’65” उत्तर अक्षवृत्त आहे.
5) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
दुरुस्त विधान – रेखवृत्ते एकमेकांना समांतर नसतात.
इ) पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्यासमोरील चौकटीत ✓ अशी खूण करा.
उत्तर :
क) उत्तरे लिहा.
1) उत्तरे ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल ?
उत्तर :
उत्तर ध्रुवाचे अक्षांश 90° उ. अक्षवृत्त रेखांश रेखावृत्त याप्रमाणे सांगू.
2) कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते ?
उत्तर :
कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर 47° इतके असते.
3) ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.
उत्तर :
ज्या देशातून विषुववृत्त गेले आहेत त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी.
4) वृत्तजाळीचे उपयोग लिहा.
उत्तर :
पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी या वृत्ताजाळीचा उपयोग होतो.
i) पृथ्वीवरील स्थाननिश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर करतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरात आहे.
ii) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकीमॅपिया व इस्त्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमध्येही अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो.
iii) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये ही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
ड) पुढील तक्ता पूर्ण करा.
वैशिष्ट्ये | अक्षवृत्ते | रेखावृत्ते |
---|---|---|
आकार | ||
माप/अंतर | प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते. | |
दिशा/संबंध | दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते. |
उत्तर :
वैशिष्ट्ये | अक्षवृत्ते | रेखावृत्ते |
---|---|---|
आकार | वर्तुळाकार | अर्धवर्तुळाकार |
माप/अंतर | प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते. | प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते. |
दिशा/संबंध | दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते. म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. | दोन रेखावृत्तांमध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते. |